बँकिंग क्षेत्रातील डार्क पॅटर्नमुळे सामान्य ग्राहकांचं नुकसान

ऑनलाइन बँकिंग आणि इतर आर्थिक सेवांमध्ये सुद्धा डॉर्क पॅटर्नचा वापर करण्यात येतो. आज आपण ऑनलाइन बैंक‍िंग मध्ये डार्क पैटर्नचा वापर कसा केला जात आहे आणि त्यापासून आपण आपला बचाव कसा करू शकतो ते पाहूयात

ऑनलाइन फसवणूक सायबर गुन्हेगारच करतात असा अनेकांचा गोड गैरसमज आहे. आधुनिक युगात फसवणुकीचे अनेक प्रकार आहेत. विशेष म्हणजे फसवणूक करणारा हा बाहेरील व्यक्ती नसतो. एखादा चोरच तुमची फसवणूक करेल असे नाही . हल्ली फसवणूकीसाठी  डार्क पॅटर्न्सचा वापर केला जातोय . डार्क पॅटर्नमध्ये मोठ्या संस्था त्यांच्या मार्केटिंग डावपेच लढवून तुम्हाला लुटतात .आता पर्यन्त ई -कॉमर्स कंपन्या असे डावपेच वापरत होते.. पण आता ऑनलाइन बँकिंग आणि इतर आर्थिक सेवांमध्ये सुद्धा डॉर्क पॅटर्नचा वापर करण्यात येतो. आज आपण ऑनलाइन बैंक‍िंग मध्ये डार्क पैटर्नचा वापर कसा केला जात आहे आणि त्यापासून आपण आपला बचाव कसा करू शकतो ते पाहूयात.

डार्क पॅटर्न म्हणजे काय ?

.ग्राहकाला अंधारात ठेवून किंवा चुकीची तसेच अपूर्ण माहिती देऊन वस्तू किंवा सेवा विक्रीला डार्क पॅटर्न असे म्हणतात. ई -कॉमर्स कंपन्यांसोबतच आता ऑनलाइन बँकिंगमध्ये सुद्धा डार्क पॅटर्नचा वापर वाढलाय.

व्याजाबाबत अर्धवट माहिती देऊन कर्ज मंजूर करण्यात येतंय. तसेच कोणतंही शुल्क नसल्याचं सांगत छुपे शुल्क आकारले जात आहेत. एवढंच नव्हे तर ग्राहकांना नको त्या सब्सक्रिप्शनच्या जाळ्यात अडकवलं जात आहे. या विविध डार्क पॅटर्नच्या प्रकाराचा वापर करून ग्राहकांना फसवलं जात आहे.

LocalCircles च्या सर्वेक्षणात काय आहे?

सर्वेक्षणानुसार प्रत्येक 10 पैकी 6 लोक …म्हणजेच साधारण 63% लोकांना ऑनलाइन बँकिंग करताना छुप्या शुल्काचा फटका बसलाय.
. सौरभनं 5 लाख रुपायांचं वैयक्तिक कर्ज घेतले होते.  बँक अधिकाऱ्यानं त्याला फोन करून तात्काळ ऑनलाइन अर्ज करून 11% व्याजदारने कर्ज घेण्यास सांगितलं  . मात्र, विविध अटी आणि शर्थीनुसार कर्जाचा व्याज दर हा 36 टक्क्यांपर्यंत जात आहे याची माहिती दिली नाही. सौरभनं हप्ता भरण्यास सुरूवात केली त्यावेळी त्याला याची माहिती मिळाली. लोकल सर्कलनं 363 जिल्ह्यात सर्वेक्षण केलंय. सर्वेक्षणात 41% ग्राहकांना interface interference चा सामना केला. डार्क पॅटर्नमध्ये ग्राहक व्यवहार करत असताना ऑनलाइन बँकिंग प्लेटफॉर्म लुडबूड करतात आणि ग्राहकांना अतिरिक्त उत्पादन किंवा सेवा खरेदी करण्यासाठी भाग पाडतात. .

काय आहे Interface interference ?
उदाहरणार्थ बँकेच्या वेबसाईटवर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल भरत असताना बँकेकडून कधी कर्ज तर क्रेडिट कार्ड अपग्रेड करण्यासाठी भाग पाडलं जातं. तुम्ही बँकेच्या वेबसाइटवर क्रेडिट कार्डचे बिल भरत असताना बँकांकडून कधी कर्ज तर कधी क्रेडिट कार्ड अपग्रेडची पॉप-अप जाहिरात येत असते. या जाहिरातींमुळे ग्राहकाला शांतपणे बिल भरता येत नाही. त्यातच नको असलेल्या जाहिराती बंद कराव्या लागतात. यालाच Interface interference म्हणतात. म्हणजेच यात तुमच्यावर जाहिरातींचा मारा करून नको असलेली वस्तू खरेदी करण्यास भाग पाडलं जातं.

Subscription traps म्हणजे काय ?

सर्वेक्षणातील 32% ग्राहकांनी subscription traps चा अनुभव घेतलाय.  ग्राहक एखाद्या नवीन ऑनलाइन प्रॉडक्टसाठी साइन अप केल्यानंतर ग्राहकाकडून सतत पैसे वसूल केले जातात. ग्राहकाची इच्छा असूनही ती सेवा बंद करता येत नाही यालाच Subscription traps असे म्हणतात.
ग्राहकांना Bait and Switch चा फटका
सेवेला बंद करण्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागते.याव्यतिरिक्त 39% ग्राहकांना Bait and Switch चाही फटका बसलाय . यात आकर्षक व्याजदराच्या कर्जाची ऑफर दिली जाते. मुदत ठेवींवर चांगला व्याज दर मिळणार आहे असं सांगितले जाते मात्र, प्रत्यक्षात तेवढे व्याज दर दिले जात नाहीत. तसेच कर्ज घेताना अनेक छुपे शुल्क देखील भरावे लागतील.

डार्क पॅटर्नमध्ये वाढ
सरकारकडून सातत्यानं कारवाईचा बडगा उगारून देखील डार्क पॅटर्न कमी होताना दिसून येत नाही. डिजिटल कर्जातील मिससेलिंगमध्ये डार्क पॅटर्नचा वापराबद्दल आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एम.राजेश्वर राव यांनी इशारा दिला होता. महागडे कर्ज घेण्यासाठी लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे,असं त्यांनी सांगितलं . 2023 मध्ये केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं ग्राहकांच्या हक्कांच्या रक्षणासाठी एक राजपत्रित अधिसूचना जारी केलीय. यालाच डार्क पॅटर्न नियंत्रण आणि प्रतिबंधाबाबत मार्गदर्शक असं नाव देण्यात आलं आहे. या मार्गदर्शक सूचना वस्तू आणि सेवा देणाऱया सर्व प्लेटफॉर्म्स, सल्लागार,जाहिरातीदार आणि विक्रेते यांना लागू होतात.

…अन्यथा ऑनलाईन बँकिंवरील विश्वास उडेल 
SMS, व्हाटस ऍप मेसेज, ईमेल किंवा थेट फोनच्या माध्यमातून जवळजवळ प्रत्येक जण हा डार्क पॅटर्नला बळी पडलाय,अशी माहिती बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ अमित तंवर यांना सांगितलं आहे. ग्राहकांना कधी स्वस्त कर्जाचे आमिष दाखवले जातं नाहीतर एखादी सेवा खूप आवश्यक असल्याचे सांगून subscribe करण्यास भाग पाडलं जातं.
.
या प्रकरणात ग्राहकांना नको असलेले छुपे शुल्क माथी मारले जाते किंवा नको असलेली योजना माथी मारण्यात येते. गेल्या दहा वर्षातच भारतात ऑनलाईन बॅकिंग सेवेचा विस्तार झालाय. ऑनलाईन बँकेमुळे बॅकेचे व्यवहार करणं सोपं झालं असलं तरीही डार्क पॅटर्नसारख्या नव्याच समस्या उदभवल्या आहेत. त्यामुळे लोकांचता ऑनलाईन बँकिंगवरचा विश्वास दिवसेंदिवस कमी होऊ शकतो.

डार्क पॅटर्नचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत असल्यानं आरबीआय,बँका आणि इतर सर्व भागधारकांनी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. डार्क पॅटर्नबाबत सरकारनं ऑनलाईन ई-कॉमर्स कंपन्यांसोबत कडक धोरण स्विकारलं आहे. थोडासा उशिर झाला तरी चालेल पण ऑनलाईन बँकिंगबाबतही कडक धोरण स्विकारण्याची गरज आहे. नियमात बदल होईपर्यंत किमान ग्राहकांना डार्क पॅटर्नबाबत जागरूक राहणं गरजेचं आहे.

ग्राहकांनी कोणती काळजी घ्यावी ?

ऑनलाइन बँकिंगच्या डार्क पॅटर्न्सपासून बचाव करण्यासाठी ग्राहकांनी कर्ज घेताना प्रत्येक शुल्काबाबतचा तपशील तपासून घ्यावा.
कर्जाचा वास्तविक व्याजदर किती आहे ? तसेच annual percentage rate म्हणजे APR ची लिखित माहिती मागावी . APR मध्ये व्याजदर , प्रोसेसिंग शुल्कासहित बाकीच्या खर्चांचा समावेश असतो . ऑनलाइन कुठलेही कर्ज किंवा कार्ड घेण्यापूर्वी सर्व नियम आणि अटी जरूर वाचा . अनेकवेळा नियम आणि अटींसाठी स्टारची खूण केलेली असते…याकडे जरूर लक्ष द्या . कुठल्याही डार्क पॅटर्नन मुळे आपली फसगत झाली आहे,असे लक्षात आल्यावर 1915 या राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमाकांवर तक्रार करा.तसेच तुम्ही 8800001915 क्रमाकांवर व्हॉट्सअपद्वारे तक्रार सुद्धा नोंदवू शकता

 

Published: April 22, 2024, 17:24 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App