तुमचं बँकेतील बचत खातं हॅक कसं करण्यात येतं ?

सायबर चोर तुमच्या बँक खात्यावर कब्जा करतो आणि त्यातले सर्व पैसे घेऊन पसार होतो. म्हणजे कोणी हॅकर आपल्या बँकेच्या खात्याला हॅक करुन त्यातली आपली वैयक्तिक माहिती चोरी करतो. त्यानंतर बँक खात्यामध्ये अनधिकृतपणे प्रवेश करुन सर्व पैसे लंपास करतो.

मोहितचा अंदाज खरा ठरला.. कोणीतरी त्याचं बँक खातं हॅक केलं होतं. मोहितसोबत झालेल्या या फसवणूकीला Bank Account Takeover Fraud असं म्हणतात… आपण मेहनतीने आपल्या बँक खात्यात पैसे जमा करतो पण सायबर चोरटे एका मिनिटात ते पैसे लंपास करतात.. अशा प्रकारची घटना तुमच्यासोबत घडू नये आणि तुमचं बँक अकाउंट सुरक्षित राहावं यासाठी आम्ही काही खबरदारीचे उपाय तुम्हाला सांगणार आहोत.त्याअगोदर जाणून घेऊया Bank Account Takeover Fraud म्हणजे नेमकं काय ?

सरळ शब्दात सांगायच झालं तर सायबर चोर तुमच्या बँक खात्यावर कब्जा करतो आणि त्यातले सर्व पैसे घेऊन पसार होतो.. म्हणजे कोणी हॅकर आपल्या बँकेच्या खात्याला हॅक करुन त्यातली आपली वैयक्तिक माहिती चोरी करतो. त्यानंतर बँक खात्यामध्ये अनधिकृतपणे प्रवेश करुन सर्व पैसे लंपास करतो.. हे सायबर चोरटे डार्क वेबद्वारे तुमची माहिती गोळा करतात (alpha 2 end) आणि डेटा ब्रीच, सोशल इंजिनिअरींग आणि फिशिंग अॅटॅक करुन लोकांना फसवतात .. यानंतर तुमच्या अनधिकृतपणे बँक खात्यात लॉग इन करुन ऑनलाईन चोरी केली जाते…

सायबर चोरटे कोणत्या प्रकारे आपल्याला लुटतात ते जाणून घेऊया…आपण वेगवेगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसं की कोणत्याही फिनटेक अॅपवर आपल्या कागदपत्रांची कॉपी शेअर करत असतो…सायबर चोरटे या ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा बँकिंग अॅपचा वापर करुन बँक खात्यात अनधिकृतपणे प्रवेश करतात. तसंच फिशिंगचा वापर करुन हॅकदेखील करतात. फिशिंग म्हणजे सायबर चोर तु्म्हाला फोन करुन बँकेचे कर्मचारी असल्याचे भासवतात आणि आपली सर्व खासगी माहिती घेतात यालाच फिशिंग अॅटॅक म्हणतात… हा फिशिंग अॅटॅक फोन कॉल, एसएमएस किंवा ईमेलद्वारे केला जातो…
सायबर चोर मालवेअरचादेखील वापर करतात… यासाठी ते अशा सॉफ्टवेअर किंवा अॅपचा वापर करतात ज्यातून सहजपणे ते ग्राहकांचा वैयक्तिक डेटा चोरी करतात…आपल्या सिस्टीममध्ये असे सॉफ्टवेअर आल्यास ते आपल्या वैयक्तिक माहितीसह आपले पासवर्डदेखील चोरी करतात आणि त्यामुळे आपण ऑनलाईन फसवणुकीला बळी पडतो…

जर आपला फोन, टॅबलेट किंवा लॅपटॉरसारखी उपकरणं चोरी झाले असतील तरीही आपल्याला फार सावध होण्याची गरज आहे.यामुळेदेखील आपले इंटरनेट आणि मोबाईल बँकिंगची माहिती चोरीला जाऊ शकते.. आणि बँक खाती हॅक होऊ शकते..

: Account take over च्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होतेय.. global digital fraud detection company BioCatch यांनी दिलेल्या अहवालावरुन बँकिंग फ्रॉडमधील 55 टक्क्यांहून अधिक प्रकरण ही
account takeover ची आहेत.

 का होतेय अशा घटनांमध्ये वाढ?
स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे ग्राहकांच्या फसवणुकीत वाढ झालीय. बँक कर्मचारी असल्याचे सांगून सायबर चोर ऑनलाईन केवायसी अपडेट करण्यास सांगतात आणि त्यातून बँक खातं, डेबिट कार्डचे डिटेल्स यांसारखी माहिती गोळा करतात…यामुळे ग्राहकांच्या फसवणुकीत वाढ झालीय…

आता प्रश्न हा आहे की आपली बँक खाती आपण सुरक्षित कशी ठेवु शकतो…बँकेचा पासवर्ड सतत बदलत रहा, कोणालाही बँक खात्याची आणि लॉग इनची माहिती देऊ नका, बँक खात्यासोबत आपला मोबाईल नंबर लिंक करा, त्यामुळे बँकेची कोणतीही प्रक्रिया otp शिवाय पूर्ण होणार नाही…व्हॉट्सअप किंवा एसएमएसद्वारे बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नका…कारण ज्यांना तुम्ही माहिती पाठवत आहात त्यांचा फोन चोरीस गेला तरी तुमची माहिती चोरीला जाऊ शकते,असा सल्ला सायबर तज्ञ गौतम कुमावत यांनी दिलाय.

सायबर चोर अतिशय टेकसेवी असतात त्यामुळे आपल्याला त्यांच्या एक पाऊल पुढे राहाव लागणार आहे.. टेक्नॉलॉजीच्या काळात आपली एक चूक आपल्याला महागात पडू शकते घाईगडबडीत बँकेचे कोणतेही व्यवहार करु नका आणि आम्ही सांगितलेल्या प्रत्येक खबरदारीच्या उपायाचा अवलंब करा…

 

Published: April 23, 2024, 14:46 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App