• Diwali Shopping आनंद द्विगुणीत करा

    धनत्रयोदशी आणि दिवाळीसाठी सर्वत्र बाजारपेठा सजल्या आहेत. अनामिकानं वर्षभर बचत केलीय. ही बचत वापरून शॉपिंग करण्याची हीच योग्य वेळ आहे. . कपडे, टीव्ही, नातेवाईक-मित्रांसाठी भेटवस्तू अशी शॉपिंगची भली मोठी यादी आहे. आता यादी मोठी म्हणजे खर्चही जास्त होणार. अशावेळी संपूर्ण शॉपिंग करून पैशाचीही बचत करणं शक्य होतं का ? हे पाहूयात

  • दिवाळीमध्ये क्रेडिट कार्डचा वापर करताना

    खरेदी करताना क्रेडिट कार्डचा वापर सहज होतो पण त्याआधी कोणत्या बाबी ध्यानात ठेवल्या पाहिजेत हे लक्षात ठेवा.

  • एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्डचे फायदे

    एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड कशी सांभाळावीत हे जाणून घ्या

  • FOREX CARD फॉरेक्स कार्ड म्हणजे काय?

    वास्तविक फॉरेक्स कार्ड हे एक प्रकारचं प्रीपेड ट्रॅव्हल कार्ड आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणतही विदेशी चलन टाकू शकता. म्हणजेच ऐश्वर्या फ्रान्सला जात असेल, तर ती या कार्डमध्ये युरो जमा करू शकते. त्याचप्रमाणे, जर कोणी सिंगापूरला जात असेल, तर तो सिंगापूर डॉलर्स फॉरेक्स कार्डमध्ये टाकून खर्च करू शकतो… हे कार्ड क्रेडिट किंवा डेबिट कार्डप्रमाणेच वापरलं जातं. तसेच, फॉरेक्स कार्डच्या मदतीने परदेशातील ATM मधून स्थानिक चलन थेट काढता येतं.

  • क्रेडिट कार्ड वापर फायद्याचं ठरणार नाही

    क्रेडिट कार्डपासून मिळणारे फायदे कालातरानं कमी होत असल्यास त्याला कार्डचे डिव्हॅल्यूएशन असे म्हणतात. बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनी कार्डच्या अटी, रिवॉर्ड प्रोग्राम किंवा शुल्काशी संबंधित नियम बदलल्यानंतर डिव्हॅल्यूएशनला सुरूवात होते.  त्यामुळे कार्डधारकाला कमी फायदे मिळतात. फायदे मिळवण्यासाठी ग्राहकांना स्वतः खर्च करावा लागतो. खर्च केल्यानंतरच ग्राहकांना सर्व फायदे मिळतात. नुकतंच ॲक्सिस आणि एचडीएफसी बँकेनं क्रेडिट कार्ड्सची फीचर्स कमी केली आहेत.

  • परदेशात रोमिंगचा खर्च कमी कसा कराल ?

    तुमच्या सिम कंपनीचं नेटवर्क परदेशात उपलब्ध नसते . त्यामुळे सिम स्थानिक नेटवर्कवर स्थलातंरित केलं जातं. रोमिंग नेटवर्कमध्ये स्थानिक टेलिकॉम ऑपरेटर मनमानी शुल्क आकरतात. तसेच रोमिंग शुल्क त्या देशातील नियमानुसार देखील ठरवण्यात येतात. त्यामुळे तुम्हाला परदेशात रोमिंग पॅकसाठी जास्त पैसे मोजावे लागतात.त्यामुळे प्रवासाचा कालावधी लक्षात घेऊन पॅकची निवड करावी.  एक दिवसापासून ते 90 दिवसांपर्यंतचे पॅक घेता येतं.  टेलिकॉम कंपन्या टॉप-अपची सुविधा देखील देतात. अचानक डेटा संपल्यास टॉप अप करू शकता

  • खर्च, उत्पन्न पाहून क्रेडिट कार्ड घ्या

    विमातळावरील लाऊंजमध्ये मोफत प्रवेश मिळत आहे म्हणून क्रेडिट कार्ड घेऊ नका. सुरूवातीला नियम आणि अटी वाचा. त्यानंतर तुमची खर्च करण्याची क्षमता पाहूनच क्रेडिट कार्ड खरेदी करा.

  • या देशांमध्ये मिळणार विनामूल्य व्हिसा

    व्हिसा विनामूल्य मिळाला तर पर्यटकांचा खर्च कमी होईल आणि तेच पैसे त्यांना जास्त साईट सिईंग किंवा शॉपिंग करण्यासाठी वापरता येतील. विनामूल्य व्हिसाची ऑफर देऊन भारतीय पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा या देशांचा प्रयत्न आहे. हे कोणते देश आहेत, ते आता जाणून घेऊया.

  • UPI CREDIT FACILITY म्हणजे काय?

    आतापर्यंत आपण बँक अकॉउंटमध्ये असलेली रक्कम UPI च्या मदतीने ट्रान्स्फर करत होतो. मात्र, UPI क्रेडिट फॅसिलिटी वापरून आपल्या बँक अकॉउंटमध्ये पैसे नसतील तरी पैसे ट्रान्स्फर करता येतील. सप्टेंबरमध्ये, RBI ने ही सेवा चालू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्व जारी केले आहेत.

  • मिनिमम ड्यू अमाऊंट भरणं महागात पडू शकतं

    ज्या वेळेला आपण क्रेडिट कार्डवर मोठी शॉपिंग करतो, त्यावेळेला आपल्याकडे 3 पर्याय असतात. सगळ्यात पहिला आणि चांगला पर्याय म्हणजे पूर्ण रक्कम भरण्याचा असतो. असं केलं तर खऱ्या अर्थाने तुम्हाला क्रेडिट कार्डचा फायदा होतो. तुम्हाला साधारण 1 महिना पैसे वापरायला मिळतात, तसेच तुम्हाला कॅटेगरीनुसार रिवॉर्ड पॉईंट मिळतात आणि वेळेवर पैसे भरले तर व्याजदेखील भरावं लागत नाही.