क्रेडिट कार्डवर मिनिमम ड्यू अमाऊंट भरणं महागात पडू शकतं

ज्या वेळेला आपण क्रेडिट कार्डवर मोठी शॉपिंग करतो, त्यावेळेला आपल्याकडे 3 पर्याय असतात. सगळ्यात पहिला आणि चांगला पर्याय म्हणजे पूर्ण रक्कम भरण्याचा असतो. असं केलं तर खऱ्या अर्थाने तुम्हाला क्रेडिट कार्डचा फायदा होतो. तुम्हाला साधारण 1 महिना पैसे वापरायला मिळतात, तसेच तुम्हाला कॅटेगरीनुसार रिवॉर्ड पॉईंट मिळतात आणि वेळेवर पैसे भरले तर व्याजदेखील भरावं लागत नाही.

अमितने IPhone खरेदी केला. त्याने 50000 रुपये कॅश दिली आणि बाकीच्या पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड स्वाईप केलं. 10 तारखेला क्रेडिट कार्ड बिल जनरेट झालं आणि त्यामध्ये टोटल अमाऊंट ड्यू 1 लाख रुपये आणि मिनिमम अमाऊंट ड्यू 5000 रुपये असं लिहिलं होतं. सध्या 5000 रुपये भरू आणि बाकीचे पैसे पुढचा पगार झाला कि भरून टाकू असा अमितने विचार केला. मात्र, पुढच्या महिन्यातलं क्रेडिट कार्डचं स्टेटमेंट बघून त्याला धक्का बसला. आता केवळ 95000 रुपये भरावे लागतील, असं अमितला वाटत होतं. मात्र बिलामध्ये रक्कम होती 98420 रुपये क्रेडिट कार्ड कंपनीने 95000 रुपयावर दरमहा 3.6 टक्यानुसार व्याज आकारलं होतं. जर त्याने या महिन्यात ही रक्कम नाही भरली तर क्रेडिट कार्ड कंपनी पूर्ण 98420 रुपयावर पुन्हा 3.6% व्याज आकारेल. म्हणजेच 3.6% हा व्याजदर दर महिन्याला कंपाऊंड होणार आहे, याचाच अर्थ वार्षिक व्याजदर झाला तब्बल 52.86%.

ज्या वेळेला आपण क्रेडिट कार्डवर मोठी शॉपिंग करतो, त्यावेळेला आपल्याकडे 3 पर्याय असतात. सगळ्यात पहिला आणि चांगला पर्याय म्हणजे पूर्ण रक्कम भरण्याचा असतो. असं केलं तर खऱ्या अर्थाने तुम्हाला क्रेडिट कार्डचा फायदा होतो. तुम्हाला साधारण 1 महिना पैसे वापरायला मिळतात, तसेच तुम्हाला कॅटेगरीनुसार रिवॉर्ड पॉईंट मिळतात आणि वेळेवर पैसे भरले तर व्याजदेखील भरावं लागत नाही. दुसरा पर्याय म्हणजे, अमितने ज्या प्रकारे मिनिमम ड्यू अमाऊंट भरली तो पर्याय. हा पर्याय स्वीकारला तर क्रेडिट स्कोअर खराब होतं नाही आणि कार्ड ऍक्टिव्ह राहतं. मात्र, व्याजावर भरमसाठ पैसे भरावे लागतात. तिसरा पर्याय म्हणजे तुम्ही खर्च केलेली रक्कम EMI मध्ये कन्व्हर्ट करू शकता. समजा अमितने 95000 रुपयाची रक्कम 3 किंवा 6 महिन्याच्या EMI मध्ये कन्व्हर्ट केली असती तर त्याला 52 टक्के व्याज लागलं नसतं. त्याला साधारण वार्षिक 18% व्याजदराने EMI ची फॅसिलिटी मिळाली असती. प्रोसेसिंग फी आणि व्याज या दोन्हीची बेरीज केली तरी मिनिमम अमाऊंट भरण्यापेक्षा EMI मध्ये कमी नुकसान आहे, तसेच पैसे भरण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. त्यामुळे, तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर शक्यतो वेळेत सगळे पैसे परत करा. एखाद्या वेळेला ते शक्य नसेल तर मिनिमम अमाऊंट भरण्यापेक्षा ती रक्कम EMI मध्ये कन्व्हर्ट करा, यामुळे तुमचं नुकसान कमी होईल.

Published: December 29, 2023, 15:26 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App