क्रेडिट कार्डचे अवमलू्यन म्हणजे काय ? कसे होते नुकसान

एखाद्या कार्डशी संबंधित फायदे कमी केल्यानंतर क्रेडिट कार्डचे अवलमूल्यन होते. क्रेडिट कार्ड कंपनीकडून कार्डाच्या अटी आणि शर्थी,रिवार्ड प्रोग्राम आणि शुल्कात बदल करण्यात येते त्यावेळी कार्डधारकाकडे असणाऱ्या कार्डचे मूल्य कमी होते.

नुकतंच जास्त वार्षिक शुल्क असणारे प्रीमियम क्रेडिट कार्ड रोहननं घेतलंय. वार्षिक शुल्क खूप जास्त असले तरी हे कार्ड खूप फायद्याचं होतं. मात्र, काही महिन्यानंतर क्रेडिट कार्ड कंपनीने कार्डचे अवमूल्यन केलं,म्हणजेच कार्डवरील मिळणारे फायदे कमी केले. ज्या फायद्यांसाठी रोहननं एवढे जास्त वार्षिक शुल्क भरले तेच फायदे आता कार्डमध्ये नाहीत, मग कार्डचा काय उपयोग?.आता रोहन कार्ड बंद करण्याच्या विचारात आहे.तुमच्या क्रेडिट कार्डचंही अवमूल्यन झालं असल्यास तुम्हालाही कार्ड सुरू ठेवावं की नाही ? हा प्रश्न पडलाच असेल
एखाद्या कार्डशी संबंधित फायदे कमी केल्यानंतर क्रेडिट कार्डचे अवलमूल्यन होते. क्रेडिट कार्ड कंपनीकडून कार्डाच्या अटी आणि शर्थी,रिवार्ड प्रोग्राम आणि शुल्कात बदल करण्यात येते त्यावेळी कार्डधारकाकडे असणाऱ्या कार्डचे मूल्य कमी होते.

क्रेडिट कार्डचे अवलमूल्यन झाल्यानं फायदे आणि रिवॉर्ड्स कमी होत असल्यानं कार्डधारकाचे नुकसान होते . तसेच आर्थिक नियोजनावरही परिणाम होतो. नुकतंच Axis बँकेने Axis Magnus card, HDFC बँकेने Regalia credit card आणि SBI कार्डने SBI cashback credit कार्डचे अवमूल्यन केलंय

Axis Magnus कार्ड चे वार्षिक शुल्क 10 हजार रुपयांवरून वरुन साडे बारा हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आले. 1 लाख रुपयांच्या मासिक खर्चावर 25,000 EDGE रिवॉर्ड पॉइंट्सचा लाभ बंद केला. तीन महिन्यात किमान 1 लाख रुपयांचा खर्च केल्यानंतर HDFC Regalia क्रेडिट कार्डधारकांना विमानतळावरील लाऊंजमध्ये जाता येणार आहे. तर , SBI कॅशबॅक क्रेडिट कार्डने मोफत लाउंज प्रवेशाची सुविधा बंद केलीय

क्रेडिट कार्डचे अवमूल्यन होण्या मागची कारणे काय आहेत ?तज्ञांच्या मते कोरोनानंतर महागाई सतत वाढ होतेय . वस्तू आणि सेवांच्या वाढत्या किमतीमुळे, क्रेडिट कार्ड कंपन्यांना रिवॉर्ड पाईंट्स देताना अडचणींचा सामना करावा लागतोय.

दोन वर्षांपूर्वी विमानतळ लाउंज प्रवेशासाठी सरासरी सहाशे रुपये प्रति व्यक्ती खर्च बँकांवर होता, तर २०२३ च्या सप्टेंबर तिमाहीत हा सरासरी खर्च 990 रुपयांपर्यंत वाढला आहे.याचा अर्थ ,गेल्या 2 वर्षात य खर्चात 65% वाढ झाली आहे. हवाई वाहतूकीचा खर्च वाढल्याने, मोफत लाउंज प्रवेश देणे बँकांसाठी आर्थिक आव्हान बनले आहे.

आता तुमच्या क्रेडिट कार्डचे अवमूल्यन झाल्यास तुम्ही काय कराल? हा सर्वात मोठा प्रश्न आहे
कार्डवरील नियम , अटी आणि शर्थी, रिवार्ड, शुल्क यात कोणत्याही बदल झाल्यास जागरूक राहा. क्रेडिट किंवा डेबिट कार्ड संबंधी बँकेचा कोणताही मेसेज आल्यास लक्षपूर्वक वाचा. क्रार्डाचे अवमूल्यन झाल्यानंतर कोणते फायदे मिळणार नाहीत याची तुम्हाला माहिती मिळते. संपूर्ण माहिती असल्यानंतरच कार्ड सुरू ठेवावं की बंद करावं याचा निर्णय घेता येतो.

Published: April 20, 2024, 15:44 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App