क्रेडिट कार्ड वापरून कार खरेदी करा आणि 50 हजारांची बचत करा

क्रेडिट कार्डचा योग्य वापर केल्यास आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. कार खरेदी करताना क्रेडिट कार्डचा वापर करून बचत कशी करता येते ? हे आपण पाहूयात.

क्रेडिट कार्डचा योग्य वापर केल्यास आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. क्रेडिट कार्डचा वापर करून बचत कशी करता येते ? हे आपण नरेश याच्या उदाहरणावरून समजावून घेऊयात.
पुण्यातील नरेशनं 12 लाख रुपयांची एक कार खरेदी केलीय.

कार खरेदी करताना 7 लाख रुपयांची डाउनपेमेंट क्रेडिट कार्डने केली …डाऊनपेमेंट केल्यानंतर 50-60 हजार रुपयाच्या किमतीचे एयर माइल्स मिळाले

म्हणजेच किमतीतील 50 ते 60 हजार रुपयांत सूट मिळाली. आहे की नाही क्रेडिट कार्ड फायद्याचा ?

समजा आता तुम्हाला एक कार खरेदी करायची आहे

आणि तुमच्याकडे जास्त क्रेडिट लिमिट असणारा क्रेडिट कार्ड असेल … तर त्या कार्डचा योग्य वापर करण्याची हीच ती योग्य वेळ कशी आहे पाहूयात

 क्रेडिट कार्डचा वापर करून कार खरेदी केल्यावर 5 ते 10 % सवलत कशी मिळेल ? 

कारची खरेदी हा एक मोठा निर्णय आहे… आपण आपल्या बचतीचा एक मोठा भाग डाउनपेमेंटमध्ये देतो … आणि बाकीच्या पैशांसाठी कर्ज घेतो … अशा वेळी क्रेडिट कार्ड बरोबर चांगली डिलही आपण मिळवू शकतो

समजा, तुम्हाला 15 लाख रुपयांची कार घ्यायची आहे. क्रेडिट कार्डचा वापर करून 10 लाख रुपयाचं डाऊनपेमेंट दिलं. क्रेडिट कार्ड वापरल्यानं तुम्हाला 5% चा रिवॉर्ड रिटर्न मिळाला म्हणजेच 50,000 रुपयांची बचत झाली

याच्या उलट कॅश म्हणजे कोणत्याही डेबिट कार्डने डाऊनपेमेंट केल्यास कोणताही फायदा होणार नाही.

क्रेडिट कार्ड वापरून बचत कशी करतात?

क्रेडिट कार्डवर तुम्हाला नियमितपणे रिवॉर्ड मिळतात. … माइलस्टोन बेनेफिट मिळतो आणि वार्षिक शुल्क माफ केले जाऊ शकते …

एक ठराविक रक्कम खर्च केल्यावर अनेक क्रेडिट कार्डवर वार्षिक शुल्क माफ करण्यात येते… कार खरेदी करताना क्रेडिट कार्डचा वापर केल्यास वार्षिक शुल्क माफ होणार हे मात्र नक्की.

माइलस्टोन गाठल्यानंतर वेगळे फायदे मिळतात… हजार एयरमाइल्सच्या आधारावर फायदे मिळतात …

पण असे असले तरी कार खरेदी करताना क्रेडिट कार्डचा वापर करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे …

कार डीलर क्रेडिट कार्ड पेमेंट साठी तुमच्याकडून अतिरिक्त 1- 2% शुल्क आकारू शकतात …हा चार्ज लावून डीलर MDR म्हणजेच Merchant Discount Rate चा भार ग्राहकांवर टाकायचा प्रयत्न करतात …

यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या नेट रिवॉर्ड रिटर्नवर परिणाम होतोच … पण त्याच बरोबर कारच्या एकूण किंमत देखील वाढू शकते.

हे टाळण्यासाठी कार विक्रेत्यांची चर्चा करा. 1% पेक्षा कमी शुल्क आकारायला सांगा.

बहुतांशवेळी अनेक कार विक्रेते संपूर्ण शुल्क माफ करतात. 4 ते पाच कार विक्रेत्यांसोबत चौकशी केल्यानंतर कार खरेदीचा निर्णय घ्या

 क्रेडिट कार्डच्या बिलिंग सायकलमध्ये पुरेसा निधी असेल तरच कार खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरा

कार खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा वापर हा वाहन कर्जाचा भाग नाही,हे कायम लक्षात असू द्या.

वाहन कर्जापेक्षा क्रेडिट कार्डच्या कर्जावर 15ते 25% असा खूप मोठा व्याज दर असतो.

तसेच कार खरेदी केल्यानंतर त्या महिन्यात तुमच्या क्रेडिट कार्डमधील खूप मोठा क्रेडिट लिमिट वापरला जातो.

अशा वेळी CUR म्हणजेच Credit Utilisation Ratio वाढू शकतो … CUR वाढल्यास सिबिल स्कोअर खराब होऊ शकतो.

म्हणूनच क्रेडिट कार्डमधील क्रेडिट लिमिट लक्षात घेऊन डाउनपेमेंटची रक्कम ठरवा

अशा प्रकारे तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून कार घेऊ शकता. मात्र, क्रेडिट कार्डचा वापर करण्यापूर्वी त्यातील तोटे आणि फायदेही समजून घ्या.

 

 

Published: April 8, 2024, 16:25 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App