क्रेडिट कार्ड EMI Vs पर्सनल लोन - कोणता पर्याय चांगला?

क्रेडिट कार्डचं बिल येईपर्यंत पैसे जमा नाही झाले तर मग क्रेडिट कार्डचं बिल EMI मध्ये कन्व्हर्ट करण्याचा आपल्याकडे पर्याय असतो. याशिवाय, बँकाकडून पर्सनल लोन घेऊन क्रेडिट कार्डचं बिल भारण्याचादेखील आपल्याला पर्याय असतो. यापैकी, कोणता पर्याय निवडला तर कमी प्रोसेसिंग फी लागेल आणि कमीतकमी व्याज भरावं लागेल, ते जाणून घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आपण कितीही गुंतवणूक केली किंवा इमर्जन्सी फंड जमा केला तरी कधी तरी अचानक पैशाची गरज पडते. घरात फर्निचर करायचं असो, किंवा एखाद्या कार्यक्रमाचा खर्च असो, फॉरेन ट्रिपचा किंवा मेडिकल इमर्जन्सी असो, बरेच लोकं गुंतवणूक मोडून खर्च करण्यापेक्षा क्रेडिट कार्डवर खरेदी करतात. क्रेडिट कार्ड कंपनी आपल्याला परतफेडीसाठी 45 दिवसांपर्यंत व्याजमुक्त कालावधी देते. तसेच, या खरेदीवर आकर्षक रिवॉर्ड पॉईंट्स देखील मिळतात. क्रेडिट कार्डचं बिल येईपर्यंत पैसे जमा नाही झाले तर मग हे क्रेडिट कार्डचं बिल EMI मध्ये कन्व्हर्ट करण्याचा आपल्याकडे पर्याय असतो. याशिवाय, बँकाकडून पर्सनल लोन घेऊन क्रेडिट कार्डचं बिल भारण्याचादेखील आपल्याला पर्याय असतो. यापैकी, कोणता पर्याय निवडला तर कमी प्रोसेसिंग फी लागेल आणि कमीतकमी व्याज भरावं लागेल, ते जाणून घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

सगळ्यात आधी क्रेडिट कार्ड EMI चे फायदे काय आहेत, ते बघूया. क्रेडिट कार्डवर आपण काही खर्च केला तर आपल्याकडे परतफेडीसाठी किमान 30 ते 45 दिवसांचा कालावधी असतो. सध्या काही क्रेडिट कार्ड कंपन्या 90 दिवसांपर्यंत परतफेडीचा व्याजमुक्त कालावधी देत आहेत. बऱ्याच क्रेडिट कार्ड कंपन्या आता जॉइनिंग फी आणि एन्युअल फी घेत नाहीत. त्यामुळे, 90 दिवसांपर्यत आपल्याला एकही रुपया न देता पैसे वापरता येतात. उलट खर्च केला म्हणून क्रेडिट कार्ड कंपनीच आपल्याला रिवॉर्ड पॉईंट्स देते ज्याचा वापर शॉपिंगसाठी करता येतो किंवा आपण हे पॉईंट कॅशमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. ड्यू डेटपर्यंत क्रेडिट कार्डचं विल शक्य नसेल तर आपल्याकडे ती रक्कम EMI मध्ये कन्व्हर्ट करण्याचा पर्याय असतो. या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपल्याला कुठेही अर्ज करावा लागत नाही. सगळी प्रोसेस घरबसल्या ऑनलाईन होती. तसेच, सिबिल स्कोअर देखील चेक केला जात नाही. जरी पर्सनल लोनपेक्षा व्याजदर थोडा जास्त असेल तरी सुरुवातीचे काही दिवस आपण बिनव्याजी पैसे वापरतो, मग एकूण हिशोब केला तर 1 वर्षापर्यन्तच्या लोनसाठी क्रेडिट कार्ड EMI चा पर्याय निवडला तरी आपलं फार नुकसान होत नाही. त्यामुळे, तुम्हाला 1 वर्षाच्या आत लोनची परतफेड करायची असेल तर क्रेडिट कार्ड EMI हा चांगला पर्याय आहे.

आता पर्सनल लोनचे फायदे काय आहेत, ते जाणून घेऊया. जर रक्कम मोठी असेल आणि आपल्याला परतफेडीचा कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त पाहिजी असेल तर क्रेडिट कार्ड EMI हा महाग ऑप्शन आहे. क्रेडिट कार्ड कंपन्या साधारण 16 ते 24% व्याजदर आकारतात. या तुलनेत, पगारदार व्यक्तींना बँका 12 टक्यापासून पर्सनल लोन देतात. काही बँका लोन 6 महिन्यानंतर बंद करायचं असेल तर फोरक्लोजर चार्जेस आकारात नाहीत. आपण वेगळं पर्सनल लोन घेतलं तर आपल्या क्रेडिट कार्डचं लिमिट ब्लॉक होत नाही. त्यामुळे, अचानक एखादी इमर्जन्सी आली तर क्रेडिट कार्ड वापरण्याचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतो. पर्सनल लोनचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे, आपल्याला एकदाच नियोजन करून लोनचा आकडा ठरवावा लागतो. तर दुसऱ्या बाजूला क्रेडिट कार्डवर जोपर्यंत लिमिट संपत नाही तोपर्यंत आपण कितीही खर्च करू शकतो. त्यामुळे, क्रेडिट कार्डवर अनावश्यक खर्च होण्याची भीती असते, ही शक्यता पर्सनल लोनमध्ये कमी असते. सध्या बऱ्याच बँका प्री-अप्रुव्हड डिजिटल पर्सनल लोन देतात, त्यामुळे ग्राहकांना बँकेत न जाता आणि कोणतेही कागदपत्र सादर न करता घरबसल्या पर्सनल लोन घेता येतं. क्रेडिट कार्ड EMI आणि पर्सनल लोन या दोन्हीचे आपापले फायदे आहेत. आपल्यासाठी कोणता पर्याय फायदेशीर आहे त्याचा विचार करून दोन्हीपैकी एका पर्यायाची निवड करा.

Published: April 17, 2024, 16:47 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App