क्रेडिट कार्ड बंद करताना एवढी खरबदारी घ्या

क्रेडिट कार्ड बंद करण्याअगोदर आपण कार्डद्वारे केलेल्या खर्चाची समीक्षा करा.... क्रेडिट कार्डचे वार्षिक शुल्क, जास्त व्याजदर याच गोष्टी कारणीभूत आहे की तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्याची गरज आहे या सर्व बाबी पडताळून घ्या.

अमन वाढत्या क्रेडिट कार्डच्या खर्चामुळे परेशान झालाय आणि त्यामुळे त्याला त्याचं क्रेडिट कार्ड बंद करायचे आहे..पण वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा एकच पर्याय आहे का? तुम्ही पण क्रेडिट कार्ड बंद करायचा विचार करत असाल तर कोणकोणत्या गोष्टी विचारात घेणे गरजेचे आहे…जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये….

कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट आणि इतर सुविधांमुळे क्रेडिट कार्डधारकांच्या संख्येत वाढ होतांना दिसतेय…
कारण अगोदर क्रेडिट कार्ड हे चैनीची गोष्ट होती पण आता तेच झटपट पेमेंट करण्याचे माध्यम बनलंय. ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन खरेदी, सोपा व्यवहार आणि आपल्या सोयीनुसार पैसे देण्यासारख्या अनेक सुविधा मिळतात….

इतके फायदे मिळूनदेखील तुम्हीसुद्धा तुमचे क्रेडिट कार्ड बंद करण्याचा विचार करत असाल तर याची महत्त्वाची कारणं म्हणजे वाढत्या खर्चाला आळा घालणे, डेबिट कार्ड आणि युपीआय पेमेंट करण्यावर भर देणे किंवा क्रेडिट कार्डचे वार्षिक शुल्क वाचवणे यापैकी काहीही असु शकते…यासाठी क्रेडिट कार्ड बंद करण्याअगोदर आम्ही सांगतोय त्या गोष्टी नक्की लक्षात घ्या म्हणजे तुमचं कोणत्याही प्रकारे आर्थिक नुकसान होणार नाही….

क्रेडिट कार्ड बंद करण्याअगोदर आपण कार्डद्वारे केलेल्या खर्चाची समीक्षा करा…. क्रेडिट कार्डचे वार्षिक शुल्क, जास्त व्याजदर याच गोष्टी कारणीभूत आहे की तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्याची गरज आहे या सर्व बाबी पडताळून घ्या…

यानंतरही तुम्ही कार्ड बंद करण्याचा निर्णय पक्का केला असेल तर ही चेकलिस्ट नक्की तपासा…

सर्वात पहिले म्हणजे आपल्याला क्रेडिट कार्ड वापरतांना रिवॉर्ड पॉइंटस मिळतात ते सर्व पॉइंट रिडीम करुन टाका म्हणजेच वापरुन टाका…कारण एकदा का तुमचे कार्ड बंद झाले तर ते सर्व पॉइंट वाया जातात आणि तुमचे नुकसान होऊ शकते….दुसरी गोष्ट म्हणजे कार्ड बंद करण्याअगोदर तुमची सर्व थकबाकी भरुन टाका… जर तुम्ही थकबाकी भरली नाही तर त्याचा परिणाण तुमच्या क्रेडिट स्कोरवर पडतो… तसंच बँक तुम्हाला थकबाकीदार घोषित करु शकते किंवा तुम्हाला उशिरा थकबाकी भरल्यावर त्यावर विलंब शुल्कदेखील भरावे लागेल…

यासोबतच जर तुम्ही खूप वर्षांपासून वापरत असलेले क्रेडिट कार्ड बंद केले तर त्याचा परिणाम तु्मच्या क्रेडिट स्कोरवर होईल.. तसंच क्रेडिट कार्ड जर तुम्ही कोणत्याही मर्चंट प्लॅटफॉर्मवर ऑटो लिंक केलेले असेल तर ते काढून टाका…

या सर्व गोष्टींची पडताळणी केल्यावर तुम्ही संबंधित बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून क्रेडिट कार्डचे अकाउंट बंद करण्याची प्रक्रिया सुरु करण्यास सांगा… यासाठी तुम्हाला ईमेलद्वारे एक formal closure request पाठवावी लागेल… त्यात तुमचे नाव, पत्ता, क्रेडिट कार्ड नंबरचे शेवटची चार नंबर ही सर्व माहिती द्या… हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कार्ड बंद झाल्याबाबत बँक पुष्टी करेल… तुम्हाला लिखित स्वरुपात बँकेकडून पुष्टी हवी असल्याची मागणी करा… कारण ही कागदपत्र तुम्हाला भविष्यात कधीही उपयोगी पडू शकतात..

बँकेकडून कार्ड बंद झाल्याचे खात्री केल्यानंतर  शेवटी क्रेडिट कार्ड नष्ट करा. त्यामुळे  कार्डचा नंतर कोणी दुरुपयोग करु शकणार नाही

Published: March 20, 2024, 16:23 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App