इलेक्ट्रिक की पेट्रोल ? कोणती कार फायद्याची ?

टाटा मोटर्सनं नुकतंच टियागो आणि नेक्सॉन या दोन्ही इलेक्ट्रिक कराच्या किंमती एक लाख 20 हजार रुपयांपर्यंत कमी केल्यात. आता इलेक्ट्रिक कारची किंमत कमी झाल्यानं पेट्रोलच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार किफायतशीर आहेत का ? चला तर पाहूयात.

टाटा मोटर्सनं नुकतंच टियागो आणि नेक्सॉन या दोन्ही इलेक्ट्रिक कराच्या किंमती एक लाख 20 हजार रुपयांपर्यंत कमी केल्यात. आता इलेक्ट्रिक कारची किंमत कमी झाल्यानं पेट्रोलच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार किफायतशीर आहेत का ?
टियागो ईव्ही ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार
टियोगाची किमत सत्तर हजार रुपये आणि नेक्सॉन ईव्हीची किंमत एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत कमी करण्यात आलीय टियागो ईव्हीची एक्स शोरू किमत आता 7 लाख 99 हजार रुपये आणि नेक्सॉन ईव्हीची किंमत 14 लाख 49 हजार रुपयांपासून सुरू होईल. MG Comet नंतर टियागो ईव्ही ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झालीय. टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक कारच्या किमती कमी केल्यानं ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तसेच पेट्रोल कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार खरेदी करताना सुरूवातीला देण्यात येणारी अतिरिक्त किंमतही ग्राहक लवकर वसूल करू शकतील.

ईलेक्ट्रिक कारच्या मेन्टेन्सवर होणार खर्चात बचत 
Tiago XTA या पेट्रोल मॉडेलची एक्स शोरूम किमत 6 लाख 95 हजार रुपये आहे तर इलेक्ट्रिक मॉडलेची किमत 8 लाख 99 हजार रुपये आहे. इलेक्ट्रिक कारच्या रजिस्ट्रेशनसाठी खर्च कमी येतो मात्र, विम्यासाठी खर्च जास्त आहे. हा सगळा खर्च एकत्रित धरून टियागो इलेक्ट्रिक कार जवळपास एक लाख 60 हजार रुपयांनी महाग मिळते.
पेट्रोलच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार 26 हजार रुपयांनी स्वस्त
मात्र, इलेक्ट्रिक वाहनांचा रनिंग कॉस्ट म्हणजेच इंधनाचा खर्च आणि इतर खर्च गेल्या काही वर्षांपासून कमी होतोय. रोजचा प्रवास किती होतो यावर रनिंग कॉस्ट काढता येतो.
प्रत्येक दिवशी तीन किलोमीटर म्हणजेच तीन वर्षात 33 हजार किलोमीटरसाठी विम्याचा हप्ता, सर्विस आणि चार्जिंगचा खर्च हा टियोगी XTA या प्रेट्रोल कारला 2 लाख 41 हजार एवढा येतो. तर टियागो इलेक्ट्रिक कारसाठी 56 हजार 487 रुपये एवढा येतो. या घटकांचा विचार केल्यास पेट्रोलच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार 26 हजार रुपयांनी स्वस्त होईल.

याचाच अर्थ सुरूवातीला महाग वाटणारी इलेक्ट्रिक कार दीर्घकालावधीचा विचार केल्यास किफायतशीर ठरते. तुमची कार दररोज 40 कि.मी. चालत असल्यास Tiago EV ला ब्रेकइव्हन पॉईट गाठायला तीन वर्ष चार महिने लागतील. दररोज 30 किलोमीटर कार चालवल्यास साडेचार वर्षात तुमचा अतिरिक्त पैसा वसूल होतो.
घरी चार्जिंग करणे स्वस्त
तर दररोज पंधरा किलोमीटर कार चालवल्यास सहा वर्ष आठ महिन्यात ब्रेकइव्हन मिळतो. इलेक्ट्रिक कारची बॅटरी आठ वर्ष किंवा एक लाख सहा हजार किलोमीटर यापैकी जे लवकर पूर्ण होईल त्यावेळी बदलावी लागते.हे लक्षात असू द्या.
. सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग करण्यासाठी प्रति युनिट पाच ते पंधरा रुपायंपर्यंत खर्च येतो. तर घरी किंवा गृहनिर्माण संस्थेत कारच्या चार्जिंगचा खर्च हा दोन ते 9 रुपये एवढा आहे.

घरातील विजेचे दर कमी असल्यानं घरी चार्जिंग करणं स्वस्त पडतं. सध्या शहरांबाहेर इलेक्ट्रिक चॉजिंग स्टेशन कमी आहेत. त्यामुळे लांबचा प्रवास करताना अडचणी येतात. तसेच इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीबाबत कमी जागरूकता आहे तसेच सर्विंसिंगबद्दलही कोणाला फार ज्ञान नाही. तसेच पेट्रोल वाहनांच्या तुलनेत सर्विस सेंटर्सची संख्याही कमी आहे.

इलेक्ट्रिक कार खरेदी करणं किफायतशीर झालंय. पेट्रोलच्या कारच्या तुलनेत अतिरिक्त खर्चही लवकर वसूल होत आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला दहा लाख रुपयांपेक्षा कमी तसेच दररोज पन्नास ते साठ किलोमीटर रनिंग असणं आवश्यक आहे तसेच चार्जिंगही घरी करावी लागणार,अशी माहिती ऑटो एक्सपर्ट विकास त्यागी यांनी दिलीय.

एकूणच इलेक्ट्रिक कारच्या किमती कमी होत आहेत. विम्याचा खर्चही कमी होत आहे. चार्जिंग स्टेशनसह इतर पायाभूत सुविधांचा विस्तार झाल्यास इलेक्ट्रिक कारच्या वापर वेगानं वाढू शकतो.

Published: March 30, 2024, 13:19 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App