NFO मधील गुंतवणूक ही संधी आहे की धोका?

म्युच्युअल फंड NFO मध्ये गुंतवणूक करणं खरंच फायदेशीर आहे का? पुढच्या काही दिवसात आणखी बरेच NFO लॉन्च होण्याची शक्यता आहे, त्यामध्ये आपण गुंतवणूक करावी का, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या त्रैमासिकात म्हणजेच सप्टेंबरमध्ये, म्युच्युअल फंड्सनी NFO च्या माध्यमातून 22000 कोटींचं भांडवल जमा केलं आहे.

म्हणजेच, जूनच्या तुलनेत यामध्ये 4 पट वाढ झाली आहे. हा आकडा ऐकून एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे म्युच्युअल फंड NFO ला एवढा चांगला प्रतिसाद का मिळतोय आणि म्युच्युअल फंड NFO मध्ये गुंतवणूक करणं खरंच फायदेशीर आहे का? पुढच्या काही दिवसात आणखी बरेच NFO लॉन्च होण्याची शक्यता आहे, त्यामध्ये आपण गुंतवणूक करावी का, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. चला तर या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया. म्युच्युअल फंड कंपन्यांनी सप्टेंबर त्रैमासिकात 48 NFO लॉन्च केले आहेत. या माध्यमातून गुंतवणूकदारांनी तब्बल 22000 कोटींची गुंतवणूक केली आहे. जून त्रैमासिकात 25 NFO च्या माध्यमातून केवळ 5500 कोटींचं भांडवल जमा करण्यात आलं होतं. नवीन NFO मध्ये सेक्टर फंड्स आणि ETF चा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. 48 पैकी 13 NFO हे सेक्टर फंड्स आहेत तर 12 ETF लॉन्च करण्यात आले आहेत. सेक्टरल फंड्सनी अंदाजे 5700 ….. कोटींचं भांडवल उभारलं आहे, तर मल्टी ऍसेट एलोकेशन फंड्सनी 4791 ……… कोटी आणि मल्टी-कॅप फंड्सनी 3277 …….कोटींचं भांडवल जमा केलं आहे. लिक्विड फंडच्या NFO ला देखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे, या कॅटेगरीमध्ये 3083 ….. कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. सगळ्यात जास्त भांडवल मिळालेल्या स्कीममध्ये ICICI प्रुडेन्शिअल इनोव्हेशन फंड, बडोदा BNP पारिबा व्हॅल्यू फंड, बजाज फिनसर्व फ्लॅक्सि कॅप फंड, HDFC डिफेन्स फंड आणि HSBC कंजम्पशन फंडचा समावेश आहे. म्युच्युअल फंड कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर NFO लॉन्च केले आहेत, आणि विशेष म्हणजे गुंतवणूकदारांनी देखील या फंड्सला भरघोस प्रतिसाद दिला आहे. मागच्या 3 वर्षात शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड्सनी खूप चांगला रिटर्न दिला आहे. त्यामुळे, मार्केटमध्ये सेंटीमेंट्स चांगले आहेत. म्हणूनच NFO ला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळतोय, असं मत शेअर मार्केट एक्सपर्ट अक्षय भनसाळी यांनी व्यक्त केलं आहे.

 

गुंतवणूकदारांना मागच्या 3 वर्षात म्युच्युअल फंड्समधून खूप चांगला रिटर्न मिळाला आहे.

त्यामुळे, गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता आणि इच्छा वाढली आहे. म्युच्युअल फंड्समध्ये लॉन्ग टर्मसाठी गुंतवणूक केली तर चांगला रिटर्न मिळतो, असा विश्वास अनेक गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाला आहे. गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता वाढल्यामुळे, थीमॅटिक किंवा सेक्टरल फंडसारख्या हाय रिस्क कॅटेगरीला देखील चांगला प्रतिसाद मिळतोय. अर्थव्यवस्थेमध्ये तेजी असेल तर थीमॅटिक किंवा सेक्टरल फंड चांगला रिटर्न देतात, त्यामुळे या फंड्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. NFOs ची संख्या वाढण्यामागे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे अनेक कंपन्यांची या व्यवसायात झालेली एंट्री. म्युच्युअल फंड व्यवसाय झपाट्याने वाढतोय, त्यामुळे बजाज फिनसर्व, झिरोधा, व्हाईट ओक आणि हेलिओस कॅपिटलसारख्या नामांकित कंपन्यांनी या व्यवसायात एंट्री केली आहे. या कंपन्यांचा व्यवसाय नवीन असल्यामुळे, प्रत्येक कॅटेगरीमध्ये किमान 1 फंड या कंपन्यांना लॉन्च करावा लागणार आहे. झिरोधासारख्या काही कंपन्यांनी केवळ पॅसिव्ह फंडवर लक्ष केंद्रित केलं आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांना नवीन पर्याय मिळाला आहे. उदारणार्थ लार्ज मिडकॅप 250 फंड झिरोधाने पहिल्यांदा आणला आहे. त्यामुळे, अश्या फंड्सच्या माध्यमातून नवीन कॅटेगरी निर्माण करण्याचा प्रयत्न झिरोधासारख्या AMC करत आहेत.

 

या बरोबरच, कोटक आणि DSP सारख्या जुन्या आणि नामांकित म्युच्युअल फंड कंपन्यांनी मार्केटमध्ये संधी शोधून चांगले NFO लॉन्च केले आहेत.

उदारणार्थ, DSP ने त्यांचा बँकिंग आणि फायनान्शिअल सर्व्हिसेस फंड लॉन्च केला आहे, तर कोटक AMC ने त्यांचा हेल्थकेअर फंड लॉन्च केला आहे. तर, बजाज फिनसर्व बॅलन्स एडव्हान्टेज फंड, ऍक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंडसारख्या अनेक चांगल्या स्कीम लॉन्च करण्यात आल्या आहेत. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे, आपण या NFO मध्ये गुंतवणूक करावी का? NFO म्हणजे IPO सारखाच प्रकार आहे. NFO चा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे, यामध्ये 10 रुपयाची NAV मिळते. यामुळे, रिटर्न जास्त मिळतो असं नाही, मात्र फंडच्या सुरुवातीपासून आपण गुंतवणूक केली आहे, त्याचं समाधान मिळतं. बॅलन्स एडव्हान्टेज सारख्या एव्हर-ग्रीन कॅटेगरीमध्ये बजाजने फंड लॉन्च केला आहे. यामध्ये नवीन गुंतवणूकदार देखील गुंतवणूक करू शकतात. त्याचप्रमाणे, ज्यांना ELSS मध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी झिरोधाने पॅसिव्ह ELSS फंड बाजारात आणला आहे. अश्या प्रकारचे युनिक फंड लॉन्च झाले, तर गुंतवणूकदारांनी NFO मध्ये गुंतवणूक करावी. मात्र, गुंतवणूक करताना आपला उद्देश आणि गुंतवणुकीचा कालावधी किती आहे, त्याचा विचार करा, असा सल्ला अक्षय भनसाळी यांनी दिला आहे. तसेच, फंड हाऊसचा ट्रॅक रेकॉर्ड, पूर्वीच्या NFO ची कामगिरी, एक्सपेन्स रेशो बघितला पाहिजे. पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करण्यासाठी NFO चा वापर करावा, असा सल्ला देखील अक्षय भनसाळी यांनी दिला आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून NFO मध्ये लॉन्ग टर्मसाठी गुंतवणूक केल्यास चांगली वेल्थ क्रिएट करता येईल.

Published: December 4, 2023, 19:42 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App