SME शेअर्समध्ये गुंतवणूक करावी का?

मागच्या 2 वर्षात SME कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त रिटर्न मिळाला आहे. SME शेअर्समध्ये लार्ज कॅपपेक्षा नेहमीच चांगला मिळेल, असा सुमितचा गैर-समज झाला आहे.

सुमितने शेअर मार्केटमध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. आपण केवळ SME कंपन्यांच्या शेअर्समध्येच गुंतवणूक करायची असं त्याने ठरवलं आहे.

मागच्या 2 वर्षात SME कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त रिटर्न मिळाला आहे. SME शेअर्समध्ये लार्ज कॅपपेक्षा नेहमीच चांगला मिळेल, असा सुमितचा गैर-समज झाला आहे. मागच्या 2 वर्षात 163 ….. SME कंपन्यांच्या IPO चं लिस्टिंग झालं आहे, त्यापैकी 41 शेअर्स अजूनही IPO इश्यू प्राईजच्या खाली ट्रेड करत आहेत. 50 टक्यापेक्षा जास्त लॉस केवळ एकाच शेअर्समध्ये झाला आहे. यापैकी, एक कंपनी मेनबोर्डवर शिफ्ट झाली आहे, तर एका शेअरमध्ये ट्रेडिंग थांबवण्यात आलं आहे. दुसऱ्या बाजूला, चांगला रिटर्न देणाऱ्या शेअर्सचं पारडं जाड आहे. 163 पैकी 65 शेअर्समध्ये 100 टक्यापेक्षा जास्त रिटर्न मिळाला आहे. तर 2 शेअर्स मागच्या 2 वर्षात तब्बल 10 पट वाढले आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, 120 कंपन्यांचे शेअर्स इश्यू प्राईजच्या वर ट्रेड करत आहेत, म्हणजे या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना लॉस झाला नाहीये. याचा अर्थ असा आहे कि 75% शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी पैसे कमावले आहेत.

 

एवढी चांगली कामगिरी असूनदेखील सुमितच्या आर्थिक सल्लागाराने सुमितला SME कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक न करण्याचा सल्ला दिला आहे.

यामुळे, सुमितच्या मनात गोंधळाचं वातावरण आहे. एका बाजूला SME शेअर्सची दमदार कामगिरी आहे, तर दुसऱ्या बाजूला अनुभवी आर्थिक सल्लागाराचा सल्ला आहे, अश्या परिस्थितीत काय करावं, हे सुमितला कळत नाहीये. सुमितप्रमाणे, असंच गोंधळाचं वातावरण कदाचित तुमच्याही मनात असू शकतं. SME शेअर्समध्ये गुंतवणूक करणं खरंच रिस्की आहे का, हे आपण समजून घेतलं पाहिजे. SME शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल, तर आपण `1 किंवा 2 शेअर्स खरेदी करू शकत नाही. हे शेअर्स लॉटमध्ये खरेदी करावे लागतात, एका लॉटची व्हॅल्यू 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असते. चांगला रिटर्न पाहिजे असेल तर किमान 20 किंवा 25 शेअर्सचा पोर्टफोलिओ बनवणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा होतो कि, ज्याच्याकडे किमान 25 लाख रुपयाचा पोर्टफोलिओ आहे, केवळ अश्याच गुंतवणूकदारांनी SME शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे. आपण केवळ 1 किंवा 2 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आणि त्या कंपन्यांमध्ये काही प्रॉब्लेम झाला, तर आपले पैसे बुडू शकतात. तसेच, केवळ शेअर्सची कामगिरी न बघता गुंतवणूकदारांनी कंपनीचे फंडामेंटल्स, मॅनेजमेंटकडे असणारा अनुभव आणि लिक्विडीटीसारख्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, असं मत मार्केट एक्सपर्ट संतोष सिंग यांनी व्यक्त केलं आहे.

 

या शेअर्समध्ये आणखी एक मोठी अडचण आहे, ती म्हणजे सप्लाय आणि डिमांडची.

म्हणूनच या कंपन्यांच्या IPO मध्ये मार्केट मेकर आवश्यक आहे आणि ही भूमिका इन्व्हेस्टमेंट बँकर बजावतात. त्यामुळे, अश्या शेअर्समध्ये मॅनिप्युलेशन होण्याची शक्यता अधिक असते. मार्केट कॅप कमी असल्यामुळे, शेअर्सच्या किमती मॅनिप्युलेट करणं खूप सोपं आहे. तसेच, कोणत्याही सेगमेंटचा पास्ट परफॉर्मन्स चांगला असताना त्या सेगमेंटमध्ये गुंतवणूक चालू करू नये. त्यामुळे, सुमितने अश्या महाग व्हॅल्युएशनला SME शेअर्समध्ये गुंतवणूक चालू करू नये, असा आमचा सल्ला आहे. मात्र, मधल्या काळात तो चांगल्या SME कंपन्या शोधून ठेऊ शकतो. काही कारणास्तव SME सेगमेंटमध्ये क्रॅश आला, तर त्यानंतर गुंतवणूक चालू करता येईल. आता ज्यांनी SME शेअर्समध्ये भरपूर पैसे कमावले आहेत, त्यांनी प्रॉफिट बुक करावा का, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. SME शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याआधीच एक्सिट स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे, असं मत संतोष सिंग यांनी व्यक्त केलं आहे. ज्यांना SME शेअर्समध्ये चांगला प्रॉफिट मिळाला आहे, त्यांनी पार्शिअल प्रॉफिट बुक करावा. जर लॉन्ग टर्मसाठी शेअर्स खरेदी केले असतील, तर कंपनीच्या आर्थिक कामगिरीकडे लक्ष ठेवलं पाहिजे. ड्रोन, EMS अर्थात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस, केबल अँड वायर आणि पाईप या सेक्टरमध्ये गुंतवणुकीची चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे, असं देखील संतोष सिंग म्हणाले आहेत.… मात्र, कंपनीचे प्रोमोटर खरंच प्रामाणिक आहेत का, याची व्यवस्थित माहिती घेऊन गुंतवणूक करायला पाहिजे.

Published: December 5, 2023, 17:26 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App