डेअरी शेअर्समध्ये गुंतवणूक करावी का?

जगात घडणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा दुधाच्या विक्रीवर फारसा परिणाम होत नाही. म्हणूनच, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. डेअरी बिझनेस डिफेन्सिव्ह आहे, पण त्यात आणखी काही अडचणी आहेत का आणि डेअरी सेगमेंटमध्ये कोणते शेअर्स चांगले आहेत, ते समजून घेण्याचा आपण आज प्रयत्न करूया.

आपल्या आयुष्यात काही गोष्टी अश्या असतात, ज्यांची किंमत कितीही वाढली तरी आपण त्या गोष्टी खरेदी करणं बंद करत नाही.

अशी एक गोष्ट म्हणजे दूध. 2008 ची मंदी आली, 2014 ला सरकार बदललं, 2016 मध्ये नोटबंदी झाली, त्यानंतर GST कायदा पारित करण्यात आला, कोविड आला, मग रशिया युक्रेन युद्ध आणि शेवटचं उदाहरण म्हणजे इस्राईल हमास युद्ध, मागच्या 100 वर्षात असे असंख्य संकटं आले, पुढच्या 100 वर्षात आणखी भरपूर संकटं येतील, अर्थव्यवस्था अडचणीत येईल. मात्र, दूध ही अशी गोष्ट आहे, जी खरेदी करणं लोक बंद करणार नाहीत. सांगण्याचा हेतू असा आहे, डेअरीचा बिझनेस डिफेन्सिव्ह आहे. म्हणजे, जगात घडणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा दुधाच्या विक्रीवर फारसा परिणाम होत नाही. म्हणूनच, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. डेअरी बिझनेस डिफेन्सिव्ह आहे, पण त्यात आणखी काही अडचणी आहेत का आणि डेअरी सेगमेंटमध्ये कोणते शेअर्स चांगले आहेत, ते समजून घेण्याचा आपण आज प्रयत्न करूया.

 

भारतातला डेअरी बिझनेस झपाट्याने वाढतोय.

2023 मध्ये 125 अब्ज डॉलरचं असणारं हे मार्केट 2030 पर्यंत 227 अब्ज डॉलरचा टप्पा गाठेल असा अंदाज आहे. म्हणजेच, पुढच्या 7 ते 8 वर्षात मार्केट दुप्पट होण्याची शक्यता आहे. दुधाचं उत्पादन करणारा भारत हा जगातला दुसरा सर्वात मोठा देश आहे. आपण रोज 12 कोटी 60 लाख लिटर दुधाचं उत्पादन करतो, यामुळे दुध उत्पादनात भारताचा जगात 24% मार्केट शेअर आहे. डेअरी प्रॉडक्ट एक्स्पोर्टमध्ये भारत मार्केट लीडर आहे, या उद्योगाचं आपल्या अर्थव्यवस्थेत 5% योगदान आहे आणि या माध्यमातून 8 कोटींपेक्षा जास्त भारतीयांना रोजगार मिळतो. राज्यांचा विचार केल्यास, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेश हे 5 राज्य 53% मार्केट शेअरसह सर्वात आघाडीवर आहेत. दुधाचा व्यवसाय पर कॅपिटा इन्कमवर अवलंबून आहे, त्यामुळे भारताचा पर कॅपिटल इन्कम वाढला तर डेअरी व्यवसायाला त्याचा फायदा होईल, असं मत मार्केट एक्सपर्ट अक्षय भनसाळी यांनी व्यक्त केलं आहे. व्हॅल्यू एडेड वस्तूंच्या विक्रीत वाढ झाली, तर डेअरी कंपन्यांच्या प्रॉफिट मार्जिनमध्ये सुधारणा होईल, अशी माहितीदेखील मार्केट एक्सपर्ट अक्षय भानसाळी यांनी दिली आहे. मात्र, या सेगमेंटमध्ये कोणते लिस्टेड शेअर्स आहेत, आणि या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी का, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

 

डेअरी सेगमेंटमध्ये काम करणाऱ्या दोडला डेअरी, पराग मिल्क आणि हॅटसन ऍग्रो या कंपन्यांचे शेअर्स लिस्टेड आहेत.

तेलंगणामध्ये मुख्य व्यवसाय असणाऱ्या दोडला डेअरीचा व्यवसाय झपाट्याने वाढतोय. कंपनी 1 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांकडून दूध विकत घेते. दक्षिण भारतात काम करणारी ही तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीला दुधाच्या विक्रीमधून 72% उत्पन्न मिळतं, तर पनीर, बटर आणि चीझसारख्या व्हॅल्यू एडेड वस्तूंमधून 23% उत्पन्न मिळतं, अशी माहिती मार्केट एक्सपर्ट अक्षय भनसाळी यांनी दिली आहे. कंपनीने 2021 मध्ये त्यांचा IPO लॉन्च केला होता, मात्र सलग 2 वर्ष हा शेअर लिस्टिंग प्राईजच्या खाली ट्रेड करत होता. जुलै 2023 मध्ये या शेअरने 640 रुपयाची महत्वाची पातळी क्रॉस करून ब्रेकआऊट दिला आहे. हा शेअर सध्या 806 रुपयाला ट्रेड करतोय. हा शेअर 600 ते 650 रुपयांपर्यंत खाली आला तर गुंतवणुकीची चांगली संधी मिळू शकते. केवळ गाईचं दूध आणि उत्पादनं विकणाऱ्या गोवर्धन अर्थात पराग मिल्क फूड्सचा शेअरदेखील लिस्टेड आहे. या शेअरमध्ये स्विंग ट्रेडिंग केल्यास चांगला रिटर्न मिळू शकतो. भारतातला डेअरी व्यवसाय सध्या बऱ्यापैकी अन-ऑर्गनाइज्ड आहे, त्यामुळे लिस्टेड कंपन्यांची संख्या कमी आहे. मात्र, येणाऱ्या काळात या सेगमेंटमध्ये नवीन IPO येण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पोर्टफोलिओचा काही भाग आपण या सेगमेंटमध्ये नक्कीच एलॉकेट करू शकतो. मात्र, सरकारी धोरणांचा या बिझनेसवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तसेच, लंम्पि सारख्या आजारामुळे या कंपन्या अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे, गुंतवणूकदारांनी शेअरच्या किमतीतले चढ-उतार सहन करण्याची तयारी ठेवली पाहिजे.

Published: December 9, 2023, 17:32 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App