Retirement Planning साठी या फंडमध्ये गुंतवणूक करा

स्मॉलकॅपमध्ये गुंतवणूक करावी का नाही, हा निर्णय घेणं गुंतवणूकदारांसाठी अवघड आहे. गुंतवणूक केली आणि स्मॉलकॅपमध्ये घसरण झाली तर मोठं नुकसान होईल. दुसऱ्या बाजूला, गुंतवणूक नाही केली आणि स्मॉलकॅप इंडेक्स आणखी वाढला तर चांगली संधी हातची जाईल. पण काळजी करू नका, हे अवघड काम सोपं करण्याचा एक पर्याय आहे. फ्लेक्सी कॅप फंडमध्ये गुंतवणूक केली, तर हा गोंधळ नक्की दूर होऊ शकतो.

मार्च 2023 मध्ये 8700 चा निच्चांक नोंदवल्यानंतर, निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्समध्ये एकतर्फी तेजी चालू झाली.

निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्स आता 14000 च्या पार गेला आहे. म्हणजेच, मागच्या 9 महिन्यात स्मॉलकॅप इंडेक्समध्ये तब्बल 60 टक्याची तेजी आली आहे. केंद्र सरकारने इन्फ्रा आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वाढावा यासाठी अनेक योजना चालू केल्या आहेत, त्याचा सकारात्मक परिणाम स्मॉलकॅप शेअर्सवर झाला आहे. मात्र, एवढी मोठी तेजी झाल्यानंतर स्मॉलकॅप शेअर्समध्ये आता खूप जास्त रिस्क आहे, असं काही तज्ज्ञांचं मत आहे. तर, स्मॉलकॅपमध्ये तेजी चालू झाली कि ती 3 ते 4 वर्ष चालू राहते, त्यामुळे 2026 पर्यंत तेजी अशीच चालू राहील, असं काही तज्ज्ञांचं मत आहे. मग अश्या परिस्थिती गुंतवणूकदारांच्या मनात गोंधळाचं वातावरण तयार झालं आहे. स्मॉलकॅपमध्ये गुंतवणूक करावी का नाही, हा निर्णय घेणं गुंतवणूकदारांसाठी अवघड आहे. गुंतवणूक केली आणि स्मॉलकॅपमध्ये घसरण झाली तर मोठं नुकसान होईल. दुसऱ्या बाजूला, गुंतवणूक नाही केली आणि स्मॉलकॅप इंडेक्स आणखी वाढला तर चांगली संधी हातची जाईल. पण काळजी करू नका, हे अवघड काम सोपं करण्याचा एक पर्याय आहे. फ्लेक्सी कॅप फंडमध्ये गुंतवणूक केली, तर हा गोंधळ नक्की दूर होऊ शकतो.

 

विदेशी गुंतवणूकदार शक्यतो लार्ज कॅप शेअर्सला प्राधान्य देतात.

2023 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर मार्केटमध्ये विक्री केली आहे, त्यामुळे लार्ज कॅप शेअर्सचं व्हॅल्युएशन स्वस्त झालं आहे, असं मत JM फायनान्शिअल म्युच्युअल फंडचे इक्विटी CIO सतीश रामनाथन यांनी व्यक्त केलं आहे. तर दुसऱ्या बाजूला SIP च्या माध्यमातून रिटेल गुंतवणूकदारांनी स्मॉल आणि मिडकॅप शेअर्समध्ये जोरदार गुंतवणूक केली आहे. विदेशी गुंतवणूकदारांच्या खरेदी विक्रीमुळे कधी लार्ज कॅप शेअर्स आकर्षक व्हॅल्युएशनला येतात तर कधी स्मॉल आणि मिडकॅप शेअर्स. हा प्रकार पुढचे अनेक वर्ष चालू राहणार आहे. मग अश्या परिस्थितीत सामान्य गुंतवणूकदारांना कोणत्या मार्केट कॅपच्या फंडमध्ये गुंतवणूक करावी, ते कळत नाही. मात्र, हे ठरवण्याचं काम आपल्याला करायची काहीच गरज नाहीये, कारण फ्लेक्सि कॅप फंडमध्ये हे काम फंड मॅनेजर करतो. लार्ज, मिड आणि स्मॉलकॅपपैकी कुठे गुंतवणूक केली तर अधिक फायदा मिळेल, याचं एनालिसिस करून फंड मॅनेजर गुंतवणूक करतो. पण फ्लेक्सि कॅप फंड कसं कार्य करतात, ते आधी जाणून घेऊया.

 

फ्लेक्सी कॅप फंड हा एक प्रकारचा इक्विटी म्युच्युअल फंड आहे.

मार्केट रेग्युलेटर सेबीच्या नियमानुसार, फ्लेक्सी कॅप फंडच्या मॅनेजरला त्याच्या एकूण मालमत्तेपैकी किमान 65% रक्कम लार्ज, मिड किंवा स्मॉलकॅप शेअर्समध्ये गुंतवावी लागते. कोणत्या मार्केट कॅपमध्ये किती रक्कम गुंतवायची, ते ठरवण्याचा अधिकार फंड मॅनेजरकडे असतो. तसेच, व्हॅल्युएशनचा विचार करून प्रॉफिट बुक कधी करायचा, हे देखील फंड मॅनेजर ठरवतो. फ्लेक्सि कॅप फंड इक्विटी कॅटेगरीमध्ये येतात, त्यामुळे 1 वर्षाच्या आधी प्रॉफिट बुक केला तर गुंतवणूकदारांना 15% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. 1 वर्षानंतर प्रॉफिट बुक केला तर 10% लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. मात्र, एका आर्थिक वर्षात 1 लाख रुपयाचा लॉन्ग टर्म कॅपिटल गेन हा टॅक्स-फ्री असतो, हे लक्षात ठेवा. आता फ्लेक्सि कॅप फंड्सनी किती रिटर्न दिला आहे, ते जाणून घेऊया. Ace म्युच्युअल फंडच्या आकडेवारीनुसार, फ्लेक्सी-कॅप फंड्सनी 1 वर्षात 17%, 3 वर्षात 19% आणि 5 वर्षात सरासरी 15% रिटर्न दिला आहे. म्हणजेच, लार्ज कॅप फंड्सपेक्षा फ्लेक्सि कॅप फंड्सनी जास्त रिटर्न दिला आहे. फ्लेक्सि कॅप फंडमधून चांगला रिटर्न पाहिजे असेल तर किमान 10 वर्षासाठी गुंतवणूक करावी. ज्यांना रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी SIP करायची आहे, त्यांच्यासाठी फ्लेक्सि कॅप फंड हा चांगला पर्याय आहे.

Published: December 9, 2023, 17:39 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App