डिफेन्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये अजूनही गुंतवणुकीची संधी?

मागच्या 10 वर्षात डिफेन्स साहित्याच्या एक्स्पोर्टमध्ये तब्बल 23 पट वाढ झाली आहे. 2014 मध्ये 35.7 टक्के इम्पोर्ट टू एक्स्पोर्ट रेशिओ आता 3.9 टक्यापर्यंत खाली आला आहे. एवढंच नाहीतर भारतातल्या डिफेन्स कंपन्यांच्या एकूण वार्षिक टर्नओव्हरचा आकडा पहिल्यांदाच 1 लाख कोटींच्या वर गेला आहे. यामुळे, भारतातल्या डिफेन्स सेक्टरचा आणि डिफेन्स कंपन्यांचं नशीब बदललं आहे.

नरेंद्र मोदी सरकारने देशाचे इम्पोर्ट कमी व्हावे आणि एक्स्पोर्ट वाढावे यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत… काही वर्षांपूर्वी भारताला डिफेन्स साहित्य मोठ्या प्रमाणावर इम्पोर्ट करावं लागत होतं. आर्थिक वर्ष 2013 14 मध्ये भारताने केवळ 686 कोटींचे एक्स्पोर्ट केले होते. मात्र, सरकारने डिफेन्स कंपन्यांना ताकद दिली, अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर स्ट्रॅटेजिक टाय-अप केले. त्यामुळे, भारताने आर्थिक वर्ष 2021 22 मध्ये साधारण 3000 कोटी आणि 2022 23 मध्ये तब्बल 16000 कोटींचं डिफेन्स साहित्य एक्स्पोर्ट केलं. म्हणजेच, मागच्या 10 वर्षात डिफेन्स साहित्याच्या एक्स्पोर्टमध्ये तब्बल 23 पट वाढ झाली आहे. 2014 मध्ये 35.7 टक्के इम्पोर्ट टू एक्स्पोर्ट रेशिओ आता 3.9 टक्यापर्यंत खाली आला आहे. एवढंच नाहीतर भारतातल्या डिफेन्स कंपन्यांच्या एकूण वार्षिक टर्नओव्हरचा आकडा पहिल्यांदाच 1 लाख कोटींच्या वर गेला आहे. यामुळे, भारतातल्या डिफेन्स सेक्टरचा आणि डिफेन्स कंपन्यांचं नशीब बदललं आहे.

डिफेन्स सेक्टरमध्ये चालू झालेली वाढ ही तर केवळ सुरुवात आहे. केंद्र सरकारने 2024 25 च्या बजेटमध्ये डिफेन्ससाठी 6 लाख 20 हजार कोटींची तरतूद केली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी डिफेन्स बजेटमध्ये तब्बल 26000 कोटींची वाढ करण्यात आली आहे. आपल्या आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सकडे आधुनिक साहित्य असावं यासाठी सरकारने सातत्याने डिफेन्स बजेटमध्ये वाढ केली आहे. दुसऱ्या बाजूला, 2022 मध्ये रशिया युक्रेन युद्ध आणि 2023 मध्ये इस्राईल हमास युद्ध चालू झाल्यामुळे सबंध जगातल्या अनेक देशांमध्ये भीतीचं वातावरण आहे, जवळपास प्रत्येक देश आता सावध झाला आहे. कधीही लढायची वेळ आली तर आपल्याकडे आधुनिक साहित्य असावं, यासाठी प्रत्येक देशाचा प्रयत्न चालू आहेत. अश्या परिस्थिती भारत या देशांना डिफेन्स साहित्य पुरवू शकतो, या संधीचं सोनं आपल्याला करता आलं तर डिफेन्स सेक्टरमध्ये आपण कधीही विचार केला नसेल एवढी मोठी वाढ होऊ शकते.

भारताने नेट इंपोर्टर ते नेट एक्सपोर्टरचा अवघड प्रवास पूर्ण केला आहे. याचा सकारात्मक परिणाम डिफेन्स कंपन्यांच्या शेअर्सवर पाहायला मिळतोय. माझगाव डॉक, कोचिन शिपयार्डसारख्या अनेक डिफेन्स शेअर्समध्ये गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. 2014 ते 2023 दरम्यान भारत सरकारने डिफेन्स सेक्टरसाठी बजेटच्या 10% रक्कम अलोकेट केली आहे. यामुळे, देश आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल करतोय, तसेच PLI स्कीममुळे अनेक डिफेन्स कंपन्यांना फायदा झाला आहे. या कंपन्यांना आता एक्स्पोर्टचे दरवाजे उघडे झाले आहेत. हिंदुस्थान एरोनॉटिक्स, BEL, माझगाव डॉक, कोचिन शिपयार्ड, पारस डिफेन्स आणि BEML सारख्या शेअर्समध्ये पुढच्या 1 वर्षात 30 ते 35% रिटर्न मिळू शकतो, असा अंदाज मार्केट एक्सपर्ट रवी सिंग यांनी व्यक्त केला आहे. मात्र, डिफेन्स कंपन्यांकडे असणारी संधी खूप मोठी आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये ट्रेडिंग न करता लॉन्ग टर्मसाठी गुंतवणूक करावी असा आमचा सल्ला आहे. या शेअर्समध्ये मागच्या 1 वर्षात खूप मोठी तेजी आली आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंग केलं तर हे शेअर्स 30 ते 40% खाली येऊ शकतात. मात्र, अश्या प्रकारची घसरण झाली तरी घाबरून न जाता टप्याटप्याने गुंतवणूक करा, यामुळे खालच्या लेव्हलला व्हॅल्यू बाईन्ग करण्याची संधी मिळेल आणि मार्केटमध्ये तेजी चालू झाली कि चांगला रिटर्न मिळेल.

Published: February 27, 2024, 11:48 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App