इलेक्ट्रिक वेहिकलच्या विक्रीमुळे या 10 केमिकल कंपन्यांना फायदा

पेट्रोल आणि डिझेलच्या जागी लोकांनी EV चा वापर करावा यासाठी सरकारनेदेखील प्रोत्साहन दिलं आहे. पुढच्या 5 ते 10 वर्षात EV ची विक्री वाढणार आणि बॅटरी कंपन्यांची चांदी होणार, हे निश्चित आहे. मात्र, यामुळे बॅटरीसाठी लागणाऱ्या केमिकलसाठी डिमांड वाढणार आहे आणि जेवढा फायदा बॅटरी बनवणाऱ्या कंपन्यांना होईल तेवढाच फायदा या केमिकल कंपन्यांना देखील होईल. या कोणत्या केमिकल कंपन्या आहेत, ते आता जाणून घेऊया.

भारतासारख्या मोठ्या ऑटोमोबाईल मार्केटमध्ये, पेट्रोल आणि डिझेलच्या जागी आता इलेक्ट्रीक वेहिकलची विक्री वाढतीये, ज्यामुळे बॅटरीची मागणी वाढली आहे. यामुळे, बॅटरी मॅन्युफॅक्चर करणाऱ्या कंपन्यांचं नशीब बदललं आहे. या सुवर्णसंधीचा फायदा करून घेण्यासाठी लहानांपासून ते मोठ्या बॅटरी कंपन्या EV साठी लागणाऱ्या बॅटरी मॅन्युफॅक्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत. टेक्नॉलॉजीच्या मदतीने कमी किमतीत जास्त स्टोरेज कपॅसिटी देण्याचा या कंपन्यांचा प्रयत्न आहे. तसेच, कमीतकमी वेळेत बॅटरी चार्ज झाली तर EV चा डिमांड वाढेल, त्यामुळे यासाठी R अँड D वर करोडो रुपये खर्च करतायेत. पेट्रोल आणि डिझेलच्या जागी लोकांनी EV चा वापर करावा यासाठी सरकारनेदेखील प्रोत्साहन दिलं आहे. पुढच्या 5 ते 10 वर्षात EV ची विक्री वाढणार आणि बॅटरी कंपन्यांची चांदी होणार, हे निश्चित आहे. मात्र, यामुळे बॅटरीसाठी लागणाऱ्या केमिकलसाठी डिमांड वाढणार आहे आणि जेवढा फायदा बॅटरी बनवणाऱ्या कंपन्यांना होईल तेवढाच फायदा या केमिकल कंपन्यांना देखील होईल. या कोणत्या केमिकल कंपन्या आहेत, ते आता जाणून घेऊया.

<>gfx 5 inया यादीमध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे टाटा केमिकल्स. टाटा मोटर्सने EV सेगमेंटमध्ये अतिशय झपाट्याने विस्तार केला आहे. टाटांनी EV चे अनेक मॉडेल लॉन्च केले आहेत आणि ग्राहकांनी या मॉडेल्सला चांगला प्रतिसाद दिला आहे. EV च्या बॅटरीसाठी लागणारे केमिकल्स ही कंपनी पुरवणार आहे. टाटा ग्रुपने काही महिन्यांपूर्वी गुजरात सरकार बरोबर एक करार केला, या अंतर्गत टाटा ग्रुप 13000 कोटींची लिथियम आयन सेल फॅक्टरी चालू करणार आहे. या यादीमध्ये दुसरं नाव आहे हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्स. ही कंपनी कार्बन ब्लॅक, कोल टार पिच आणि ऍडवान्सड कार्बन मटेरियलसह विविध सेक्टरमध्ये वापरल्या जाणाऱ्या विशेष केमिकल्सचं उत्पादन करते. डिसेंबर 2023 मध्ये, कंपनीने लिथियम-आयन बॅटरीच्या घटकांच्या निर्मितीसाठी 5-6 वर्षांमध्ये 4,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली. या प्लॅन्टची वार्षिक क्षमता 2 लाख टन असेल.

तिसरी कंपनी आहे एथर इंडस्ट्रीज ही स्पेशालिटी केमिकल कंपनी आहे. डिसेंबर 2023 मध्ये, कंपनीने जागतिक लिथियम-आयन बॅटरी बनवणाऱ्या एका जागतिक कंपनी बरोबर स्ट्रॅटेजिक करार केला, ज्यामुळे कंपनीला आता इलेक्ट्रोलाइट ॲडिटीव्ह आणि बॅटरी सेगमेंटमध्ये एंट्री करणं शक्य झालं आहे. या कराराअंतर्गत एथर निवडक इलेक्ट्रोलाइट ॲडिटीव्हचा पुरवठा करेल. याव्यतिरिक्त, कंपनी काही नवीन केमिकल सेगमेंटमध्ये देखील प्रवेश करणार आहे. चौथी कंपनी आहे PCBL अर्थात फिलिप्स कार्बन ब्लॅक. लिथियम-आयन बॅटरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कार्बन ब्लॅकसाठी ही कंपनी बाजारपेठेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. PCBL आता लिथियम-आयन बॅटरीसाठी खास तयार केलेल्या कार्बन ब्लॅकच्या विक्रीवर लक्ष केंद्रित करत आहे आणि त्यावर कंपनीचं काम चालू आहे. लिथियम-आयन बॅटरीसाठी कार्बन ब्लॅकची वार्षिक मागणी सध्या 20,000 टन आहे, मात्र 2030 पर्यंत हा आकडा 84000 टनापर्यंत जाईल, असा अंदाज आहे.

पाचव्या केमिकल कंपनीचं नाव आहे Ami Organics, ही कंपनी R अँड D वर विदेश लक्ष देणारी स्पेशालिटी केमिकल कंपनी आहे. कंपनीचा सेमीकंडक्टर सेगमेंटमध्ये व्यवसाय आहे आणि आता एका जागतिक कंपनीच्या मदतीने कंपनी इलेक्ट्रोलाइट्ससाठी मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करण्याची योजना करत आहे. त्यानंतर सहावी केमिकल कंपनी आहे गुजरात फ्लोरोकेमिकल्स. ही कंपनी फ्लोरोपॉलिमर, फ्लोरो-स्पेशालिटी केमिकल्स आणि रेफ्रिजरंट्स बनवते. ही कंपनी युरोप, यूएस, जपान आणि आशियामध्ये निर्यात करते आणि फ्लोरो पॉलिमर मार्केटमधील टॉप 5 जागतिक कंपन्यांपैकी एक आहे. फ्लोरिन केमिस्ट्रीचा वापर करून ही कंपनी बॅटरी तयार करते. EV बॅटरी केमिकल आणि ग्रीन हायड्रोजन सेगमेंटसाठी कंपनी 1 बिलियन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. पुढची कंपनी आहे तत्व चिंतन फार्मा, ही एक स्पेशालिटी केमिकल्स कंपनी आहे. EV बॅटरी व्यवसायात असणाऱ्या संधीचा फायदा करून घेण्यासाठी कंपनीने इलेक्ट्रोलाइट सॉल्व्हेंट स्पेसमध्ये प्रवेश केला आहे. या लिस्टमध्ये आठवी कंपनी आहे निओजेन केमिकल्स. ही कंपनी लिथियमवर आधारित ऑरगॅनिक आणि ऑरगॅनो मेटॅलिक कंपौंड तयार करते. निओजेन केमिकल्स इलेक्ट्रोलाइट्स आणि लिथियम इलेक्ट्रोलाइट सॉल्ट सारख्या बॅटरी रसायनांचा पुरवठा करणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. निओजेन केमिकल्सने जपानच्या MU Ionic Solutions Corporate सोबत इलेक्ट्रोलाइट्ससाठी उत्पादन तंत्रज्ञान परवाना खरेदी करण्यासाठी करार केला आहे. कंपनीने दरवर्षी 30,000 किलो टन क्षमतेचा इलेक्ट्रोलाइट प्लॅन्ट उभारण्याची योजना आखली आहे.

या यादीतील 9वी कंपनी बालाजी अमाइन्स आहे, जी भारतातील ॲलिफॅटिक अमाईन आणि ऑलिगो पोलिस्टिक अमाइन्स बनवणारी सर्वात मोठी कंपनी आहे. याव्यतिरिक्त, ही देशातील एकमेव कंपनी आहे जी डी मिथाइल कार्बोनेट अर्थात DMC च उत्पादन करते. पॉली कार्बोनेट बनवण्यासाठी DMC हा इम्पोर्ट सुब्स्टीट्युट आहे आणि लिथियम बॅटरीमध्ये वापरला जातो. कंपनीने DMC बनवायला संपते,बार 2022 मध्ये सुरुवात केली आहे. या यादीतली शेवटची कंपनी आहे पाँडी ऑक्साइड्स. ही कंपनी सध्या बॅटरी आणि केमिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांसाठी लेड, लेड ॲलॉय आणि PVC ॲडिटीव्ह तयार करते. याव्यतिरिक्त, कंपनी मेटल्स, मेटल ऑक्साईड, PVC स्टॅबिलायझर्स आणि लेड-ऍसिड बॅटरी सेगमेंटमध्ये काम करते. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे यापैकी कोणत्या शेअरमध्ये आपण गुंतवणूक करावी. प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीजचे रिसर्च डायरेक्टर अविनाश गोरक्षकर यांच्या मते, “हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्स, टाटा केमिकल्स आणि निओजेन केमिकल्स या कंपन्यांना सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे. केमिकल कंपन्यांव्यतिरिक्त, अमरा राजा बॅटरीज आणि एकसाईड सारख्या नॉन-केमिकल कंपन्या लिथियम बॅटरीचे उत्पादन सुरू करतील. अविनाश गोरक्षकर 12-15 महिन्यांच्या दृष्टीकोनातून, हिमाद्री केमिकलचा शेअरसाठी 410 रुपये, निओजेनसाठी 1,700 रुपये, टाटा केमिकल्ससाठी 1200 रुपये आणि अमरा राजा बॅटरीसाठी 975 रुपयाचं टार्गेट दिलं आहे.

Published: February 27, 2024, 11:53 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App