Hydrogen Engine बनवणाऱ्या या कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी

कमिन्सने नेहमीच इनोव्हेशन आणि नवीन इंजिनच्या लॉन्चिंगवर भर दिला आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये, कंपनीने वीज निर्मिती विभागात 7 नवीन उत्पादन लाँच केले. याव्यतिरिक्त, कंपनीने औद्योगिक व्यवसायात रेल्वे, खाणकाम, सागरी, बांधकाम आणि पंप सेगमेंटमध्ये 7 तर डिस्ट्रिब्युशन सेगमेंटमध्ये 3 नवीन प्रॉडक्ट लॉन्च केले आहेत. भारतीय रेल्वेला ब्रॉड-गेज नेटवर्कचं 100% विद्युतीकरण साध्य करण्यासाठी, कमिन्सने डिझेल इलेक्ट्रिक टॉवर कार्सचा (DETC) सातत्याने पुरवठा सुनिश्चित केला.

कमिन्स इंडिया ही नामांकित इंजिनिअरिंग कंपनी आहे, 1962 मध्ये किर्लोस्कर आणि अमेरिकेच्या कमिन्स ग्रुपने भागीदारी करून कंपनी चालू केली. 1997 मध्ये, कमिन्सने किर्लोस्करांकडून स्टेक विकत घेतला आणि स्वतःची मालकी 51% पर्यंत वाढवली. कमिन्स ही भारतातली सर्वात मोठी इंजिन मॅन्युफॅक्चर करणारी कंपनी आहे, कंपनीचे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 8 मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत. कंपनीकडे मजबूत वितरण नेटवर्क आहे आणि ग्राहकांच्या गरजेनुसार इंजिन पुरवण्याची क्षमता आहे.

कमिन्सचा व्यवसाय तीन सेगमेंटमध्ये विभागलेला आहे. पहिला इंजिन बिझनेस आहे, जो हेवी, मिडीयम आणि लाइट ड्युटी इंजिनसह कन्स्ट्रक्शन आणि कंप्रेसर मार्केट्सला सेवा देतो. दुसरा पॉवर सिस्टम व्यवसाय आहे, जो खाणकाम, सागरी, रेल्वे, तेल आणि वायू, संरक्षण आणि उर्जा निर्मिती क्षेत्रांना पुरवठा करतो. आणि तिसरा विभाग म्हणजे वितरण.

डिझेल आणि नॅचरल गॅसपासून ते आधुनिक हायब्रिड, इलेक्ट्रिक आणि फ्युएल सेलपर्यंत, कंपनी विविध प्रकारचे इंजिन तयार करते. कंपनी इलेक्ट्रिक वेहिकल आणि पॉवर सेक्टरसाठी, हायड्रोजन फ्युएल सेल पॉवर मॉड्यूल आणि रचना देखील तयार करते. डिझेल इंजिन / जेनसेट व्यवसायात 40% मार्केट शेअरसह कमिन्स ही डिझेल इंजिन आणि पॉवर जनरेटर सेट सेगमेंटमध्ये मार्केट लीडर. मार्केट लीडरशिपमुळे कंपनीला प्रॉफिट मार्जिन टिकवता आलं आहे. पायाभूत सुविधांवर सरकारने केलेली गुंतवणूक, PLI स्कीमच्या माध्यमातून मिळणारं प्रोत्साहन आणि 5G आणि क्लाउड-आधारित डेटा स्टोरेजमुळे डेटा सेंटरची वाढलेली मागणी यामुळे कंपनीची ऑर्डर बुक आणखी मजबूत होईल असा अंदाज आहे. पायाभूत सुविधा, डेटा सेंटर्स आणि कमर्शियल रियल्टीमध्ये वाढत्या गुंतवणुकीमुळे, बॅकअप पॉवरची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे.

कमिन्सने नेहमीच इनोव्हेशन आणि नवीन इंजिनच्या लॉन्चिंगवर भर दिला आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये, कंपनीने वीज निर्मिती विभागात 7 नवीन उत्पादन लाँच केले. याव्यतिरिक्त, कंपनीने औद्योगिक व्यवसायात रेल्वे, खाणकाम, सागरी, बांधकाम आणि पंप सेगमेंटमध्ये 7 तर डिस्ट्रिब्युशन सेगमेंटमध्ये 3 नवीन प्रॉडक्ट लॉन्च केले आहेत. भारतीय रेल्वेला ब्रॉड-गेज नेटवर्कचं 100% विद्युतीकरण साध्य करण्यासाठी, कमिन्सने डिझेल इलेक्ट्रिक टॉवर कार्सचा (DETC) सातत्याने पुरवठा सुनिश्चित केला.

 

अमेरिकेच्या कमिन्स ग्रुपकडून मिळणारं साहाय्य आणि तांत्रिक क्षमतांमुळे CIL प्रतिस्पर्धी कंपन्यांसमोर अनेक वर्ष टिकली आहे. टेलिमॅटिक्स, इलेक्ट्रिफिकेशन, रिन्यूएबल एनर्जी, पर्यायी इंधन आणि अडवान्सड एनालिटिक्सच्या मदतीने आपल्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. EV सेगमेंटमध्ये कंपनीने खूप मोठी गुंतवणूक केले आहे, कंपनीचा अनेक बॅटरी मॅन्युफॅक्चरइंग कंपन्यांमध्ये मालकीहक्क आहे.

एवढेच नाही तर जागतिक स्तरावर कमिन्स ग्रुप हायड्रोजन टेक्नॉलॉजीमध्ये लक्षणीय गुंतवणूक करत आहे. आपल्या हायड्रोजन टेक्नॉलॉजीवर आधारित इंजिन बनवून ते भारतात विकण्याचा त्यासोबतच इतर देशांमध्ये ते एक्स्पोर्ट करण्याचा कमिन्स इंडियाचा विचार आहे. जगात क्लीन एनर्जीची मागणी वाढतीये, त्यामुळे हायड्रोजन टेक्नॉलॉजीवर लक्ष केंद्रित करून आपला व्यवसाय वाढवण्याचा कंपनीचा प्लॅन आहे.

भारत सरकारने पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केलं आहे, सरकारला भारताचा GDP 5 ट्रिलियन डॉलरच्या वर घेऊन जायचा आहे. हे लक्ष सध्या करायचं असेल तर सरकारला 2030 पर्यंत यासाठी $4.5 ट्रिलियनची गुंतवणूक करावी लागेल. FY20-25 मध्ये, भारतातील पायाभूत सुविधांवर प्रस्तावित खर्च ₹111 लाख कोटी इतका आहे, ज्यामध्ये उर्जा 24%, रस्ते 18%, शहरी अर्थव्यवस्था 17% आणि रेल्वेचा एकूण 12% हिस्सा आहे, यापैकी 71 % व्यवसायाचा कमिन्ससारख्या कंपन्यांना फायदा होतो.

कमिन्सने पर्यायी इंधनावर लक्ष केंद्रित केलं आहे, मात्र अजूनही कंपनीचा बऱ्यापैकी व्यवसाय डिझेल इंजिनवर आधारित आहे. एका बाजूला पर्यायी इंधनाचा वापर वाढला तर पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी होईल. त्यामुळे, कमिन्सच्या जुन्या व्यवसायावर त्याचा नकारात्मक परिणाम होईल. पर्यायी इंधनामध्ये नक्की कोणत्या कॅटेगरीला सर्वाधिक यश मिळेल, ते आता सांगणं थोडं अवघड आहे. टेस्लासारख्या कंपन्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर अनेक लाख कोटी डॉलर्स खर्च करत आहेत. त्यामुळे, आटा अस्तित्वात नसलेली एखादी नवीनच टेक्नॉलॉजी आली आणि EV किंवा हायड्रोजन इंजिनचा व्यवसाय मागे पडला तर कमिन्ससारख्या कंपन्यांना ते महागात पडेल. त्यामुळे, या सेगमेंटकडे आपल्याला बारीक लक्ष ठेवावं लागेल. तसेच कंपनी सध्या कमिन्सच्या पॅरेण्ट कंपनीला 1.6% रॉयल्टी देते, यामध्ये वाढ झाली तर कमिन्स इंडियाच्या मार्जिनवर नकारात्मक परिणाम होईल.

कंपनी FY24 मध्ये ₹8,300 कोटी, FY25 मध्ये ₹9,500 कोटी आणि FY26 मध्ये ₹10,139 कोटी व्यवसाय करेल असा अंदाज आहे. दरम्यान, FY24 मध्ये अपेक्षित नफा ₹1,350 कोटी, FY25 मध्ये ₹1,500 कोटी आणि FY26 मध्ये ₹1,750 कोटी असण्याची शक्यता आहे. या आकडेवारीच्या आधारे, प्रति शेअर अपेक्षित कमाई (EPS) FY24 मध्ये ₹49, FY25 मध्ये ₹55 आणि FY26 मध्ये ₹63 होईल. 7 फेब्रुवारीची ₹2400 रुपये किंमत लक्षात घेता, FY26 च्या कमाईनुसार, त्याचा फॉरवर्ड P/E 35 पेक्षा जास्त आहे. सध्याच्या अर्निंग्सनुसार हा शेअर सध्या 50 च्या PE ला ट्रेड करतोय. म्हणजेच हा शेअर ओव्हर वॅल्यूड आहे.

 

टेक्नॉलॉजीच्या बाबतीत कमिन्स ग्रुप नेहमीच आघाडीवर राहिला आहे. मात्र, मागच्या 10 वर्षात कंपनीचं उत्पन्न आणि नफा केवळ दुप्पट झाला आहे. कंपनीने सातत्याने 15 टक्यापेक्षा जास्त रिटर्न ऑन इक्विटी मिळवला आहे, मात्र व्यवसाय वाढवण्यात कंपनीला अडचणी आल्या आहेत. मात्र, आता पर्यायी इंधनाचा वापर वाढला तर कंपनीच्या व्यवसायात चांगली वाढ होईल. या शेअरमध्ये SBI, ICICI आणि कोटकसारख्या नामांकित म्युच्युअल फंड्सची गुंतवणूक आहे. मात्र, या शेअर्ससाठी सगळ्यात मोठी अडचण आहे ती व्हॅल्युएशनची. या शेअरमध्ये 1600 ते 2400 रुपयाच्या रेंजमध्ये टप्याटप्याने गुंतवणूक केल्यास लॉन्ग टर्ममध्ये चांगला रिटर्न मिळू शकतो.

Published: February 27, 2024, 20:03 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App