Quarterly Results | Q3 आर्थिक निकालानंतर कोणत्या शेअर्समध्ये तेजी येणार?

जागतिक अर्थव्यवस्था अडचणीत असताना भारतातल्या कंपन्यांनी चांगली आर्थिक कामगिरी केली आहे. तज्ञांच्या मते, कंपन्यांच्या नफ्यामध्ये साधारण 10 टक्याची वाढ होणं अपेक्षित होतं, मात्र कंपन्यांच्या नफ्यामध्ये त्यापेक्षा जास्त वाढ झाली, त्यामुळे गुंतवणूकदारांची निराशा झाली नाही.

आर्थिक वर्ष 2023 24 च्या तिसऱ्या त्रैमासिकाचे आर्थिक निकाल आता जाहीर झाले आहेत. जागतिक अर्थव्यवस्था अडचणीत असताना भारतातल्या कंपन्यांनी चांगली आर्थिक कामगिरी केली आहे. तज्ञांच्या मते, कंपन्यांच्या नफ्यामध्ये साधारण 10 टक्याची वाढ होणं अपेक्षित होतं, मात्र कंपन्यांच्या नफ्यामध्ये त्यापेक्षा जास्त वाढ झाली, त्यामुळे गुंतवणूकदारांची निराशा झाली नाही. अपेक्षेपेक्षा खूप कमी वाढ झाली असती तर मार्केटवर त्याचा नकारात्मक परिणाम पाहायला मिळाला असता. मात्र, असं काहीच झालं नाही, निफ्टी आणि सेन्सेक्स त्यांच्या उच्चांकाजवळ ट्रेड करत आहेत. सबंध मार्केटची कामगिरी चांगली होती, मात्र यामध्ये कोणत्या सेक्टरमध्ये आऊट परफॉर्मन्स पाहायला मिळाला आणि कोणत्या सेक्टरने निराशा केली, ते आता जाणून घेऊया. तसेच कोणत्या सेक्टरमध्ये आता गुंतवणुकीची संधी आहे ते देखील समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांच्या मते, डिसेंबर त्रैमासिकात निफ्टी50 कंपन्यांच्या नफ्यात 17% वार्षिक वाढ दिसून आली तर अपेक्षित आकडा केवळ 11% होता. मात्र, ही वाढ सर्वसमावेशक नव्हती. या वाढीमध्ये सर्वाधिक वाटा टाटा मोटर्स, HDFC बँक, टाटा स्टील, ICICI बँक आणि JSW स्टील या 5 कंपन्यांचा होता. एकूण वाढीमध्ये या 5 कंपन्यांचं वेटेज तब्बल 56% होतं. एप्रिल ते डिसेंबर 2023 या 9 महिन्यांचा विचार केल्यास, निफ्टीमधील कंपन्यांचा एकत्रित नफा 26 टक्याने वाढला आहे. पुढच्या काही त्रैमासिकात चांगली कामगिरी अपेक्षित असल्यामुळे, मोतीलाल ओसवाल यांनी टाटा मोटर्स, कोल इंडिया, हीरो मोटोकॉर्प, सिप्ला आणि भारती एअरटेलला अपग्रेड केलं आहे, आर्थिक वर्ष 2025 साठी या कंपन्यांच्या नफ्याचा अंदाज वाढवण्यात आला आहे. तर दुसरीकडे, निराशाजनक कामगिरीनंतर, मोतीलाल ओसवाल यांनी UPL, LTI Mindtree, ITC, Divi’s Labs आणि HUL ला डाउनग्रेड केलं आहे. निफ्टीमधील कंपन्यांची कामगिरी आपण समजून घेतली पण कोणत्या सेक्टरच्या अर्निंग्समध्ये मार्केटपेक्षा जास्त वाढ होणं अपेक्षित आहे, ते आता जाणून घेऊया.

तिसऱ्या त्रैमासिकात, मार्केटमध्ये 3,381 कंपन्यांच्या उत्पन्नात सरासरी वार्षिक 8.2% वाढ झाली आहे, तर मागच्या वर्षी याच त्रैमासिकात, या कंपन्यांच्या उत्पन्नात 17.3% वाढ झाली होती, म्हणजे यावर्षीपेक्षा मागच्या वर्षीची कामगिरी चांगली होती. आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तीन त्रैमासिकात कंपन्यांच्या उत्पन्नात अनुक्रमे 5.3%, 5.9% आणि 8.2% वाढ झाली आहे……… मात्र, बँका आणि NBFCs ना बाजूला ठेवलं तर ही वाढ केवळ 0.9%, 1.6% आणि 4.5% आहे. उत्पन्नात चांगली वाढ झाली नाहीये, हे आपल्याला या आकडेवारीतून लक्षात येत आहे, मात्र कंपन्यांच्या नफ्यात खूप चांगली वाढ झाली आहे. या त्रैमासिकात कंपन्यांच्या उत्पन्नात केवळ 8.2% वाढ झाली आहे, मात्र त्यांचा नफा तब्बल 25 टक्याने वाढला आहे. सेक्टर्सचा विचार केला तर ऑटो, फायनान्शियल, कॅपिटल गुड्स, हेल्थकेअर, फार्मा, टेलिकॉम, बिल्डिंग मटेरियल, मेटल आणि ऑइल अँड गॅस कंपन्यांचे निकाल अंदाजापेक्षा चांगले आहेत. ब्रोकिंग हाऊस प्रभुदास लिलाधर यांच्या मते, QSR म्हणजेच क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स, रिटेल आणि कंझ्युमर ड्युरेबल कंपन्यांना फटका बसला आहे. विशेष म्हणजे 26 त्रैमासिकानंतर म्हणजेच तब्बल साडे आठ वर्षानंतर, प्रथमच आयटी कंपन्यांच्या उत्पन्नात घसरण झाली आहे.

स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टचे रिसर्च हेड संतोष मीना यांच्या मते, “पीएसयू बँकांचे निकाल सर्वात मजबूत आहेत… तसेच, ऑटो, कंजम्पशन, कॅपिटल गुड्स, हॉटेल आणि फार्मा सेक्टरमध्ये चांगली वाढ झाली आहे… केमिकल सेक्टरमध्ये सर्वाधिक निराशा झाली. IT कंपन्यांच्या नफ्यामध्ये घसरण झाली, मात्र हे शेअर्स खूप खाली आले होते, त्यामुळे गुंतवणूकदारांनी व्हॅल्यू बाईन्ग केलं आणि IT शेअर्समध्ये तेजी आली. तिसऱ्या त्रैमासिकाच्या आर्थिक कामगिरीच्या आधारे कोणते शेअर्स खरेदी केले पाहिजे, ते आता जाणून घेऊया. SBI, Cipla, Archean Chemical, Sonata Software, and Engineers India या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास चांगला रिटर्न मिळेल, असं संतोष मीना यांचं मत आहे. त्यांनी SBI साठी 880 आणि 1000 रुपयाचं टार्गेट दिलं आहे, तर सिप्लासाठी 1700 रुपये, सोनाटा सॉफ्टवेअरसाठी 1100 रुपये, आर्कियन केमिकलसाठी ₹1000 आणि इंजिनियर्स इंडियासाठी ₹310 चं टार्गेट देण्यात आलं आहे, मात्र यासाठी गुंतवणुकीचा कालावधी 12 ते 15 महिने असावा असं त्यांचं मत आहे. तुम्हाला खूप जास्त जोखीम घ्यायची नसेल तर याच शेअर्समध्ये योग्य स्टॉपलॉसचा वापर करून ब्रेकआऊट ट्रेडिंग केलं तर चांगला रिटर्न मिळू शकतो. पुढच्या 3 वर्षाचा विचार केल्यास, प्रायव्हेट बँकांची आर्थिक कामगिरी चांगली राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे HDFC बँक आणि कोटक बँकेच्या शेअर्समध्ये व्हॅल्यू बाईन्ग केल्यास चांगला रिटर्न मिळू शकतो.

Published: March 5, 2024, 10:00 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App