इन्फ्रा फंड्स - गुंतवणुकीसाठी योग्य?

इन्फ्रा सेक्टर संदर्भात नरेंद्र मोदी सरकार अतिशय सिरिअस आहे. नुसत्याच मोठ्या मोठ्या घोषणा न करता, प्रोजेक्ट पूर्ण कसे होतील याकडे सरकारचं विशेष लक्ष आहे.नितीन गडकरी आणि अश्विनी वैष्णव यांच्यासारखे मंत्री त्यांच्या एक्सीक्युशनसाठी ओळखले जातात. एवढंच नाहीतर बजेटमधून आपल्या डिपार्टमेंटसाठी जास्तीतजास्त फंडिंग मिळवण्याचं कौशल्य या मंत्र्यांकडे आहे. भारतातला इन्फ्रा सेक्टर पुढचे अनेक वर्ष वाढणार यामध्ये काहीच शंका नाहीये. मात्र, इन्फ्रा शेअर्समध्ये डायरेक्ट गुंतवणूक करण्यात जास्त जोखीम आहे.

भारत हा असा देश आहे, जिथे प्रत्येक सेक्टरमध्ये वाढ होतीये. मात्र, भारतात असे काही सेक्टर्स आहेत ज्यांची वाढ आत्ताच चालू झाली आहे. कोणताही ट्रेंड चालू झाल्यावर पहिल्या काही वर्षात आपण त्या सेक्टरमध्ये गुंतवणूक केली, तर सर्वाधिक फायदा मिळवता येतो. 1990 च्या दशकात IT, 2000 च्या दशकात प्रायव्हेट बँका, 2010 नंतर फार्मा सेक्टरमध्ये जशी वाढ झाली तशीच वाढ पुढच्या काही वर्षात काही ठराविक सेक्टर्समध्ये होऊ शकते. पण नक्की कोणत्या सेक्टरमध्ये खूप जास्त फायदा मिळेल, याचं प्रेडिक्शन करणं थोडं अवघड आहे, मात्र ते अशक्य मात्र नक्कीच नाहीये. पुढच्या 10 20 किंवा 30 वर्षाचा विचार केल्यास, भारतात इन्फ्रा, डिफेन्स, मॅन्युफॅक्चरिंग, इथेनॉल, ग्रीन एनर्जी, इलेक्ट्रिक वेहिकल यासारख्या सेक्टरमध्ये सर्वाधिक वाढ होऊ शकते. इन्फ्रा सेक्टर संदर्भात नरेंद्र मोदी सरकार अतिशय सिरिअस आहे. नुसत्याच मोठ्या मोठ्या घोषणा न करता, प्रोजेक्ट पूर्ण कसे होतील याकडे सरकारचं विशेष लक्ष आहे. नितीन गडकरी आणि अश्विनी वैष्णव यांच्यासारखे मंत्री त्यांच्या एक्सीक्युशनसाठी ओळखले जातात. एवढंच नाहीतर बजेटमधून आपल्या डिपार्टमेंटसाठी जास्तीतजास्त फंडिंग मिळवण्याचं कौशल्य या मंत्र्यांकडे आहे. भारतातला इन्फ्रा सेक्टर पुढचे अनेक वर्ष वाढणार यामध्ये काहीच शंका नाहीये. मात्र, इन्फ्रा शेअर्समध्ये डायरेक्ट गुंतवणूक करण्यात जास्त जोखीम आहे.

इन्फ्रा कंपन्यांना त्यांचा बराच व्यवसाय सरकारकडून मिळतो. हा B2G बिझनेस असल्यामुळे, जोखीम जास्त आहे. तसेच, कंपनीची मॅनेजमेंट विश्वास ठेवण्या लायक आहे का, त्यांचं अकॉउंटिंग व्यवस्थित आहे का, कंपनीवर कर्ज किती आहे यासारख्या अनेक गोष्टींकडे लक्ष देऊन इन्फ्रा शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे. एवढंच नाहीतर या शेअर्समध्ये बाय अँड होल्ड ही स्ट्रॅटेजी रिस्की आहे, कारण एखादी कंपनी अडचणीत आली तर पूर्ण कॅपिटल बुडायला फार वेळ लागत नाही. भारतात अश्या अनेक इन्फ्रा कंपन्या होत्या, ज्या एकेकाळी ब्ल्यू चिप होत्या, मात्र आता त्या शेअरच्या किमती शून्य झाल्या आहेत. त्यामुळे, या शेअर्सवर कायम लक्ष ठेवावं लागतं. म्हणूनच, इन्फ्रा थीमचा फायदा करून घ्यायचा असेल तर आपण म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतो. भारतात अनेक शेअर्सची किंमत शून्य झाली आहे, मात्र असा एकही म्युच्युअल फंड नाहीये ज्यामध्ये गुंतवणूकदारांचं पूर्ण भांडवल बुडालं आहे.

इन्फ्रा फंड हा सेक्टर फंडचा एक प्रकार आहे. सेक्टर फंड एका विशिष्ट सेक्टरमधील शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. एकाच सेक्टरमध्ये सगळी गुंतवणूक असल्यामुळे, हे फंड जास्त रिस्की असतात. मात्र, या फंडमध्ये SIP च्या माध्यमातून गुंतवणूक केली तर जोखीम कमी करता येते. मागच्या काही वर्षात इन्फ्रा कंपन्यांचा व्यवसाय अतिशय झपाट्याने वाढला आहे. त्यांच्या ऑर्डर बुकमध्ये आणि प्रॉफिट मार्जिनमध्ये चांगली सुधारणा झाली आहे, त्याचा सकारात्मक परिणाम इन्फ्रा शेअर्स आणि इन्फ्रा म्युच्युअल फंड्सवर पाहायला मिळाला. SBI इन्फ्रास्ट्रक्चर फंड, HDFC इन्फ्रा फंड आणि ICICI इन्फ्रा फंडने मागच्या 1 वर्षात 60 ते 75% रिटर्न दिला आहे. विशेष म्हणजे 3 आणि 5 वर्षाचा विचार केला तर या फंड्सनी 20 टक्यापेक्षा जास्त वार्षिक रिटर्न दिला आहे. इन्फ्रा कंपन्या, EPC कॉन्ट्रॅक्टर, रिअल इस्टेट कंपन्या, सिमेंट कंपन्या आणि या कंपन्यांना फंडिंग करणाऱ्या वित्तीय संस्था अश्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये इन्फ्रा फंड गुंतवणूक करतात. या फंड्सचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे, महिन्याला 500 किंवा 1000 रुपयापासून आपण यामध्ये गुंतवणूक करू शकतो. एकंदरीत विचार केल्यास, भारतातला इन्फ्रा सेक्टर पुढचे अनेक वर्ष वाढणार आहे. त्यामुळे, इन्फ्रा फंड्समध्ये SIP च्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास चांगला रिटर्न मिळू शकतो. 2027 ते 2029 च्या दरम्यान शेअर मार्केटमध्ये मोठा क्रॅश येऊ शकतो. असं झाल्यास सर्व इक्विटी फंड्समध्ये तात्पुरता लॉस होईल, मात्र त्यावेळेला न घाबरता SIP चालू ठेवा म्हणजे पुढच्या तेजीमध्ये चांगली वेल्थ क्रिएट करता येईल.

Published: March 16, 2024, 13:04 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App