स्मॉलकॅप शेअर्समध्ये घसरण ! धोका की गुंतवणुकीची संधी?

आपण स्मॉल आणि मिडकॅप शेअर्स आणि म्युच्युअल फंडमध्ये प्रॉफिट बुक करावा का, तसेच नवीन SIP थांबवण्याची गरज आहे का, का हि नवीन गुंतवणुकीची संधी आहे, असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात आहे. चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया.

मागच्या काही महिन्यात अनेक नवीन गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक चालू केली आहे. त्याच बरोबर अनेक गुंतवणूकदार डिमॅट अकॉउंट उघडून शेअर मार्केटमध्ये नशीब आजमावत आहेत. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे अचानक एवढ्या मोठ्या संख्येने गुंतवणूकदार म्युच्युअल फंड्स आणि शेअर मार्केटमध्ये एंट्री का करत आहेत. यामागे सर्वात महत्वाचं कारण आहे पास्ट परफॉर्मन्स. मागच्या 6 किंवा 12 महिन्यात जर शेअर मार्केटची कामगिरी चांगली असेल तर नवीन गुंतवणूकदार शेअर मार्केटकडे आकर्षित होतात. त्याच बरोबर जे जुने गुंतवणूकदार आहेत, त्यांना पूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर चांगला रिटर्न मिळत असतो, त्यामुळे त्यांच्या कॉन्फिडन्समध्ये वाढ होते. कधी कधी या कॉन्फिडन्सचं रूपांतर ओव्हर-कॉन्फिडन्स मध्ये होतं. असे प्रकार इतिहासात अनेकदा झाले आहेत, त्यामुळे मार्केटमध्ये बबल तयार होऊ नये, यासाठी सेबी आणि अँफीसारख्या संस्था आणि म्युच्युअल फंड कंपन्या आणि डिस्ट्रिब्युटर प्रयत्न करतात. अनेक वर्षानंतर भारतात इक्विटी कल्चर तयार झालं आहे, त्याला कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये अशी सर्वांचीच इच्छा आहे. ओव्हर-व्हॅल्युएशन आणि मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गुंतवणुकीमुळे सेबीने या संदर्भात चिंता व्यक्त केली. मात्र, यामुळे आपण स्मॉल आणि मिडकॅप शेअर्स आणि म्युच्युअल फंडमध्ये प्रॉफिट बुक करावा का, तसेच नवीन SIP थांबवण्याची गरज आहे का, का हि नवीन गुंतवणुकीची संधी आहे, असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात आहे. चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया.

सगळ्यात आधी आपण डेबीच्या चिंतेमागचं कारण समजून घेऊया. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया म्हणजेच (AMFI) च्या आकडेवारीनुसार जानेवारीच्या अखेरीस, स्मॉल-कॅप फंडच्या (AUM) चा आकडा 2.48 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता, मागच्या वर्षी याच महिन्यात हाच आकडा 1 लाख 31 हजार कोटी इतका होता. म्हणजेच केवळ 1 वर्षात स्मॉलकॅप फंड्सच्या AUM मध्ये तब्बल 89 % वाढ झाली आहे. दुसऱ्या बाजूला, मिड-कॅप फंडच्या AUM चा आकडा 1.83 लाख कोटींवरून वाढून रु. 2.90 लाख कोटी झाला आहे, म्हणजेच यामध्ये 58 % वाढ झाली आहे.

Samco MF च्या रिसर्चनुसार… स्मॉल-कॅप फंडची AUM म्हणजेच Rs 2.48 लाख कोटी हा आकडा आता लार्ज-कॅप फंडच्या AUM च्या जवळपास 83% झाला आहे, सध्या लार्ज कॅप फंडच्या AUM चा आकडा 2.99 लाख कोटी रुपये आहे. ऑगस्ट 2021 हा रेशिओ केवळ 44% होतो… लार्जकॅप च्या तुलनेत स्मॉल आणि मिडकॅप शेअर्समध्ये एवढी मोठी तेजी आल्यामुळे या सेगमेंटमध्ये बबल तयार होतोय हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही. म्हणूनच सेबीच्या चेअरमन माधवी पुरी बूच यांनी या संदर्भात चिंता व्यक्त केली. त्यानंतर, अनेक म्युच्युअल फंड्सनी स्मॉलकॅप फंड्समध्ये एकरकमी गुंतवणूक न घेण्याचा निर्णय घेतला. तसेच, SIP च्या माध्यमातून होणाऱ्या गुंतवणुकीला प्रति महिना साधारण 2 लाख रुपयाची मर्यादा घातली. अश्या प्रकारे विविध उपाय योजना केल्यामुळे स्मॉलकॅप शेअर्समधील तेजीला तात्पुरता ब्रेक लागला आहे. मागच्या 3 महिन्यात मनी9 मराठीने या ओव्हर व्हॅल्युएशन बद्दल प्रेक्षकांना अनेक वेळेला सावध केलं आहे.

 

आता स्मॉलकॅप फंड्समध्ये किंवा शेअर्समध्ये नव्याने गुंतवणूक चालू करावी का ते जाणून घेऊया. 1 डिसेंबर 2022 ला आम्ही मनी9 मराठीवर स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी तेजी येणार असं भाकीत केलं होतं. त्यानंतर, केवळ 1 वर्षातच स्मॉलकॅप इंडेक्स जवळपास 80% वाढला. त्याच व्हिडीओमध्ये आम्ही हे देखील सांगितलं होतं कि निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्स 2027 पर्यंत 25000 च्या वर जाऊ शकतो, हा इंडेक्स सध्या ट्रेड करतोय 14800 ला. म्हणजेच सध्याच्या किमतीपासून या इंडेक्समध्ये आणखी 70 ते 80 % तेजी येऊ शकते. मात्र, असं असलं तरी स्मॉलकॅप फंड्समध्ये आता नवीन गुंतवणूकदारांनी एकरकमी किंवा SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करू नये, असा आमचा सल्ला आहे. यामागे कारण काय आहे ते व्यवस्थित समजून घ्या. स्मॉलकॅप इंडेक्स मोठ्या क्रॅशमध्ये उच्चांकापासून साधारण 70% खाली येतो, असं आपण ऐतिहासिक आकडेवारीतून पाहिलं आहे. म्हणजेच निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्स अगदी 25000 किंवा 30000 पर्यंत जरी गेला आणि तिथून 70 % घसरण झाली तर हा इंडेक्स आत्ताच्या किमतीपेक्षा खाली येऊ शकतो. म्हणजे आटा गुंतवणूक चालू करणाऱ्या गुंतवणूकदारांना पुढच्या 5 वर्षात काहीच रिटर्न मिळणार नाही, असा आमचा अंदाज आहे.

स्मॉलकॅप इंडेक्स पुढचे 2 ते 3 वर्ष वाढू शकतो, पण त्यानंतर तो खाली देखील येऊ शकतो. त्यामुळे, लॉन्ग टर्मसाठी गुंतवणूक करण्यात खूप जास्त फायदा नाहीये. मात्र, या संधीचा फायदा करून घ्यायचा असेल तर आपण स्विंग ट्रेडिंग करू शकतो. यामध्ये शेअर्स साधारण 1 महिना ते 1 वर्षापर्यंत होल्ड केले जातात. स्विंग ट्रेडिंगमध्ये आपण सुपरट्रेंड किंवा मुविंग एव्हरेजसारख्या इंडिकेटरचा वापर करून जोखीम कमी करू शकतो. अश्या पद्धतीने स्टॉपलॉस लावला तर क्रॅशमध्ये आपल्याला मोठं नुकसान होणार नाही.

Published: March 19, 2024, 16:41 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App