डिजिटल सेविंग अकॉउंट - खर्च कमी, फायदे जास्त

डिजिटल सेविंग अकॉउंट हे एक ऑनलाईन सेविंग अकॉउंट आहे. आपण ते बँकेच्या वेबसाईटवर किंवा अँप डाउनलोड करून उघडू शकतो. आपल्या हातात असणाऱ्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून आपण हे अकॉउंट अगदी सहज उघडू शकतो. सामान्य सेविंग अकॉउंटप्रमाणे यावर देखील आपल्याला व्याज मिळतं.

प्रगतीला नवीन सेविंग अकॉउंट उघडायचं होतं… मागच्या 3 महिन्यापासून अकॉउंट उघडायचं म्हणून ती बँकेत जाण्याचा प्लॅन करतीये, पण ऑफिसच्या कामामुळे तिला बँकेत जायला जमलं नाही. त्यातच, मार्च महिन्यात बँकांना बऱ्याच सुट्ट्या आहेत. या संदर्भात ती मित्रांसोबत चर्चा करत होती. मला अनेक दिवसांपासून सेविंग अकॉउंट उघडायचं आहे, असं तिने मुदितला सांगितलं. पण प्रगती तुला केवळ सेविंग अकॉउंट उघडायचं असेल तर त्यासाठी ब्रँचला जाण्याची काय गरज आहे, असं मुदित तिला विचारतो. तू घरात बसून देखील पाहिजे ते सेविंग अकॉउंट उघडू शकतेस, अशी माहिती त्याने प्रगतीला दिली. हे ऐकून प्रगतीला थोडा दिलासा मिळाला. तिने लगेच बँकेच्या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरला आणि प्रोसेस चालू केली. अवघ्या 10 मिनिटात तिचं अकॉउंट ऍक्टिव्ह झालं, तिला लगेच अकॉउंट नंबरदेखील मिळाला. डेबिट कार्ड आणि चेक बुक कुरिअरने घरी येईल, असा मेलदेखील तिला आला. ज्या कामासाठी आपण 3 महिने घालवले ते घरबसल्या झालं आणि तेही 10 मिनिटात म्हणून प्रगतीला आनंद झाला. तिने जे सेविंग अकॉउंट उघडलं आहे त्याला डिजिटल सेविंग अकॉउंट म्हणतात. डिजिटल अकॉउंट कसं काम करतं, इतर अकॉउंटच्या तुलनेत या अकॉउंटचे नियम वेगळे आहेत का आणि त्याचे फायदे काय आहेत ते आता जाणून घेऊया.

डिजिटल सेविंग अकॉउंट हे एक ऑनलाईन सेविंग अकॉउंट आहे. आपण ते बँकेच्या वेबसाईटवर किंवा अँप डाउनलोड करून उघडू शकतो. आपल्या हातात असणाऱ्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून आपण हे अकॉउंट अगदी सहज उघडू शकतो. सामान्य सेविंग अकॉउंटप्रमाणे यावर देखील आपल्याला व्याज मिळतं. ग्राहकांचा वेळ वाचावा आणि त्यांना घर बसल्या अकॉउंट उघडता यावं म्हणून बँकांनी टेक्नॉलॉजीचा वापर करून डिजिटल सेविंग अकॉउंट लॉन्च केले आहेत. यामुळे, ग्राहकांसोबतच बँकेच्या कर्मचाऱ्यांचा वेळ वाचतो आणि बँकेचा खर्च कमी होतो. सध्या सगळ्या गोष्टी आधारला लिंक असतात, त्यामुळे आपल्याकडे केवळ आधार नंबर असेल तर हे अकॉउंट उघडता येतं. यामुळे, बँकेत जाण्याचा वेळ वाचतो, मोठे मोठे फॉर्म भरायची कटकट राहत नाही, तसेच बँकेत जाऊन लाईनमध्ये थांबून गैर-सोयदेखील होतं नाही. मात्र, डिजिटल सेविंग अकॉउंट उघडताना आपल्याला व्हिडीओ KYC करावी लागते. आता डिजिटल सेविंग अकॉउंटचा फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.

डिजिटल सेविंगचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हा सर्वात कमी खर्च असणारा पर्याय आहे. या अकॉउंट बरोबर व्हर्च्युअल डेबिट कार्ड मिळतं. सध्याच्या काळात आपण डेबिट कार्डचा वापर करत नाही. मात्र, आपल्या नॉर्मल सेविंग अकॉउंट बरोबर आपल्याला सक्तीने डेबिट कार्ड दिलं जातं आणि बँक आपल्याकडून त्यासाठी वार्षिक शुल्क आकारते. डिजिटल सेविंग अकॉउंटमध्ये आपल्याला व्हर्च्युअल डेबिट कार्ड मिळतं जे पूर्णपणे विनामूल्य असतं. पण आपल्याला फिसिकल डेबिट कार्ड घ्यायचं असेल तर अतिरिक्त शुल्क भरून आपण ते घेऊ शकतो. यासाठी, आपल्याला मोबाईल ॲपवर किंवा नेट बँकिंगद्वारे विनंती करावी लागेल किंवा कस्टमर केअर नंबरवर कॉल करावा लागेल… डिजिटल अकॉउंटचा आणखी एक फायदा म्हणजे यामध्ये NEFT, IMPS आणि RTGS सारखे सर्व ऑनलाइन व्यवहार विनामूल्य आहेत… त्यामुळे, कोणत्याही शुल्काच्या आकारणीची चिंता न करता, तुम्ही तुम्हाला हवे तितके पेमेंट आणि फंड ट्रान्सफर करू शकता… शिवाय, तुम्हाला मोफत ईमेल आणि SMS अलर्टची सुविधा देखील मिळते. तसेच, या अकॉउंटमधून केलेल्या खर्चावर बँक आपल्याला आकर्षक रिवॉर्ड पॉईंट्स आणि कॅशबॅक देखील देऊ शकते. आता काळ बदलला आहे, सगळ्या गोष्टींमध्ये आपण अपग्रेड करतोय, त्यामुळे आपलं सेविंग अकॉउंट देखील अपग्रेड करायला काहीच हरकत नाहीये. तुम्हाला किंवा तुम्हाला तुमच्या घरातल्या लोकांना सेविंग अकॉउंट उघडायचं असेल तर आता ब्रँचमध्ये जाऊन वेळ घालवू नका, घरबसल्या डिजिटल सेविंग अकॉउंट उघडा, तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचवा.

Published: March 22, 2024, 16:34 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App