लिक्विड फंड्स - क्योंकी हर एक रुपैय्या जरुरी होता हैं !

पूर्वी बरेच लोकं रीमाप्रमाणे सेविंग अकॉउंटमध्ये पैसे ठेवायचे. मात्र आता काळ बदलला आहे. टेक्नॉलॉजीमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. UPI, नेट बँकिंग, T+0 सेटलमेंटसारख्या गोष्टींमुळे गुंतवणुकीचं विश्व पूर्णपणे बदललं आहे. मग अश्या परिस्थितीत सेविंग अकॉउंटला दुसरा चांगला पर्याय आहे का, ते आपण जाणून घेतलं पाहिजे.

रीमा तिच्या सेविंग अकॉउंटमध्ये नेहमी साधारण 1 लाख रुपये ठेवते. कधी अचानक गरज पडली तर लगेच पैसे काढता आले पाहिजे, असा तिचा हेतू आहे. मात्र, सेविंग अकॉउंटवर तिला केवळ पावणे तीन टक्के व्याज मिळतंय. FD केली तर जास्त व्याज मिळेल, मात्र FD साठी निश्चित मुदत असते. चांगलं व्याज पाहिजे असेल तर कमीतकमी 1 वर्षासाठी FD करावी लागते. अचानक पैशाची गरज पडली तर पूर्ण FD मोडावी लागते. आपलेच पैसे आपण लवकर काढले म्हणून बँक आपल्याला पेनल्टी लावते. म्हणून रीमा ही रक्कम सेविंग अकॉउंट मध्ये ठेवते. पण वर्षभर 1 लाख रुपये सेविंग अकॉउंटमध्ये ठेवले तर तिला केवळ 2750 रुपये व्याज मिळेल. पूर्वी बरेच लोकं रीमाप्रमाणे सेविंग अकॉउंटमध्ये पैसे ठेवायचे. मात्र आता काळ बदलला आहे. टेक्नॉलॉजीमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. UPI, नेट बँकिंग, T+0 सेटलमेंटसारख्या गोष्टींमुळे गुंतवणुकीचं विश्व पूर्णपणे बदललं आहे. मग अश्या परिस्थितीत सेविंग अकॉउंटला दुसरा चांगला पर्याय आहे का, ते आपण जाणून घेतलं पाहिजे.

रीमाने 1 लाख रुपयाचा इमर्जन्सी फंड सेविंग अकॉउंटमध्ये ठेवला आहे, मात्र मागच्या 3 वर्षाचा विचार केला तर असं लक्षात आलं कि तिने यापैकी जास्तीतजास्त 20000 रुपयेच वापरले आहेत. म्हणजे उर्वरित 80000 रुपयाची तिला मागच्या 3 वर्षात गरज पडली नाही. पण आपल्याला या पैशाची कधीही गरज पडू शकते अशी भीती तिच्या मनात आहे. तिने जर हे 1 लाख रुपये लिक्विड फंड किंवा ओव्हरनाईट फंडसारख्या एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये ठेवले असते, तर तिला त्यावर सरासरी 6% वार्षिक रिटर्न मिळाला असता, जो सेविंग अकॉउंटपेक्षा 3% जास्त आहे. 1 लाखावर 3% म्हणजे झाले 3000 रुपये, 3 वर्षाचा विचार केला तर तिला ओव्हरनाईट किंवा लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक करून 9000 रुपयाचा अतिरिक्त फायदा झाला असता. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे, या ओव्हरनाईट किंवा लिक्विड फंडमध्ये सेविंग अकॉउंट इतकीच लिक्विडी आहे का? कारण रिटर्न जास्त मिळतोय, पण वेळेला पैसे नाही काढता आले तर त्याचा काय उपयोग, असा विचार अनेक गुंतवणूकदार करतात. पण या संदर्भात काळजी करायचं काहीच कारण नाहीये, लिक्विड फंडमधून एका क्लिकवर कधीही पैसे काढता येतात. शनिवार, रविवार, बँक हॉलिडे, सकाळी, दुपारी, रात्री, पहाटे अश्या कोणत्याही वेळेला आणि कोणत्याही दिवशी आपण लिक्विड फंडमधून पैसे काढू शकतो. यासाठी बऱ्याच म्युच्युअल फंड्सनी इन्स्टंट रिडेम्पशनची सुविधा दिली आहे.

आदित्य बिर्ला, ऍक्सिस, ICICI, निप्पोन, सुंदरम आणि SBI सारख्या म्युच्युअल फंड कंपन्यांनी एका दिवसात तात्काळ 50000 रुपयांपर्यंत रक्कम लिक्विड फंडमधून काढण्याची सुविधा दिली आहे. दिवसाला 50000 रुपये किंवा एकूण गुंतवणुकीच्या 90%, यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम गुंतवणूकदार अगदी 30 सेकंदात लिक्विड फंड्समधून काढू शकतात. म्युच्युअल फंड कंपनीची वेबसाईट, अँप किंवा तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केली आहे, तिथे जाऊन एका क्लिकवर तुम्ही ही रक्कम सहज काढू शकता. रिडेम्पशनची रिक्वेस्ट टाकल्यावर पैसे लगेच आपल्या बँक अकॉउंटमध्ये जमा होतात. या सुविधेमुळे, गुंतवणूकदारांना सेविंग अकॉउंटची लिक्विडीटी आणि FD सारखं व्याज, हे दोन्हीही फायदे मिळतात. रिटर्नचा विचार केला तर लिक्विड फंड्सनी मागच्या 1 वर्षात 6 ते 7% रिटर्न दिला आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांनी या इन्स्टंट रिडेम्पशनच्या सुविधेला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. तुम्ही देखील अजूनही तुमचा इमर्जन्सी फंड सेविंग अकॉउंटमध्ये ठेवत असाल, तर आता त्यातली काही रक्कम लिक्विड फंडमध्ये गुंतवण्याचा विचार करा. कारण आज कमावलेला प्रत्येक रुपया आपलं भविष्य घडवण्यासाठी कामी येईल.

Published: April 1, 2024, 13:23 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App