ICICI Commodity Fund - गुंतवणुकीसाठी योग्य?

सबंध कमोडिटी मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळतिये. चांदीचा रेट 80000 रुपयाच्या वर गेला आहे, क्रूड ऑइल, कॉपरसारख्या अनेक कमोडिटीमध्ये तेजीचे संकेत मिळाले आहेत. कमोडिटीची इक्विटीप्रमाणे एक सायकल असते. त्यामुळे, कमोडिटी मार्केटमध्ये एकदा तेजी चालू झाली कि ती शक्यतो अनेक वर्ष चालू शकते. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या संधीचा आपण फायदा कसा करून घ्यायचा, चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

सोन्याने मागच्या आठवड्यात 70000 रुपयाचा महत्वाचा टप्पा पार केला. मागच्या 6 महिन्यात सोन्याच्या किमतींमध्ये जवळपास 25% वाढ झाली आहे. सेंट्रल बँकांकडून सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी चालू आहे. त्यामुळे, सोन्याने आंतरराष्ट्रीय बाजारात 2250 डॉलरचा ऑल टाइम हाय क्रॉस केला. सोन्याने आंतरराष्ट्रीय बाजारात 2011 साली 1920 डॉलरचा उच्चांक नोंदवला होता, मात्र त्यानंतर सोन्यामध्ये घसरण चालू झाली. 2010 ते 2023 या 14 वर्षात सोन्याने मंथली चार्टवर कप अँड हॅण्डल पॅटर्न बनवला आहे, ज्याचा ब्रेकआऊट नुकताच मिळाला आहे. पॅटर्न टार्गेटचा विचार केल्यास, सोन्याचा रेट पुढच्या 3 वर्षात 88000 रुपये प्रति तोळा पर्यंत जाऊ शकतो. मात्र, महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे ही तेजी केवळ सोन्यापुरतीच मर्यादित नाहीये. सबंध कमोडिटी मार्केटमध्ये अश्याच प्रकारची तेजी पाहायला मिळतिये. चांदीचा रेट 80000 रुपयाच्या वर गेला आहे, क्रूड ऑइल, कॉपरसारख्या अनेक कमोडिटीमध्ये तेजीचे संकेत मिळाले आहेत. कमोडिटीची इक्विटीप्रमाणे एक सायकल असते. त्यामुळे, कमोडिटी मार्केटमध्ये एकदा तेजी चालू झाली कि ती शक्यतो अनेक वर्ष चालू शकते. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या संधीचा आपण फायदा कसा करून घ्यायचा, चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

या संधीचा फायदा करून घ्यायचा असेल तर आपण ICICI च्या कमोडिटी फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो. हा एक थिमेटिक फंड आहे जो ऑइल अँड गॅस, एनर्जी, केमिकल्स, पेट्रोलियम, पॉवर आणि मेटल सेक्टरच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. ICICI ने या फंडमध्ये 2 महत्वाचे बदल केले आहेत. पहिला बदल म्हणजे हा फंड पूर्वी एनर्जी शेअर्समध्ये गुंतवणूक करत नव्हता, मात्र आता एनर्जी सेक्टरमध्ये असणारी संधी लक्षात घेता फंड हाऊसने यामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरा निर्णय त्यांनी घेतला आहे तो म्हणजे सिल्वर ETF मध्ये गुंतवणूक करण्याचा. तुमच्यासमोर जो चार्ट दिसतोय तो सिल्वरचा विकली चार्ट आहे. हा चार्ट बघितला तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे सिल्वर आता अतिशय महत्वाच्या रेसिस्टन्सजवळ ट्रेड करतंय. या रेसिस्टन्स जवळ सिल्वरने अनेक महिने कन्सॉलिडेट केलं आहे, त्यामुळे आता चांदीमध्ये मोठा ब्रेकआऊट होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास, चांदीच्या रेटमध्ये मोठी तेजी येईल आणि ICICI कमोडिटी फंडला त्याचा फायदा होईल.

या फंडने सर्वाधिक गुंतवणूक जिंदाल ग्रुपच्या शेअर्समध्ये केली आहे. जिंदाल स्टील अँड पॉवर, जिंदाल स्टेनलेस आणि JSW एनर्जी या 3 शेअर्समध्ये पोर्टफोलिओ एलॉकेट करण्यात आला आहे. तसेच, टाटा स्टील, अंबुजा सिमेंट आणि अल्ट्राटेक सिमेंटसारख्या ब्ल्यू चिप शेअर्सचा या पोर्टफोलिओमध्ये समावेश आहे. भारतात मोदी सरकार पायाभूत सेवांच्या विकासासाठी म्हणजेच इन्फ्रा सेक्टरवर अनेक लाख कोटींची गुंतवणूक करत आहे. त्याचा फायदा या सगळ्या सिमेंट आणि स्टील शेअर्सला आणि पर्यायाने ICICI च्या कमोडिटी फंडला होईल. रिटर्नचा विचार केला तर 2019 मध्ये हा फंड 10 रुपयाच्या NAV ला लॉन्च करण्यात आला होता, ही NAV आता 40 रुपयाच्या वर गेली आहे. म्हणजेच मागच्या 5 वर्षात गुंतवणूकदारांच्या भांडवलात तब्बल 4 पट वाढ झाली आहे. एवढी वाढ पुढच्या 5 वर्षात होणार नाही, मात्र इतर इक्विटी फंडप्रमाणे हा फंड 14 ते 16% रिटर्न देऊ शकतो. तुम्हाला जर पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करायचा असेल किंवा एखाद्या नवीन फंडमध्ये SIP चालू करायची असेल तर या फंडचा नक्की विचार करा.

Published: April 10, 2024, 11:36 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App