50% डिस्कॉउंट ! आता PayTM चा शेअर खरेदी करावा का?

मागच्या 2 महिन्यात PayTM च्या शेअरने 300 ते 400 रुपयाच्या रेंजमध्ये कन्सॉलिडेशन केलं आहे. आता PayTM च्या व्यवसायाचं आणि शेअरचं काय होणार, ब्रोकर्सनी शेअरसाठी किती रुपयाचं टार्गेट दिलं आहे, या शेअरमध्ये जोखीम घेऊन गुंतवणूक करावी का, असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात आहेत. चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया.

रिजर्व बँक ऑफ इंडियाने Paytm पेमेंट्स बँकेवर बंदी घातली आणि PayTM च्या शेअरमध्ये मोठी घसरण चालू झाली. 31 जानेवारी 2024 ला RBI ने हा निर्णय जाहीर केला, त्यावेळेला PayTM चा शेअर 770 रुपयाला ट्रेड करत होता. दुसऱ्या दिवशी शेअरमध्ये 20 टक्याचं लोवर सर्किट लागलं, त्यामुळे गुंतवणूकदारांना शेअर्स विकता आले नाही. त्यानंतर, पुढचे 2 दिवस शेअरमध्ये पुन्हा लोवर सर्किट लागलं आणि अवघ्या 3 दिवसात हा शेअर 400 रुपयाच्या खाली गेला. 770 ते 400 रुपये म्हणजे 50% लॉस तो ही 3 दिवसात. PayTM च्या उत्पन्नात खूप मोठा वाटा पेमेंट्स बँकेचा होता. ते उत्पन्न रातोरात बंद झालं. ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आणि त्याचा PayTM च्या इतर व्यवसायावर परिणाम झाला. मागच्या 2 महिन्यात payTM च्या शेअरने 300 ते 400 रुपयाच्या रेंजमध्ये कन्सॉलिडेशन केलं आहे. आता PayTM च्या व्यवसायाचं आणि शेअरचं काय होणार, ब्रोकर्सनी शेअरसाठी किती रुपयाचं टार्गेट दिलं आहे, या शेअरमध्ये जोखीम घेऊन गुंतवणूक करावी का, असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात आहेत. चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया.

RBI ने PayTM पेमेंट्स बँकेवर बंदी घातल्यानंतर कंपनीने NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे थर्ड पार्टी अँप प्रोव्हायडर बनण्यासाठी अर्ज केला होता, ज्याला NPCI ने मंजुरी दिली आहे. यामुळे, PayTM ला गुगल पे आणि फोन पे सारखा पेमेंट सर्व्हिसेसचा व्यवसाय करता येईल. यासाठी कंपनीने SBI, HDFC बँक, येस बँक आणि ऍक्सिस बँकेसारख्या नामांकित संस्थांबरोबर करार केला आहे. यामध्ये, HDFC आणि SBI हे नावं महत्वाचे आहेत. HDFC प्रायव्हेट सेक्टरमध्ये लीडर आहे आणि SBI सरकारी बँकांमध्ये. हे ऍग्रिमेंट केल्यानंतर PayTM चा व्यवसाय पुन्हा सुरळीत चालू झाला आहे. PayTM कडे सध्या 4 कोटी व्यापारी आणि 10 कोटी इतर ग्राहक आहेत, PayTM ची ही सर्वात मोठी संपत्ती आहे. मर्चंट सर्व्हिसेससाठी अजूनही अनेक दुकानदार PayTM चाच वापर करतात. RBI च्या कारवाईनंतर, ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण होतं, मात्र कंपनीने आकर्षक कॅशबॅक ऑफर देऊन ग्राहकांना रिटेन करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, पेमेंट बॉक्सवर जे भाडं दुकानदारांना द्यावं लागतं, ते कमी करून कंपनीने दुकानदारांना खुश केलं. यामुळे, PayTM ला बऱ्यापैकी डॅमेज कंट्रोल करता आलं. आपण PayTM, फोन पे, गुगल पे सारखे अँप पेमेंटसाठी वापरतो, आपल्याला त्याची सवय लागलेली असते. त्यामुळे, एकदा RBI ची ही कारवाई लोकं विसरून गेले तर अँपचा वापर पुन्हा पहिल्यासारखा चालू होऊ शकतो.

PayTM चा व्यवसाय चांगला चालू असताना अचानक ही कारवाई का केली गेली, हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. PayTM वर झालेल्या कारवाई मागे कोणाचा हात आहे का, अशी दबक्या आवाजात चर्चा चालू आहे. हा विषय आपण जरा बाजूला ठेऊन कंपनीच्या आर्थिक कामगिरीचं ऍनालिसिस करू. 2016 मध्ये PayTM ने साधारण 450 कोटींचं उत्पन्न कमावलं, हा आकडा आता 7700 कोटींच्या वर गेला आहे. म्हणजे अवघ्या 8 वर्षात PayTM च्या व्यवसायात जवळपास 17 पट वाढ झाली आहे. मात्र, या दरम्यान कंपनीला एकही वर्ष प्रॉफिट जाहीर करता आला नाही. लॉस कमी झाला आहे मात्र कंपनी नक्की कधी प्रोफीटेबल होईल, ते सांगता येत नाही. त्यातच पेमेंट्स बँकेचा व्यवसाय अडचणीत आल्यामुळे या धक्क्यातून सावरायला त्यांना 2 ते 3 वर्ष लागतील. RBI च्या निर्णयानंतर सिटी बँकेने या शेअरसाठी 550 रुपयाचं टार्गेट दिलं आहे. तर दुसऱ्या बाजूला रिजर्व बँकेचा पुढचा निर्णय येईपर्यंत PayTM च्या शेअरमध्ये गुंतवणूक करू नये, असा सल्ला प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीजचे रिसर्च डायरेक्टर अविनाश गोरक्षकर यांनी दिला आहे. मात्र, PayTM ची ब्रँड इक्विटी लक्षात घेता या शेअरमध्ये काही प्रमाणात जोखीम घ्यायला हरकत नाहीये. आपण स्वतःच भांडवल या शेअरमध्ये टाकण्यापेक्षा इतर शेअर्समधून मिळालेल्या डिविडेंडचा वापर PayTM चे शेअर्स खरेदी करण्यासाठी करू शकतो. असं केल्याने जरी आपले पूर्ण पैसे बुडाले तरी कोअर पोर्टफोलिओवर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. पुढच्या 20 किंवा 30 वर्षात कंपनी खूप मोठी झाली तर ही लहान रक्कम आपल्यासाठी मोठी वेल्थ क्रिएट करू शकते.

Published: April 12, 2024, 13:26 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App