घर घेण्याचा विचार करताय? या पद्धतीने डाउनपेमेंट जमा करा

रोहितला खराडी भागात 2 BHK फ्लॅट खरेदी करायचा आहे, ज्याची किंमत आहे 70 लाख रुपये. त्याचा सध्या नगर रोडला 1 BHK फ्लॅट आहे, ज्याची मार्केट व्हॅल्यू 35 लाख रुपये आहे. मात्र त्याला तो फ्लॅट विकायचा नाहीये. त्यामुळे, नवीन फ्लॅटसाठी त्याला पूर्ण 70 लाखाचं नियोजन करावं लागेल.

रोहितला मागच्या महिन्यात मुलगी झाली. तो आणि त्याची बायको दोघेही जॉब करतात. आता त्याच्या मुलीला सांभाळण्यासाठी त्याचे आई वडील पुण्यात आले आहेत. त्यामुळे, भविष्याचा विचार करता मोठा फ्लॅट घेण्याचा त्याने निर्णय घेतला आहे. रोहित एका नवीन प्रोजेक्टची माहिती घेत होता. हे बघून रणजीतने त्याला घराबद्दल विचारलं. तुझं बजेट किती आहे, जुनं घर विकणार आहेस का, किती BHK फ्लॅट तुला घ्यायचा आहे, डाउनपेमेंट किती करणार आहेस असे अनेक प्रश्न रणजीतने त्याला विचारले. रणजीतने मागच्याच वर्षी 3 BHK फ्लॅट खरेदी केला आहे, त्यामुळे त्याला घर खरेदीचा अनुभव आहे. तुला जर नवीन घर घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी आर्थिक नियोजन कर, असा सल्ला रणजीतने रोहितला दिला. आधी डाउनपेमेंटसाठी पैसे जमा कर, तू जेवढं जास्त डाउनपेमेंट करशील तेवढं कर्जाचं टेन्शन कमी होईल आणि जास्त EMI भरावा लागणार नाही. मी म्युच्युअल फंडमध्ये SIP चालू केली होती, मागच्या 5 वर्षात मला खूप चांगला रिटर्न मिळाला. म्युच्युअल फंड्स विकून मला 40 लाख रुपये मिळाले, बाकी 40 लाखाचं मी होम लोन घेतलं आणि 3 BHK फ्लॅट खरेदी केला, असं रणजीत म्हणतो.

रणजितने जो मार्ग निवडला तो काही प्रमाणात योग्य होता. त्याने जास्तीतजास्त डाउनपेमेंट करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे त्याला जास्त होम लोन घ्यावं लागलं नाही. मात्र, त्याने इक्विटी फंड्समध्ये गुंतवणूक करून डाउनपेमेंटचे पैसे जमा केले, त्यात खूप जास्त जोखीम आहे. सुदैवाने मागच्या 3 4 वर्षात शेअर मार्केटमध्ये तेजी आली, म्हणून रणजीतचं स्वप्न पूर्ण झालं. मात्र, असं प्रत्येक वेळेला होईल असं नाही. जर मार्केट खाली आलं असतं तर रणजीतचं स्वप्न पूर्ण झालं नसतं. शेअर मार्केटमध्ये जोखीम आणि अनिश्चितता असते, कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे, ज्या पैशाची आपल्याला पुढचे 10 20 वर्ष गरज नाहीये केवळ असेच पैसे इक्विटीमध्ये गुंतवले पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे, रोहितला डाउनपेमेंटसाठी पैसे जमवायचे आहेत, त्यासाठी त्याने कुठे गुंतवणूक करावी. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

रोहितला खराडी भागात 2 BHK फ्लॅट खरेदी करायचा आहे, ज्याची किंमत आहे 70 लाख रुपये. त्याचा सध्या नगर रोडला 1 BHK फ्लॅट आहे, ज्याची मार्केट व्हॅल्यू 35 लाख रुपये आहे. मात्र त्याला तो फ्लॅट विकायचा नाहीये. त्यामुळे, नवीन फ्लॅटसाठी त्याला पूर्ण 70 लाखाचं नियोजन करावं लागेल. रोहितकडे सध्या 5 लाख रुपयाची FD आहे, तसेच शेअर्स आणि म्युच्युअल फंड पोर्टफोलिओची व्हॅल्यू साधारण 10 लाख रुपये आहे. हे शेअर्स आणि म्युच्युअल फंड त्याने रिटायरमेंटसाठी खरेदी केले आहेत. त्यामुळे, त्याने यातून पैसे काढू नये असा आमचा सल्ला आहे. तसेच, त्याने नवीन कार खरेदी करण्यासाठी 10 लाख रुपये जमवले आहेत. कार खरेदी करण्याचा प्लॅन तो पोस्टपोन करू शकतो. असं केलं तर त्याच्याकडे FD चे 5 लाख आणि कारसाठी साठवलेले 10 लाख असे एकूण 15 लाख रुपये जमतील. हे पैसे वापरून तो फ्लॅट बुक करू शकतो. 70 लाखापैकी 15 लाखाचं नियोजन झालं आता त्याला 55 लाखाचं नियोजन करायचं आहे. तो आणि त्याची बायको मिळून दर महिन्याला पगारातून 50000 हजार रुपये बाजूला काढू शकतात. त्याने 3 वर्षानंतर पझेशन मिळणारा अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट खरेदी केला तर पुढच्या 3 वर्षात महिन्याला 50000 रुपयांप्रमाणे एकूण 18 लाख रुपये जमा करू शकतो. यापैकी, काही पैसे व्याजासाठी जातील. तरी देखील साधारण 15 लाख रुपये यातून शिल्लक राहू शकतात. आधीचे 15 लाख आणि हे दर महिन्याला साठवलेले 15 लाख असं एकूण 30 लाख रुपयाचं डाउनपेमेंट तो करू शकतो. यामुळे, त्याला केवळ 40 लाख रुपयाचं होम लोन काढावं लागेल. 2030 पर्यंत, त्याच्या म्युच्युअल फंड आणि शेअर्सच्या पोर्टफोलिओची 30 ते 35 लाखापर्यंत जाऊ शकते. त्या वेळेला जर त्याला EMI चं टेन्शन ठेवायचं नसेल तर हा पोर्टफोलिओ विकून तो कधीही कर्जमुक्त होऊ शकतो. अश्या प्रकारे जास्तीत जास्त डाउनपेमेंट केलं, तर जास्त कर घ्यावं लागणार नाही आणि EMI चं जास्त टेन्शन राहणार नाही.

Published: April 12, 2024, 18:40 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App