250 रुपयात SIP करता येणार?

SIP ची रक्कम कमीत कमी केली तर सर्व सामान्य गुंतवणूकदार SIP चालू करू शकतील, एकदा त्यांना चांगला अनुभव आला, FD किंवा इतर ऍसेट्सपेक्षा म्युच्युअल फंड्समध्ये चांगला रिटर्न मिळतो, हे त्यांना कागदावर दिसलं तर त्यांचा म्युच्युअल फंडवरचा विश्वास वाढेल. किमान 250 रुपयापासून SIP चालू करता यावी म्हणून सेबीचा प्रयत्न आहे.

कोणताही व्यवसाय वाढवायचा असेल तर मार्केटिंग करावंच लागतं. मार्केटिंगमध्ये 4 P चा अतिशय महत्वाचा रोल असतो, यामध्ये प्रोडक्ट, प्राईज, प्लेस आणि प्रोमोशनचा समावेश आहे. व्यावसायिकाला त्याच्या स्पर्धकांपेक्षा अधिक वेगाने व्यवसायाचा विस्तार करायचा असेल तर या चारही P पाच मार्केटिंगसाठी वापर करावा लागतो. याच चार P चा वापर करून भारतातल्या FMCG कंपन्यांनी क्रांती केली. किंमत कमी असेल तर लोकं पहिल्यांदा ती वस्तू खरेदी करतात, प्रोडक्ट चांगलं असेल तर ग्राहक ती वस्तू पुन्हा पुन्हा वापरतात, कालांतराने त्यांना त्या वस्तूची सवय लागते. नंतर ग्राहक तीच वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकतात. FMCG कंपन्यांनी अश्याच प्रकारे शाम्पूच मार्केट मोठं केलं. आता अश्याच प्रकारे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचा विस्तार होण्याची शक्यता आहे. SIP ची रक्कम कमीत कमी केली तर सर्व सामान्य गुंतवणूकदार SIP चालू करू शकतील, एकदा त्यांना चांगला अनुभव आला, FD किंवा इतर ऍसेट्सपेक्षा म्युच्युअल फंड्समध्ये चांगला रिटर्न मिळतो, हे त्यांना कागदावर दिसलं तर त्यांचा म्युच्युअल फंडवरचा विश्वास वाढेल. किमान 250 रुपयापासून SIP चालू करता यावी म्हणून सेबीचा प्रयत्न आहे.

SIP ची किमान रक्कम 500 रुपयांवरून 250 रुपयांपर्यंत कमी झाली पाहिजे, असं मत सेबीच्या चेअरमन माधवी पुरी बूच यांनी व्यक्त केलं आहे. म्युच्युअल फंड इंडस्ट्रीने FMCG सेक्टरचं अनुकरण करावं आणि SIP ची रक्कम कमी करावी, असा सल्ला त्यांनी नुकताच एका कार्यक्रमात दिला. यामुळे, करोडो गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडमध्ये SIP चालू करता येईल. या 250 रुपयाच्या SIP ला गुंतवणूकदार आणि म्युच्युअल इंडस्ट्रीला कसा फायदा होईल, ते आता जाणून घेऊया. यासाठी आधी आपल्याला SIP म्हणजे काय आणि त्याचा काय फायदा आहे ते जाणून घ्यावं लागेल. SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट शेअर्स खरेदी करण्यात जास्त जोखीम वाटते, म्हणून ते म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंड हा अनेक शेअर्सचा पोर्टफोलिओ असल्यामुळे त्यामध्ये सगळे पैसे बुडत नाहीत. मात्र, शेअर मार्केट आणि इक्विटी फंड्समध्ये एकरकमी गुंतवणूक केली आणि लगेच मार्केटमध्ये पडझड झाली तर मोठं नुकसान होऊ शकतं. या अडचणीला SIP हे उत्तर आहे.

सध्या गुंतवणूकदारांना SIP करायची असेल तर किमान 500 रुपयाची करावी लागते. काही प्लॅटफॉर्म्सनी SIP साठी किमान रक्कम 1000 रुपये ठेवली आहे. त्यामुळे, गुंतवणूकदार इच्छा असूनदेखील SIP चालू करू शकतं नाहीत. यामुळे, गुंतवणूकदारांपर्यंत म्युच्युअल फंडचे फायदे पोहोचत नाहीत. यामुळे, म्युच्युअल फंड इंडस्ट्री आणि गुंतवणूकदार एकमेकांपासून वंचित राहतात. तर काही गुंतवणूकदार केवळ 1 किंवा 2 फंडमध्येच SIP चालू करतात. नेमकं त्याच फंडाने चांगली कामगिरी केली नाही तर त्यांचं सबंध म्युच्युअल फंड संदर्भात मत खराब होतं. SIP ची रक्कम 250 रुपयांपर्यंत खाली आणली तर दोन्ही अडचणींपासून सुटका होईल. गुंतवणूकदारांना कमीत कमी पैशात SIP चा लाभ घेता येईल आणि 1000 रुपये गुंतवणारा गुंतवणूकदार वेगवेगळ्या 4 फंडमध्ये डायव्हर्सिफाय करू शकेल. भारतातल्या किमान 10 कोटी गुंतवणूकदारांनी दर महिन्याला सरासरी 5000 रुपयाची SIP केली तर भारतात दर महिन्याला 50000 कोटींचे SIP इन-फ्लो येऊ शकतील, हा आकडा सध्या 19000 कोटींच्या वर गेला आहे. 50000 कोटींचा टप्पा पार करण्यासाठी म्युच्युअल फंड इंडस्ट्रीला 250 रुपयाच्या SIP चा नक्कीच फायदा होईल.

Published: April 13, 2024, 22:02 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App