2 व्हिलर शेअर्समध्ये गुंतवणुकीची संधी?

प्रत्येक मुलाच्या आयुष्यातली 2 व्हीलर ही पहिली सर्वात मोठी खरेदी असते. हे एवढं मोठं मार्केट असल्यामुळे, या संधीकडे आपण गांभीर्याने बघितलं पाहिजे. चला तर मग कोणत्या 2 व्हीलर शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर फायदा होईल ते जाणून घेऊया.

भारतासारख्या देशामध्ये सगळ्याच सेक्टरमध्ये वाढ होणार आहे. मात्र, असे काही सेक्टर असतात ज्याच्यावर आपण 100% खात्रीने गुंतवणूक करू शकतो. असाच एक सेक्टर आहे 2 व्हीलर सेक्टर. भारत हा तरुणांचा देश आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. भारतात 14 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांची संख्या 25% आहे, म्हणजे भारतात 35 कोटी मुलं या वयोगटात आहेत. तसेच, युनायटेड नेशन्सच्या अंदाजानुसार 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या 166 कोटींच्या वर जाईल. त्यामुळे, दिवसेंदिवस तरुणांच्या संख्येत वाढ होणार, जे निश्चित आहे. जेव्हा मुलं शाळेत असतात, तेव्हा त्यांच्यासाठी आई-वडील फार महागड्या वस्तू खरेदी करत नाहीत. मात्र, मुलाची दहावी झाली कि मोबाईल आणि बारावी झाली कि चांगला बाईक, हे समीकरण ठरलेलं असतं. आई वडील मुलींसाठी ऍक्टिव्ह किंवा ज्युपिटरसारखी मोपेड खरेदी करतात. सांगण्याचा हेतू असा आहे प्रत्येक मुलाच्या आयुष्यातली 2 व्हीलर ही पहिली सर्वात मोठी खरेदी असते. हे एवढं मोठं मार्केट असल्यामुळे, या संधीकडे आपण गांभीर्याने बघितलं पाहिजे. चला तर मग कोणत्या 2 व्हीलर शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर फायदा होईल ते जाणून घेऊया.

2 व्हीलर सेगमेंटमध्ये सर्वाधिक म्हणजे 32% मार्केट शेअर सध्या हिरो मोटोचा आहे. 2010 साली हिरो आणि होंडा यांनी पार्टनरशिपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, हिरो मोटोच्या मार्केट शेअरमध्ये सातत्याने घसरण झाली आहे. 2014 मध्ये हिरो मोटोने साधारण 25000 कोटींचा व्यवसाय केला होता, आता 10 वर्षानंतर त्यांनी 2023 मध्ये केवळ 36600 कोटींचा व्यवसाय केला. म्हणजे, हिरो मोटोला मार्केट शेअर टिकवण्यात आणि व्यवसाय वाढवण्यात फारसं यश मिळालं नाहीये. असं असेल तरी हिरो मोटो अजूनही या सेगमेंटमध्ये नंबर 1 चा प्लेअर आहे. त्यांच्याकडे ब्रँड आहे, या ब्रँडवर लोकांचा विश्वास आहे आणि त्यांची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे त्यांच्याकडे मजबूत डीलर नेटवर्क आहे. मी कॉलेजमध्ये असताना हिरोकडे करिझ्मा, CBZ आणि पॅशन प्लससारखे तागडे मॉडेल होते. मात्र, त्यांना या प्रकारचे मॉडेल्स नंतर लॉन्च करता आले नाही. त्यातच 2016 नंतर तरुणांनी बुलेटसारख्या गाड्यांना जास्त पसंती दिली आणि हिरोचे मॉडेल मागे पडले. मात्र, हिरोने मागच्या वर्षी हारली डेव्हिडसन बरोबर X 440 बाईक मॅन्युफॅक्चर करण्यासाठी जॉईंट व्हेंचर केलं आहे. या गाडीची विक्री ऑकटोबर 2023 पासून चालू झाली आहे. या JV चा हिरो मोटोच्या व्यवसायावर अतिशय सकारात्मक परिणाम होईल. हिरो मोटोच्या शेअरने 4000 रुपयाचा महत्वाचा रेसिस्टन्स पार करून मोठ्या तेजीचे संकेत दिले आहेत. या शेअरमध्ये 3400 ते 4400 च्या रेंजमध्ये प्रत्येक घसरणीत गुंतवणूक केली तर आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतो. 3300 रुपयाचा महतवाचा रेसिस्टन्स पार केल्यावर आपण हा शेअर कव्हर केला होता. तेव्हापासून शेअरने जवळपास 35% रिटर्न दिला आहे. मात्र, या शेअरमध्ये अजूनही गुंतवणुकीची संधी आहे. 3400 ते 3800 रुपयांपर्यंत शेअर खाली आला तर व्हॅल्यू बाईन्ग करण्याची चांगली संधी मिळेल.

2 व्हीलर सेगमेंटमध्ये एक आयकॉनिक कंपनी आहे, जिचं नाव आहे बजाज ऑटो. बजाज ऑटोची खासियत म्हणजे कंपनी खूप फास्ट ग्रोथ करत नाही, मात्र त्यांच्या वाढीमध्ये सातत्य असतं. तसेच, ही पूर्णपणे कर्जमुक्त कंपनी आहे. त्यामुळे, बजाज ऑटोच्या शेअरमध्ये खूप जास्त घसरण होत नाही. मात्र, यामध्ये अडचण अशी आहे किट बजाज ऑटोचा शेअर मागच्या 1 वर्षात खूप वाढला आहे. हा शेअर आता 9000 रुपयाच्या वर ट्रेड करतोय. काही कारणास्तव मार्केटमध्ये घसरण झाली आणि बजाज ऑटोचा शेअर 7000 रुपयांपर्यंत खाली आला तर आपण यामध्ये व्हॅल्यू बाईन्ग करू शकतो. सध्या बजाज ऑटोचा PE रेशिओ आहे 34. हाच शेअर 7000 रुपयांपर्यंत खाली आला तर शेअरचा PE रेशिओ होईल 25, ते रिजनेबल व्हॅल्युएशन असेल. 2 व्हीलर सेगमेंटमध्ये आणखी एक महत्वाची कंपनी आहे आयशर मोटर्स, त्यांच्याकडे रॉयल एन्फिल्ड नवा तगडा ब्रँड आहे. मागच्या 10 वर्षात कंपनीचा नफा 8 पट वाढला आहे, तर री-रेटिंग झाल्यामुळे या शेअरमध्ये मागच्या 15 वर्षात तब्बल 100 पट वाढ झाली आहे.

Published: April 25, 2024, 15:44 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App