आयुष्यमान योजनेत 10 ते 15 लाख विम्याचे कवच मिळणार का ?

दिवसेंदिवस वैदयकीय महागाई वाढत असल्यानं आयुष्यमान योजनेत विम्याचे कवच 15 लाखांपर्यंत वाढवून सर्वच नागरिकांना विम्याचे कवच मिळणार का ?

  • Team Money9
  • Last Updated : January 30, 2024, 13:20 IST

बसल्या बसल्या राजेशची छाती फुगुन आलीय. डॉक्टरनं राजेशला बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिलाय..मुंबईतल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी मोठी रांग आहे आणि खासगी हॉस्पिटलमधला खर्च राजेशच्या आवाक्याबाहेरचा आहे.

राजेश ना धड श्रीमंत नाही, गरीबही नाही .त्यामुळे त्याला आयुष्यमान योजनेचा फायदा मिळत नाही, ऐपत नसल्यानं खासगी हॉस्पिटलमधील खर्च परडवत नाही. खरंच मध्यमवर्गीय खूप मोठ्या कोंडीत सापडलेत. सरकारी हॉल्पिटलमध्ये ऑपरेशन करायचं असल्यास राजेशला किमान अकरा महिने वाट पाहावी लागणार आहे. दिवसेंदिवस राजेशची तब्येत खराब होतेय.

सरकार लवकरच बजेट सादर करणार आहे ,अशी माहिती राजेशला मिळाली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बजेट सादर होतंय. सरकार मतदारांना खूष करण्यासाठी काही मोठ्या घोषणा करू शकते. अशावेळी राजेशसारख्या रूग्णांना बजेटमधून काही अपेक्षा आहेत.

सरकारनं सर्वच नागरिकांना आयुष्यमान योजनेचं कार्ड द्यावं,अशी अपेक्षा राजेशला आहे. आयुष्यमान कार्डमुळे मेडिकल खर्चात मोठी बचत होणार असल्यानं सरकारनं थोडे पैसे घेतले तरी चालतील.. सध्या आयुष्यमान योजनेचा दहा कोटींहून अधिक गरीब कुटुंबातील जवळपास 55 कोटी नागरिकांना फायदा होतोय.

राजेशच्या ओळखीतल्या अनेक जणांकडे आयुष्यमान कार्ड आहे. मात्र, त्यांना उपचाराची सुविधा मिळत नाही. बऱ्याच हॉस्पिटल आयुष्यमान योजनेशी संलग्न नाहीत. दिल्ली, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आयुष्यमान योजना लागू नाही. अशावेळी या राज्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान कार्डचा उपयोग होत नाही.

आयुष्यमान योजनेतील विम्याचे कवच पाच लाखांहून दहा ते 15 लाख प्रति कुटुंब करण्यात यावी,अशी मागणी राजेशची आहे. दिवसेंदिवस उपचाराच्या खर्चात वाढच होतेय. वैद्यकीय महागाई ही खाद्य महागाईुपेक्षा वेगानं वाढत आहे. .

अवयव प्रत्यारोपण आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांच्या उपचारांवर 10 ते 15 लाख रुपयांचा खर्च येतोय. अशावेळी आयुष्यमान योजनेची व्याप्ती वाढवणं आवश्यक आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातही चांगल्या सुविधा देण्याची मागणी राजेशनं केलीय. ग्रामीण भागातल्या सरकारी रूग्णालयात चांगल्या उपचारांवर लक्ष देण्याची गरज आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रावर 24 तास डॉक्टरची सुविधा, अत्याधुनिक उपचार, रुग्णवाहिका आणि औषधं अशा सुविधा दिल्यास सामान्य नागरिकांना खासगी रूग्णालयांची पायरी चढावी लागणार नाही.

यंदाच्या बजेटमधील सार्वजनिक आरोग्यासंदर्भातल्या घोषणा राजेश कान टवकारून ऐकणार आहे.

Published: January 30, 2024, 13:13 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App