रेल्वे शेअरमध्ये गुंतवणुकीची रणनिती

2024-25 च्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वेसाठी 2 लाख 55 हजार कोटींची तरतूद केली. रेल्वेच्या विस्तारासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या, पण सर्वात मोठी घोषणा होती ती रेल्वेच्या 40000 डब्यांना अपग्रेड करण्याची. आता या शेअर्समध्ये गुंतवणूक करून कसा फायदा करून घ्यायचा, चला तर मग यासाठी स्ट्रॅटेजी जाणून घेऊया.

नरेंद्र मोदी सरकारने 2014 साली त्यांचं पहिलं बजेट सादर केलं होतं, त्यावेळेला 65 हजार 445 कोटींची तरतूद करण्यात आली होती.

तत्कालीन रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी रेल्वेच्या विस्तारासाठी प्रयत्न चालू केले. त्यानंतर, सुरेश प्रभू यांच्यावर रेल्वे मंत्रालयाची जवाबदारी सोपवण्यात आली, सुरेश प्रभू यांनी अनेक महत्वाचे प्रकल्प चालू केले, रेल्वेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. 3 वर्षानंतर पियुष गोयल यांची रेल्वे मंत्रीपदी वर्णी लागली. त्यांनी देखील रेल्वेच्या विस्तारासाठी अनेक योजना राबवल्या. त्यानंतर, 7 जुलै 2021 ला अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. या दरम्यान, नरेंद्र मोदी सरकारने रेल्वे बजेटमध्ये जवळपास 4 पट वाढ केली आहे. 2024-25 च्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वेसाठी 2 लाख 55 हजार कोटींची तरतूद केली. रेल्वेच्या विस्तारासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या, पण सर्वात मोठी घोषणा होती ती रेल्वेच्या 40000 डब्यांना अपग्रेड करण्याची.

 

प्रत्येक देशाच्या इतिहासात काही आयकॉनिक गोष्टी घडतात, आपल्या भारताच्या बाबतीत 2019 मध्ये अशीच एक गोष्ट घडली, खरं तर हा आपल्या देशासाठी टर्निंग पॉईंट होता.

ती गोष्ट म्हणजे वंदे भारत ट्रेनची सुरुवात. 15 फेब्रुवारी 2019 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आणि त्यानंतर सुरुवात झाली एका नव्या पर्वाची. सध्या भारतात 41 वंदे भारत ट्रेन धावत आहेत, पुढच्या 2 वर्षात आणखी 500 वंदे भारत ट्रेन चालू करण्याचा प्लॅन अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केला आहे, एवढंच नाहीतर 2030 पर्यंत आणखी 800 वंदे भारत ट्रेन चालू करण्याचा सरकारचा प्लॅन आहे. एक वंदे भारत ट्रेन बनवायला साधारण 115 कोटींचा खर्च येतो. आता विचार करा 800 ट्रेन गुणिले 115 कोटी म्हणजे हा आकडा जातो 90000 कोटींच्या पार. रेल्वे शेअर्स मागच्या 1 वर्षात दुप्पट, तिप्पट, चार पट आणि पाच पट का वाढले आहेत, त्याचं उत्तर या आकड्यातुन आपल्याला मिळतंय. एवढंच नाहीतर तर आत्ताच्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अतिशय महत्वाची घोषणा केली आहे, 40000 डब्यांना वंदे भारत ट्रेनच्या डब्यांसारखं अपग्रेड करण्याचा सरकारचा प्लॅन आहे. सध्या भारतात 22500 ट्रेन धावतात, एका ट्रेनला साधारण 10 डबे म्हंटल तरी भारतात 2 लाखापेक्षा जास्त रेल्वेचे डबे आहेत. सांगायचं हेतू असा आहे कि हि अपग्रेडेशनची संधी खूप मोठी आहे. याचा वॅगन्स बनवणाऱ्या कंपन्यांना फायदा होणार आहे. मागच्या 18 महिन्यांमध्ये आम्ही अनेक रेल्वे शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे, ज्यामध्ये टीटागर्ह वॅगन्स, रेल विकास निगम लिमिटेड, ज्युपिटर वॅगन्ससारख्या शेअर्सचा समावेश आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे कि, आता या शेअर्समध्ये गुंतवणूक करून कसा फायदा करून घ्यायचा, चला तर मग यासाठी स्ट्रॅटेजी जाणून घेऊया.

 

आधी आपल्याला शेअर्सचे नावं जाणून घ्यावे लागतील आणि त्यानंतर स्ट्रॅटेजी समजून घ्यावी लागेल.

फंडामेंटल्सचा विचार केला तर आमच्या मते RVNL, टीटागर्ह वॅगन्स, रेलटेल कॉर्पोरेशन, टेक्समॅको रेल या कंपन्या चांगल्या आहेत. आता या सगळ्या शेअर्समध्ये एकच अडचण आहे, ती म्हणजे व्हॅल्युएशन. मागच्या 1 वर्षात आलेल्या तेजीमुळे, हे सगळे शेअर्स ओव्हर-वॅल्यूड आहेत. मात्र, पुढे असणारी संधी त्याहीपेक्षा मोठी आहे. यासाठी आपल्याला एक स्ट्रॅटेजी बनवावी लागेल. स्ट्रॅटेजी अशी आहे कि आपण हे शेअर्स 4 टप्प्यात खरेदी करायचे. समजा आपल्याला एखाद्या शेअरमध्ये 40000 रुपयाची गुंतवणूक करायची असेल, तर सध्याच्या किमतीला 10000 रुपयाची गुंतवणूक करायची. शेअर सध्याच्या किमतीपासून 25% खाली आला तर आणखी 10000 रुपयाची गुंतवणूक करायची, शेअर सध्याच्या किमतीपासून 50% आणि 75% खाली आला तर आणखी 10 10 हजार रुपयाची गुंतवणूक करावी लागेल. यामुळे, आपली एव्हरेज प्राईज कमी होत जाईल. आता या शेअर्समधून प्रॉफिट बुक कधी करायचा ते हि जाणून घेऊया. ज्यावेळेला, आपल्या एव्हरेज बाय प्राईजवर आपल्याला 100% प्रॉफिट मिळेल, त्यावेळेला आपण निम्मे शेअर्स विकून आपलं भांडवल काढून घ्यायचं. बाकी शेअर्स आपल्यासाठी आता फ्री असतील, मग पुढचे 20 25 30 वर्ष काहीही झालं तरी हे फ्री शेअर्स विकायचे नाही. अश्या पद्धतीने आपण या “वन्स इन या लाईफटाइम ऑपॉर्च्युनिटी”चा फायदा करून घेऊ शकतो.

Published: February 6, 2024, 15:27 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App