होम लोनचे व्याजदर 3% कमी होणार?

आता लवकरच सामान्य कर्जदारांच्या अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. पुढच्या 2 ते 3 वर्षात होम लोनचे व्याजदर सहा टक्याच्या खाली जातील, असा आमचा अंदाज आहे. आम्ही असं का म्हणतोय आणि या संधीचा आपण कसा फायदा करून घ्यायचा ते आता जाणून घेऊया.

2021 मध्ये होम लोनचे व्याजदर साडे सहा ते 7 टक्याच्या रेंजमध्ये होते, मात्र रशिया युक्रेन युद्ध चालू झालं आणि त्याचा फटका भारतातल्या सामान्य लोकांना बसला. एप्रिल 2022 मध्ये रेपो रेट होता 4%, मात्र त्यानंतर रिजर्व बँकेनी व्याजदरवाढ चालू केली आणि केवळ 9 महिन्यात रेपो रेट साडे सहा टक्यावर पोहोचला. त्यामुळे, बँकांनी सर्वच प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरात 2 ते 3 टक्याची वाढ केली. साडे सहा टक्के असणारा होम लोनचा व्याजदर पोहोचला 9 टक्याच्या वर. होम लोनच्या EMI मध्ये जवळपास 30% वाढ झाली आणि सामान्य माणसाचं बजेट कोलमडलं. मात्र, आता लवकरच सामान्य कर्जदारांच्या अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. पुढच्या 2 ते 3 वर्षात होम लोनचे व्याजदर सहा टक्याच्या खाली जातील, असा आमचा अंदाज आहे. आम्ही असं का म्हणतोय आणि या संधीचा आपण कसा फायदा करून घ्यायचा ते आता जाणून घेऊया.

तुमच्या समोर जो चार्ट दिसतोय तो 10 वर्ष मॅच्युरिटी असणाऱ्या भारत सरकारच्या बॉण्डचा मंथली चार्ट आहे. हा चार्ट आपण नीट बघितला तर आपल्या लक्षात येईल कि हे व्याजदर मागच्या अनेक वर्षांपासून डाउन ट्रेंडमध्ये आहेत, मंथली चार्टवर लोवर हाय आणि लोवर लो फॉर्मेशन पाहायला मिळतंय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 25 चं बजेट सादर केलं. सरकारचा 2024 25 आर्थिक वर्षात 14 लाख 13 हजार कोटींचं कर्ज घेण्याचा प्लॅन आहे, म्हणजेच या वर्षीच्या तुलनेत पुढच्या वर्षी सरकार कमी कर्ज घेणार आहे. सरकारकडून कर्जाची मागणी कमी झाल्यामुळे व्याजदरात घसरण पाहायला मिळाली. एकंदरीत विचार केल्यास, 10 वर्षाचे बॉण्ड, रेपो रेट आणि होम लोनचे व्याजदर आता वर जाण्याची शक्यता खूप कमी आहे. लोवर हाय आणि लोवर लो फॉर्मेशन चालू राहिलं तर 10 वर्ष मॅच्युरिटी असणारे बॉण्डचे व्याजदर पुढच्या 3 वर्षात साधारण 3 टक्याने कमी होऊ शकतात. असं झाल्यास आपल्या होम लोनचे व्याजदरदेखील साधारण 2 ते 3 टक्याने कमी होतील. यामुळे, होम लोनचे EMI साधारण 20 ते 25 टक्याने कमी होतील आणि करोडो कर्जदारांना फायदा होईल.

शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून आपण या संधीचा फायदा करून घेऊ शकतो. व्याजदर कमी झाले तर त्याचा कोणत्या सेक्टरला फायदा होईल, ते आता जाणून घेऊया. याचा सगळ्यात जास्त सकारात्मक परिणाम रिअल इस्टेट सेक्टरवर होईल. होम लोनचे व्याजदर कमी झाले तर अनेक लोकं घर घेण्याचा निर्णय घेऊ शकतात, तसेच व्याजदर कमी झाल्यामुळे त्यांना आहे त्या पगारात जास्त लोन मिळेल आणि लोकं तेवढ्याच EMI मध्ये मोठं घर घेऊ शकतील. निफ्टी रिअल्टी इंडेक्सने मंथली चार्टवर ब्रेकआऊट देऊन 2023 मधेच मोठ्या तेजीचे संकेत दिले आहेत. आता जर व्याजदर कमी झाले तर रिअल इस्टेट कंपन्यांच्या विक्रीमध्ये वाढ होईल आणि त्यांच्या शेअर्समध्ये तेजी येईल. जर लोकं घर खरेदी करणार असतील तर अर्थातच ते लोन घेतील आणि यामुळे हाउसिंग फायनान्स कंपन्यांचा व्यवसाय वाढेल. LIC हाउसिंग फायनान्स, रेपको होम फायनान्स आणि GIC हाउसिंग फायनान्ससारख्या शेअर्समध्ये पुढच्या 3 वर्षात चांगला रिटर्न मिळू शकतो. याच बरोबर व्याजदर कमी झाले तर बॉण्डच्या किमती वाढतील. बँकांना बॉण्डमध्ये गुंतवणूक करावी लागते, पुढच्या 3 वर्षात व्याजदर 2 ते 3 टक्याने कमी झाले तर बॉण्डच्या किमती 20 ते 40 टक्याने वाढतील. यामुळे, बँकांच्या नफ्यामध्ये वाढ होईल. याचा HDFC बँक आणि कोटक बँकेच्या शेअर्सवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Published: February 6, 2024, 13:28 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App