शिक्षण स्वस्त करा? रोजगार निर्मितीवर जोर द्या,युवांच्या बजेटकडून अपेक्षा

दिवसेंदिवस शिक्षण सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर चालले आहे.. कर्ज काढून मुलांना शिकवलं पण नोकऱ्याच नसल्यानं एक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहे.

  • Team Money9
  • Last Updated : January 31, 2024, 11:40 IST

 

नोकरी नसल्यानं गेल्या अनेक दिवसांपासून खुशी अस्वस्थ आहे. जॉब कन्सल्टन्सीमधून फोन येईल किंवा कंपनीच्या HR मुलाखतीचा मेल आला असेल या आशेनं ती सतत मोबाईल पाहत असते. मात्र,नेहमीप्रमाणं तिची आजही निराशाच झालीय. नोकरी नसल्यानं तिचं टेन्शन वाढू लागलंय.एका खासगी महाविद्यालयातून तिने इंजिनिअरिंग पूर्ण केलंय. शिक्षणासाठी तिच्या वडिलांनी 8 लाख रुपयांचं शैक्षणिक कर्ज काढलंय. शिक्षणानंतर चांगला जॉब मिळाल्यास एका झटक्यात कर्जाची परतफेड करू या आशेवर कर्ज घेतलंय. पुणे,बंगळुरूपासून थेट अमेरिकेपर्यंत नोकरी करण्याचं स्वप्न खुशीनं पाहिलं होतं. मात्र,आता हे स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील ताण स्पष्टपणे दिसून येतोय.

गेल्यावर्षीच खुशीचं बी.टेक पूर्ण झालंय. मात्र,अद्याप ती नोकरीच्या शोधात आहे. ज्यावर्षी तिनं कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं होतं त्यावर्षी कॅम्पसमध्ये अनेक स्टार्ट कंपन्यांनी मुलाखती घेतल्या होत्या. तिच्या अनेक सिनिअर्सचे कॅम्पसमध्ये प्लेसमेंट झालं आणि विशेष म्हणजे तगडं पॅकेजही मिळालं. मात्र, दुर्देवानं खुशी अंतिम वर्षात असताना एकही कंपनी कॅम्पस सिलेक्शनसाठी आली नाही.

खुशीप्रमाणे देशातील लाखो तरूण-तरुणींची अशीच परिस्थिती आहे. गेल्या वीस वर्षांपासून आयटी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली. मात्र,कोरोनानंतर आयटी कंपन्यांमध्ये नोकऱ्यांचे प्रमाण घटले. भारतातील आणि परदेशातील अनेक आयटी कंपन्यांनी गेल्या वर्षांपासून नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणं बंद केलंय. आयटी क्षेत्रासारखीच परिस्थिती रिटेल आणि ई-कॉमर्स क्षेत्राची आहे.

आर्थिक मंदीमुळे अगोदरच कंपन्यांनी फ्रेशर्सना घेत नव्हते. त्यातच आता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आल्यानं परिस्थिती आणखीनच गंभीर झालीय. गेल्या वर्षी नव पदवीधरांना नोकरी देण्याच्या प्रमाणात 30 टक्के घट झालीय. 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये फ्रेशर्ससाठीच्या नव्या नोकऱ्यांमध्ये 20 टक्के घट झालीय. सुदैवानं एखाद्या फ्रेशरला नोकरी मिळाल्यास त्याच्या नोकरीची गॅरंटी नाही. भारतातील संघटित क्षेत्रात रोजगार हे 30 महिन्यांच्या निचांकावर आहेत,अशी माहिती कर्मचारी भविष्य निर्वाह कार्यालयानं दिलीय.

खुशीला बजेटमधून चांगल्या भविष्याची हमी हवी. स्टार्टअपचा वेगाला एवढ्या लवकर ब्रेक लागल्यानं तरूण नाराज आहेत. नोकऱ्याच मिळणार नसतील तर कॉलेजातील महागडं शिक्षण कोण घेणार ?

नोकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होतेय. त्यामुळे सरकारनं शैक्षणिक कर्जाच्या व्याजात सवलत द्यावी,अशी अपेक्षा खुशीनं व्यक्त केलीय. तसेच पालकांची आर्थिक परिस्थिती नसल्यानं हुशार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये,यासाठी सरकारनं शिक्षण स्वस्त करावं,अशी गॅरंटी खुशीला बजेटकडून हवी आहे.

तसेच सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षेत गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार कमी करण्याचीही तिची मागणी आहे.सरकारनं अत्यंत पारदर्शकपणे आणि वेळच्या वेळी परीक्षा आणि मुलाखती घ्याव्यात आणि नियुक्तीपत्र द्यावेत,अशी गॅरटीही खुशीला बजेटमधून हवी आहे.

निवडणुकीपूर्वीच्या या बजेटमधून खुशीसारख्या कोट्यवधी बेरोजगार युवांची अपेक्षा पूर्ण होणार का ?

Published: January 31, 2024, 11:39 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App