HOME LOAN कर्ज एक, खर्च अनेक !

डिसबर्समेंटच्या आधी बँक आपल्याकडून एक अग्रीमेंट साइन करून घेते. ते एग्रीमेंट खूप मोठं असतं आणि बारीक अक्षरात असतं. आपल्यालाही डिसबर्समेंटची घाई असते, त्यामुळे बँकेच्या गर्दीत आपण ते वाचायचं ठरवलं तरी ते शक्य नसतं. मात्र, कोणतंही डॉक्युमेंट न वाचता आपण सही केली आणि त्यात काही लपवलेल्या नियम आणि अटी असतील, तर ते आपल्या लक्षात येत नाही आणि जेव्हा लक्षात येतं तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो.

होम लोन घेताना आपलं लक्ष केवळ व्याजदाराकडे असतं.

डाउनपेमेंटची व्यवस्था कशी करायची, किती लोन मिळेल, व्याजदर किती असेल अश्या गोष्टींमध्ये आपलं लक्ष असतं. लोन सॅंक्शन झाल्यामुळे आपल्या हक्काचं घर मिळणार या आनंदात आपलं कर्जाच्या नियम आणि अटींकडे दुर्लक्ष झालं, तर आपल्याला ही चूक महागात पडू शकते. आपण अर्ज केल्यावर बँका फाईल प्रोसेस करतात आणि नंतर लोन सॅंक्शन झाल्याची माहिती देतात. त्यावेळेला, सॅंक्शन लेटर आपल्याला दिलं जातं. त्यामध्ये, व्याजदर, कर्जाचा कालावधी आणि प्रोसेसिंग फीसारखी बेसिक माहिती असते. मात्र, डिसबर्समेंटच्या आधी बँक आपल्याकडून एक अग्रीमेंट साइन करून घेते. ते एग्रीमेंट खूप मोठं असतं आणि बारीक अक्षरात असतं. आपल्यालाही डिसबर्समेंटची घाई असते, त्यामुळे बँकेच्या गर्दीत आपण ते वाचायचं ठरवलं तरी ते शक्य नसतं. मात्र, कोणतंही डॉक्युमेंट न वाचता आपण सही केली आणि त्यात काही लपवलेल्या नियम आणि अटी असतील, तर ते आपल्या लक्षात येत नाही आणि जेव्हा लक्षात येतं तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो.

 

बँक आपल्याला होम लोन देते त्यावेळेला आपला क्रेडिट स्कोअर चेक करते, आपल्या घर आणि ऑफिसच्या पत्त्याची थर्ड पार्टीकडून पडताळणी करते.

तसेच, DSA कडून फाईल आली असेल तर बँकेला त्यांना कमिशन द्यावं लागतं. हे खर्च काढण्यासाठी बँक आपल्याकडून प्रोसेसिंग फी घेते. प्रोसेसिंग फी ही वन टाइम आणि नॉन-रिफंडबल असते. प्रोसेसिंग फी कर्जाच्या रकमेवर अवलंबून असते आणि हा आकडा साधारण कर्जाच्या रकमेच्या 2 टक्यापर्यंत असू शकतो. काही बँका आणि वित्तीय संस्थांनी यासाठी कॅपिंग लावलं आहे. त्यामुळे, ग्राहकांचं जास्त नुकसान होत नाही. या शिवाय, डिसबर्समेंटच्या वेळेला स्टॅम्प ड्युटी आणि लीगल चार्जेसदेखील आपल्याला भरावे लागतात. बऱ्याच वेळेला बँका आणि NBFC कर्जदारांना लाईफ इंश्युरन्स आणि प्रॉपर्टी इंश्युरन्स घेण्याची सक्ती करतात. याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो, मात्र यासाठी कोणीही सक्ती करू शकत नाही. त्यामुळे, लोनसाठी अर्ज करताना इंश्युरन्स संदर्भात सविस्तर माहिती घ्या. बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं कि वित्तीय संस्थांकडून घेतलेला इंश्युरन्स इतर चॅनलमधून घेतलेल्या इंश्युरन्सपेक्षा महाग असतो. कारण इंश्युरन्स कंपनी त्यांना भरमसाठ कमिशन देते. हा प्रीमियम आपल्या होम लोनमध्ये ऍड केला जातो, त्यामुळे नुकसान आपलंच होणार आहे, हे लक्षात ठेवा.

 

कोणतीही कर्ज घेणारी व्यक्ती वेळेवर EMI भरण्याचा प्रयत्न करते.

मात्र, काही आर्थिक किंवा तांत्रिक अडचणींमुळे एखादा EMI उशिरा भरला तर बँक किती पेनल्टी लावू शकते, त्याची माहिती घ्या. तसेच, डिसबर्समेंटच्या वेळेला लीगल चार्जेस आणि स्टॅम्प ड्युटी किती भरावी लागेल, त्याची माहिती घ्या. स्टॅम्प ड्युटीच्या रिसीट देखील तुम्ही मागू शकता. यासाठी, कॅशमध्ये पेमेंट मागितलं जातं, मात्र तुम्ही शक्यतो UPI च्या माध्यमातून पैसे ट्रान्स्फर करा म्हणजे तुमच्याकडे त्याची नोंद राहील. लीगल चार्जेस कमी करण्यासाठी तुम्ही बार्गेनिंग करू शकता. तसेच, तुमची प्रोफाइल चांगली असेल, तर तुम्ही प्रोसेसिंग फी माफ करण्यासाठी विनंती करू शकता. अश्या प्रकारे, होम लोन घेताना केवळ व्याजदरावर लक्ष केंद्रित न करता, इतर बारीक सारीक खर्चावर लक्ष द्या. आज वाचवलेला प्रत्येक रुपया तुम्हाला भविष्यात कामी येईल.

Published: December 26, 2023, 18:24 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App