घराच्या रेंटवर किती खर्च करावा?

चांगली नोकरी पाहिजे असेल तर अनेकांना पुणे मुंबईसारख्या शहरात शिफ्ट व्हावं लागतं. भारतातल्या शहरात रेंटमध्ये मागच्या 1 वर्षात खूप मोठी वाढ झाली आहे, विशेष म्हणजे ही वाढ केवळ मेट्रो शहरांपुरतीच मर्यादित नाहीये. राहण्यासाठी चांगलं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. मात्र, त्यासाठी पगाराचा 20 ते 30 भाग खर्च करावा लागतो. मात्र, पगारचा किती भाग रेंटसाठी खर्च करावा यासाठी काही थम्ब रुल आहे, का ते आता जाणून घेऊया.

ऐश्वर्याला मुंबईमध्ये नवीन जॉब मिळाला. तिचं ऑफिस मुंबईतल्या प्राईम लोकेशनला होतं. ऑफिसच्या जवळ घर शोधावं असा तिचा विचार होता. तिने, ऑनलाईन पोर्टल आणि रिअल इस्टेट ब्रोकरच्या मदतीने अनेक फ्लॅट बघितले. मात्र, सगळीकडे खूप जास्त रेंट होतं. ऑफिसपासून लांब फ्लॅट घेतला तर रोज जायला यायला किमान 3 तास जातील आणि ऑफिसच्या जवळ फ्लॅट घेतला खूप जास्त रेंट भराव लागेल. मग अश्या परिस्थिती काय करावं, असा प्रश्न तिला पडला आहे. घराच्या रेंटवर पगाराचा किती टक्के भाग खर्च करावा, हा प्रश्न ऐश्वर्याला पडला आहे. ऐश्वर्या समोर जी अडचण आहे, त्या अडचणीला अनेक लोकांना सामोरं जावं लागतं. चांगली नोकरी पाहिजे असेल तर अनेकांना पुणे मुंबईसारख्या शहरात शिफ्ट व्हावं लागतं. भारतातल्या शहरात रेंटमध्ये मागच्या 1 वर्षात खूप मोठी वाढ झाली आहे, विशेष म्हणजे ही वाढ केवळ मेट्रो शहरांपुरतीच मर्यादित नाहीये. राहण्यासाठी चांगलं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. मात्र, त्यासाठी पगाराचा 20 ते 30 भाग खर्च करावा लागतो. मात्र, पगारचा किती भाग रेंटसाठी खर्च करावा यासाठी काही थम्ब रुल आहे, का ते आता जाणून घेऊया.

प्रॉपर्टी कन्सल्टन्ट अॅनारॉकच्या अहवालानुसार, जानेवारी ते सप्टेंबर 2023 या 9 महिन्यांत देशातल्या 7 प्रमुख शहरांमध्ये भाड्यात 30% वाढ झाली आहे. हैदराबाद, पुणे आणि बँगलोरमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. बँगलोरमधील व्हाईटफिल्ड या आयटी हबमध्ये, भाड्याच्या किमतींमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. 2022 च्या अखेरीस, या भागात 2BHK रु. 22,500 मध्ये उपलब्ध होते. सप्टेंबर 2023 हा आकडा 29,400 रुपयाच्या वर गेला म्हणजेच 9 महिन्यांत भांड्यामधे तब्बल 6,900 रुपयांची वाढ झाली. त्याचप्रमाणे, NCR च्या सोहना रोडमध्ये, 2022 च्या शेवटी 2BHK चं भाडे 28,500 रुपये होते. सप्टेंबर 2023 मध्ये हे वाढून 31,500 रुपये झाले. नोएडा सेक्टर 150 मध्ये भाडे 13% वाढल, आणि द्वारकामध्ये 14%, तिथे 22,000 असणारं रेंट आता 25,000 रुपयांपर्यंत वाढल आहे.

कोविडची महामारी चालू झाल्यानंतर अनेक IT कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला. त्यामुळे, पुणे मुंबईसारख्या शहरातून लोकं गावी गेले. 2020 आणि 2021 मध्ये कर्मचाऱ्यांना घरून काम करता आलं. मात्र, 2022 मध्ये कंपन्यांनी हायब्रीड मॉडेल चालू केलं. त्यामुळे, कर्मचाऱ्यांना पुन्हा शहरात यावं लागलं. अचानक डिमांड वाढल्यामुळे, घरांच्या रेंटमध्ये खूप मोठी वाढ झाली. या दरम्यान, रेंट तर वाढलंच त्यासोबतच घरांच्या किमती आणि व्याजदरदेखील वाढले. व्याजदर वाढल्यामुळे, अनेक लोकांनी घर घेण्याचा प्लॅन पुढे ढकलला. मात्र, अश्या परिस्थितीत घराच्या रेंटवर जास्तीत जास्त किती खर्च करायचा, हे लोकांना ठरवावं लागणार आहे. यावर तज्ज्ञांचं काय मत, ते आता जाणून घेऊया. हे कॅल्क्युलेशन आपण सविस्तर समजून घेऊया. जर ऐश्वर्याचा मासिक पगार 60,000 रुपये असेल तर तिच्या घराचं भाडं पगाराच्या 30% म्हणजेच 18000 पेक्षा जास्त नसावं. पण या 18000 मध्ये घरभाड, मेंटेनन्स, वीज बिल यासारख्या सर्व खर्चाचा समावेश असावा.

तुमचे रेंट यापेक्षा जास्त असेल तर, याचा अर्थ तुम्ही तुमच्या पगाराचा बहुतांश भाग तुमचे भाडे भरण्यासाठी खर्च करत आहात. त्यामुळे, तुम्ही स्वतःच घर घेण्यासाठी, तुमच्या मुलांचं शिक्षण किंवा तुमच्या रिटायरमेंटसाठी पुरेशी बचत करू शकणार नाही. यामुळे, तुमचं फायनान्शिअल प्लँनिंग बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे, हा खर्च कमी करण्यासाठी तुम्हाला काहीतरी प्रयत्न करावे लागतील. तुमचे भाड्याचं घर निश्चित करण्यापूर्वी, तुम्हाला कुठे राहायचे आहे ते ठरवा. या ठिकाणी सुरक्षा पुरेशी आहे का ते तपासा आणि तुमचे कार्यालय तुमच्या घरापासून किती अंतरावर आहे? तेदेखील बघा. कारण तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला एखादे चांगले घर मिळाले तरी ते तुमच्या ठिकाणापासून लांब असेल तर तुमचा वेळ वाया जाईल. प्रवासावर तुम्हाला जास्त खर्च करावा लागेल. अश्या परिस्थितीत तुम्ही ऑफिसजवळ लहान घर निवडू शकता.

पगारदार व्यक्तींसाठी, त्यांच्या मासिक उत्पन्नाचा एक भाग HRA, किंवा घर भाडे भत्ता म्हणून दिला जातो. तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल आणि तुमच्या कंपनीकडून HRA मिळत असेल, तर तुम्ही भरलेल्या भाड्यावर कर सवलतीचा दावा करू शकता. किती टॅक्स बेनिफिट मिळू शकतो हे 3 घटकांवर अवलंबून असेल. ऐश्वर्याप्रमाणे, जर तुम्ही देखील भाड्याने घर शोधत असाल तर 30 टक्याचा फॉर्म्युला विसरू नका. बर्‍याच लोकांना, ज्यांना नुकतीच नोकरी मिळाली आहे आणि इतर जवाबदारी नाहीये, त्यांना वाटतं की त्यांच्या पगाराच्या 40-50% रक्कम घरासाठी खर्च करायला काहीच हरकत नाहीये… मात्र, असं केलं तर भविष्यात त्याचा फटका बसेल. रेंटमध्ये जर वार्षिक 10% वाढ झाली आणि त्या प्रमाणात जर पगारात वाढ झाली नाही तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळे, सुरुवातीला रेंटवर कमी खर्च करा आणि डाउनपेमेंटसाठी रक्कम साठवा. यामुळे, तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या हक्कच घर विकत घेता येईल.

Published: January 2, 2024, 13:44 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App