इमर्जन्सी फंड का महत्वाचा आहे?

अचानक आपल्याला पैशाची गरज लागली तर गुंतवणूक मोडावी लागते. त्यामुळे, त्या गुंतवणुकीचा आपल्याला पुरेपूर फायदा करून घेता येत नाही. म्हणूनच कोणत्याही आणीबाणीसाठी आपण नेहमीच तयार राहिलं पाहिजे. यासाठी चांगला आणि मजबूत इमर्जन्सी फंड आपल्याला तयार करावा लागेल.

गौरवने अनेक चांगल्या ब्ल्यू चिप शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती. मात्र, अचानक त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये एडमिट करावं लागलं.

ट्रीटमेंटसाठी पैसे पाहिजे होते, म्हणून गौरवला सगळे शेअर्स विकावे लागले. त्याने शेअर्स विकले आणि मार्केटमध्ये तेजी चालू झाली. गौरवने पोर्टफोलिओ विकला नास्ता तर त्याला आता जवळपास 20 लाखांचा प्रॉफिट मिळाला असता. आपण ज्या वेळेला रिअल इस्टेट, गोल्ड, म्युच्युअल फंड किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करतो, तेव्हा आपल्याला चांगला रिटर्न पाहिजे असेल तर आपल्याकडे चांगली होल्डिंग पॉवर पाहिजे. जेवढी जास्त होल्डिंग पॉवर तेवढी चांगली रिटर्न मिळण्याची शक्यता जास्त. आपण चांगल्या ऍसेट क्लासमध्ये योग्य वेळेला गुंतवणूक केली, मात्र अचानक आपल्याला पैशाची गरज लागली तर गुंतवणूक मोडावी लागते. त्यामुळे, त्या गुंतवणुकीचा आपल्याला पुरेपूर फायदा करून घेता येत नाही. म्हणूनच कोणत्याही आणीबाणीसाठी आपण नेहमीच तयार राहिलं पाहिजे. यासाठी चांगला आणि मजबूत इमर्जन्सी फंड आपल्याला तयार करावा लागेल. नाहीतर गौरवच्या बाबतीत जे झालं ते आपल्या बाबतीत देखील होऊ शकतं.

 

कोणतंही संकट आपल्याला सांगून येत नाही.

घरातली एखादी व्यक्ती आजारी पडू शकते, अपघात होऊ शकतो, नोकरी जाऊ शकते किंवा पगारात कपात होऊ शकते, अश्या प्रकारचं संकट आपल्यावर कधीही येऊ शकतं. विशेषतः जे लोकं प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करत आहेत किंवा ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, ते कधीही अडचणीत येऊ शकतात. अश्या संकटाला सामोरं जायचं असेल तर आपल्याकडे मजबूत इमर्जन्सी फंड पाहिजे. इमर्जन्सी फंड आपल्याला कठीण काळात पैशाची मदत करतो… आपल्यावर कर्ज घेण्याची वेळ येऊ देत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या गुंतवणुकीचं रक्षण करतो…. तसेच, कोणतंही संकट आलं तरी आपल्यावर आर्थिक ताण येणार नाही, हा विश्वास आपल्याला इमर्जन्सी फंड देतो. इमर्जन्सी फंड महत्वाचा आहे, हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. पण हा फंड कुठे जमा करावा आणि त्यामध्ये किती रक्कम असावी, हे mahatvache प्रश्न आहेत. आपला महिन्याचा खर्च किती आहे, त्यावर इमर्जन्सी फंडची रक्कम अवलंबून आहे. या खर्चामध्ये EMI, मुलांच्या शाळेची फी, इतर दैनंदिन खर्च किती आहे, ते बघणं महत्वाचं आहे. सध्याच्या काळात, जगात मंदीची भीती कायमच असते. त्यामुळे, नोकरी जाण्याची वेळ कधीही येऊ शकते. आपल्याकडे चांगला अनुभव आणि शिक्षण असेल तर दुसरी नोकरी मिळते. मात्र, त्यासाठी 3 ते 6 महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे, किमान 6 महिन्याच्या खर्चाएवढा इमर्जन्सी फंड असावा. तसेच, तुम्ही केवळ कंपनीच्या मेडिक्लेमवर अवलंबून असाल तर तुमच्याकडे किमान 10 लाख रुपयाचा इमर्जन्सी फंड असायला पाहिजे. समजा तुम्ही जॉब चेंज केला आणि त्या दरम्यान घरातल्या एखाद्या व्यक्तीला एडमिट करावं लागलं तर आर्थिक संकट येऊ शकतं. इमर्जन्सी फंड बनवताना तुमचा जोडीदार नोकरी किंवा व्यवसाय करतोय का, याचा विचार केला पाहिजे. आपला जोडीदार कमावता असेल, तर इमर्जन्सी फंडमध्ये कमी रक्कम असेल तरी चालेल.

 

इमर्जन्सी फंडचे पैसे कुठे साठवायचे, ते आता जाणून घेऊया.

हे पैसे साठवण्यासाठी FD आणि लिक्विड फंड हे चांगले पर्याय आहेत. इमर्जन्सी फंडमध्ये असलेले पैसे कमीत कमी वेळेत उपलब्ध झाले पाहिजेत. तसेच, हे पैसे खात्रीशीर रिटर्न देणाऱ्या ऍसेटमध्ये असावे. बँक FD हा यासाठी चांगला मार्ग आहे. ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन पद्धतीने FD चालू करावी, असा आमचा सल्ला आहे. कारण, तुम्ही ऑनलाईन FD मध्ये गुंतवणूक केली असेल,आणि बँकेला सुट्टी असेल तरी तुम्ही त्यातून पैसे काढू शकता. कधी कधी सरकारी सुट्ट्या आणि शनिवार रविवार असं मिळून बँका 3 किंवा 4 दिवस बंद असतात. अश्या वेळेला आपल्यावर संकट आलं आणि पैशाची गरज पडली तर FD चा उपयोग होणार नाही. त्यामुळे, इमर्जन्सी फंडसाठी ऑनलाईन FD मध्ये गुंतवणूक करावी. FD मध्ये एक अडचण आहे, ती म्हणजे मुसतीपूर्वी FD मधून पैसे काढले तर बँक पेनल्टी लावते. ही अडचण लिक्विड फंडमध्ये नसते. त्यामुळे, तुम्ही लिक्विड फंडमध्ये देखील गुंतवणूक करू शकता. तसेच, काही म्युच्युअल फंड कंपन्या दिवसाला 50000 रुपयांपर्यंतच्या रिडेम्पशनवर तात्काळ पैसे काढण्याचा पर्याय देतात. त्याला इन्स्टा फंड्स असं नाव देण्यात आलं आहे. या माध्यमातून 5 वेगवेगळ्या लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक केली, तर तुम्हाला काही सेकंदात 2 ते 3 लाख रुपये मिळू शकतात. लिक्विड फंडवर साधारण 5 ते 6% रिटर्न मिळतो. खूप मोठं संकट आलं तर इमर्जन्सी फंड कमी पडू शकतो. त्यामुळे, सगळ्यात आधी तुमचं ऍसेट एलोकेशन व्यवस्थित करा. सगळे पैसे रिअल इस्टेट सारख्या कमी लिक्विडीटी असणाऱ्या ऍसेटमध्ये टाकू नका. संपत्तीच्या 30 ते 50% रक्कम FD, सोनं, म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये ठेवा. अडचणीच्या काळात रिटर्न पेक्षा लिक्विडीटी जास्त महत्वाची आहे. अश्या पद्धतीने एका बाजूला मजबूत इमर्जन्सी फंड आणि दुसऱ्या बाजूला विचारपूर्वक ऍसेट एलोकेशन केलं तर तुम्ही कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगाला सामोरं जाऊ शकता.

Published: December 6, 2023, 13:13 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App