म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी 3 स्ट्रॅटेजी !

शेअर मार्केटमध्ये असणारी अस्थिरता आणि लॉस होण्याची भीती, यामुळे अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत नाहीत. मात्र, आम्ही आता तुम्हाला 3 अश्या स्ट्रॅटेजी सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून कधीच नुकसान होणार नाही किंवा लॉस होण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी होईल. या कोणत्या 3 स्ट्रॅटेजी आहेत आणि याचा वापर करून आपल्याला कशी वेल्थ क्रिएट करता येईल, ते जाणून घेऊया.

शेअर मार्केटमध्ये असणारी अस्थिरता आणि लॉस होण्याची भीती, यामुळे अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत नाहीत.

मात्र, आम्ही आता तुम्हाला 3 अश्या स्ट्रॅटेजी सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून कधीच नुकसान होणार नाही किंवा लॉस होण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी होईल. या कोणत्या 3 स्ट्रॅटेजी आहेत आणि याचा वापर करून आपल्याला कशी वेल्थ क्रिएट करता येईल, ते जाणून घेऊया. ज्यांना म्युच्युअल फंडमध्ये एकरकमी गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी अतिशय फायद्याची स्ट्रॅटेजी आहे, जिचं नाव आहे STP अर्थात सिस्टिमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन. आपण इक्विटी फंडमध्ये एकरकमी गुंतवणूक केली आणि मार्केट खाली आलं, तर मोठं नुकसान होऊ शकतं. कोणतीच जोखीम नको असेल तर मग नाईलाजाने डेट फंडमध्ये गुंतवणूक करावी लागते. मात्र, या फंडमध्ये साधारण FD एवढाच रिटर्न मिळतो. ही अडचण सोडवण्यासाठी आपल्याला STP चा फायदा होतो. आपण एकरकमी गुंतवणूक डेट फंडमध्ये केली आणि त्यावर मिळणारं व्याज दर महिन्याला इक्विटी फंडमध्ये टाकलं तर, आपलं भांडवल सुरक्षित राहील. तर दुसऱ्या बाजूला STP च्या मदतीने आपण जे पैसे इक्विटीमध्ये गुंतवणार आहोत, त्यावर आपल्याला 12 ते 15% रिटर्न मिळेल. म्हणजेच, भांडवल 100% सुरक्षित ठेऊन आपल्याला FD पेक्षा 3 ते 4% जास्त रिटर्न मिळवता येईल.

 

दुसरी स्ट्रॅटेजी आहे SWP अर्थात सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन.

आपण ज्यावेळेला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो, त्यावेळेला आपण काहीतरी उद्दिष्ट ठरवलेलं असतं. मुलांचं शिक्षण, घरासाठी डाउनपेमेंट, स्वतःचं रिटायरमेंट प्लॅनिंग असे आपले उद्दिष्ट असू शकतात. मात्र, ज्या वेळेला आपल्याला इक्विटीमधून पैसे काढायचे असतात, त्याच वेळेला शेअर मार्केटमध्ये पडझड झाली तर आपलं उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. म्हणून, आपलं उद्दिष्ट पूर्ण व्हायला 2 ते 3 वर्ष बाकी असताना आपण इक्विटीमधून टप्याटप्याने पैसे काढून घेऊ शकतो. यालाच SWP किंवा सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन म्हणतात. प्रत्येक गुंतवणूकदाराने SWP चा वापर केला, तर शेअर मार्केटमध्ये अचानक होणाऱ्या पडझडीपासून सरंक्षण मिळवता येईल. त्यामुळे, प्रत्येक म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराने SWP चा वापर करायला पाहिजे.

 

तिसरी महत्वाची स्ट्रॅटेजी आहे, SIP.

मागच्या काही वर्षात SIP हा गुंतवणुकीचा अतिशय लोकप्रिय प्रकार झाला आहे. मार्केट वर गेलं तर जुन्या गुंतवणुकीवर फायदा, आणि मार्केट खाली गेलं तर त्याच पैशात जास्त युनिट खरेदी करण्याची संधी, असा दुहेरी फायदा आपल्याला SIP च्या माध्यमातून मिळवता येतो. भारताची अर्थव्यवस्था जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे, भारतातल्या तरुण गुंतवणूकदारांसाठी SIP हे वरदान आहे. ज्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी आहे, त्यांनी SIP च्या माध्यमातून फायदा मिळवला पाहिजे. SIP चालू केल्यावर पहिल्या 10 वर्षात मार्केटमध्ये अनेक वेळेला मोठी घसरण होऊ शकते. अश्या परिस्थितीत आपला पोर्टफोलिओ लॉसमध्ये जाईल. मात्र, लॉस बघून न घाबरता आपण SIP चालू ठेवली, तर खालच्या लेव्हलला स्वस्तात युनिट्स खरेदी करण्याची संधी मिळते. नंतर मार्केट रिकव्हर झालं तर पोर्टफोलिओवर चांगला रिटर्न मिळतो. तुम्ही, जर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल किंवा गुंतवणूक चालू करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही सांगितलेल्या 3 स्ट्रॅटेजीसचा नक्की वापर करा. या तिन्ही स्ट्रॅटेजीसचा तुम्हाला वेल्थ क्रिएशनसाठी नक्की फायदा होईल.

Published: December 9, 2023, 13:35 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App