मंथली मोडवर मेडिक्लेम खरेदी करण्यामध्ये जोखीम आहे का?

पॉलिसीबाझारने जाहीर केलेल्या अहवालानुसार 26 ते 35 वयोगटातील 33% पगारदार लोकं प्रथमच आरोग्य विमा खरेदी करताना मंथली पेमेंट मोड निवडतात. हा ट्रेंड टियर-3 शहरांमध्ये अधिक लोकप्रिय आहे, या ठिकाणी 26 ते 35 वयोगटातील 44% लोकांनी मंथली पेमेंटची निवड केली आहे. टियर-2 शहरांमध्ये हा आकडा 31% आणि मेट्रो शहरांमध्ये 23% आहे. मंथली पेमेंट मोडची लोकप्रियता वाढतीये, हा पर्याय नक्कीच सोईस्कर आहे मात्र यामध्ये काही जोखीम आहे का, ते आता जाणून घेऊया.

26 वर्षाच्या सौरभने MBA पूर्ण झाल्यावर स्वतःचा स्टार्ट-अप चालू केला. तरुण असताना मेडिक्लेम पॉलिसी खरेदी कर, असा सल्ला त्याच्या वडिलांनी सौरभला दिला. म्हणून, त्याने मेडिक्लेम पॉलिसी खरेदी केली. मेडिक्लेमचा प्रीमियम वार्षिक असतो, मात्र ज्या महिन्यात मेडिक्लेमचा प्रीमियम भरायचा असेल त्या महिन्यात बजेट विस्कळीत होतं. म्हणून सौरभच्या सगळ्या मित्रांनी मंथली मोड निवडला आहे. एकदम वार्षिक प्रीमियम भरण्यापेक्षा दर महिन्याला पैसे भरले तर ते अधिक सोईस्कर होतं. असा विचार करणारा सौरभ एकटा नाहीये. इंश्युरन्स डिस्ट्रिब्युटर पॉलिसीबाझारने जाहीर केलेल्या अहवालानुसार 26 ते 35 वयोगटातील 33% पगारदार लोकं प्रथमच आरोग्य विमा खरेदी करताना मंथली पेमेंट मोड निवडतात. हा ट्रेंड टियर-3 शहरांमध्ये अधिक लोकप्रिय आहे, या ठिकाणी 26 ते 35 वयोगटातील 44% लोकांनी मंथली पेमेंटची निवड केली आहे. टियर-2 शहरांमध्ये हा आकडा 31% आणि मेट्रो शहरांमध्ये 23% आहे. मंथली पेमेंट मोडची लोकप्रियता वाढतीये, हा पर्याय नक्कीच सोईस्कर आहे मात्र यामध्ये काही जोखीम आहे का, ते आता जाणून घेऊया.

कोणताही व्यावसायिक त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. ग्राहकांना कमी पैशात जास्त व्हॅल्यू दिली तर व्यवसाय वाढतो, हा बिझनेसचा बेसिक नियम आहे. त्याचबरोबर ग्राहकांना नक्की कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, ते जाणून घेतलं तर विक्री करणं अधिक सोपं होतं. वर्षातून एकदा एकदम मोठी रक्कम प्रीमियम म्हणून भरायला लोकं तयार होतं नाहीत, ही अडचण इंश्युरन्स कंपन्यांच्या लक्षात आली. विशेषतः तरुणांना इतर अनेक स्वप्न पूर्ण करायचे असतात, मग अश्या परिस्थितीत लोकं मेडिक्लेम घेणं टाळतात किंवा किंवा कमी प्रीमियमच्या पॉलिसी खरेदी करतात. यामुळे, इंश्युरन्स कंपन्यांना व्यवसाय वाढवण्यात अडचणी येतात. अधिकाधिक लोकांना मेडिक्लेम खरेदी करता यावा म्हणून इंश्युरन्स कंपन्यांनी प्रीमियम भरण्यासाठी मंथली आणि क्वार्टरली ऑप्शन दिले आहेत. मात्र, मंथली प्रीमियम भरून मेडिक्लेम खरेदी अतिशय धोकादायक आहे. आम्ही असं का म्हणतोय, ते आता जाणून घेऊया.

आपण नेहमी लॉन्ग टर्मसाठी मेडिक्लेम खरेदी करतो. आपली मेडिक्लेम पॉलिसी जितकी जुनी असेल तितका आपला फायदा आहे. जुन्या पॉलिसीमध्ये जुन्या आजारांचा वेटिंग पिरिअड संपलेला असतो तसेच नो क्लेम बोनस मिळालेला असतो. त्यामुळे, पॉलिसी नियमित रिन्यू करणं अतिशय महत्वाचं आहे. आपण मंथली पेमेंट मोड निवडला आणि काही कारणास्तव पेमेंट फेल झालं तर पॉलिसी लॅप्स होऊ शकते. ड्यू डेटनंतर आपल्याला 15 दिवसांचा ग्रेस पिरिअड मिळतो. मात्र, काही कारणास्तव ग्रेस पिरिअडमध्ये ही आपण प्रीमियम नाही भरू शकलो, तर पॉलिसी लॅप्स होईल. मग आपल्याला पुन्हा नवीन अर्ज करून नवीन पॉलिसी खरेदी करावी लागेल. त्यामुळे, आपल्याला नो क्लेम बोनसचा फायदा मिळत नाही आणि पुन्हा पहिल्यापासून वेटिंग पिरिअडसाठी थांबावं लागतं. तसेच, मंथली मोडचा प्रीमियम यीअरली मोडपेक्षा 3 ते 4% जास्त असतो, अशी माहिती टॅक्स आणि इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट बळवंत जैन यांनी दिली आहे. त्यामुळे, मंथली मोडपेक्षा यीअरली मोड निवडून मेडिक्लेम खरेदी करणं आपल्याला फायद्याचं आहे. पण असं करताना आपली गैरसोय होऊ नये, यासाठी आपण एक उपाय करू शकतो. यासाठी आपल्याला सुरुवातीचा पहिला प्रीमियम यीअरली मोडवर भरावा लागेल. त्यानंतर पुढच्या वर्षीच्या प्रीमियमसाठी आपण रिकरिंग डिपॉजिट किंवा डेट फंडमध्ये दर महिन्याची SIP चालू करून पैसे जमा करू शकतो. समजा आपला वार्षिक प्रीमियम 24000 रुपये असेल, तर आपण 2000 रुपयाची SIP चालू करून वर्षाच्या शेवटी ते पैसे मेडिक्लेमसाठी वापरू शकतो. अश्या पद्धतीने आपण नियोजन केलं तर आपली गैरसोय होणार नाही आणि पॉलिसी लॅप्स होण्याचं टेन्शन देखील राहणार नाही.

Published: February 28, 2024, 19:32 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App