Maternity, IVF, Critical Illness सर्व आजार कव्हर करणारी मेडिक्लेम पॉलिसी

कमी पैशात जास्तीतजास्त सुविधा मिळाव्या अशी प्रत्येक ग्राहकाची अपेक्षा असते, तसाच विचार अमनदेखील करतोय. तो एका ऑल-राऊंड मेडिक्लेम पॉलिसीच्या शोधात आहे. या संदर्भात रिसर्च करताना त्याला मणिपाल सिग्नाच्या लाईफटाइम हेल्थ पॉलिसीची माहिती मिळाली. या पॉलिसीमध्ये असणाऱ्या 5 महत्वाच्या फीचर्सने अमनचं लक्ष वेधून घेतलं.

मेडिक्लेम ही खूप विचारपूर्वक खरेदी करण्याची गोष्ट आहे. प्रत्येकाच्या फॅमिलीचं स्ट्रक्चर वेगळं असतं, घरातल्या लोकांची संख्या, त्यांचं वय, मेडिकल हिस्टरी, कव्हरची गरज ही वेगवेगळी असते, त्यामुळे मेडिक्लेम खरेदी करताना पॉलिसी आपल्यासाठी योग्य आहे का, याचा विचार करणं गरजेचं आहे. आपल्या एखाद्या मित्राने किंवा नातेवाईकाने खरेदी केली म्हणून आपणदेखील तीच मेडिक्लेम पॉलिसी खरेदी करण्याचं ठरवलं तर ते चुकीचं ठरेल. कमी पैशात जास्तीतजास्त सुविधा मिळाव्या अशी प्रत्येक ग्राहकाची अपेक्षा असते, तसाच विचार अमनदेखील करतोय. तो एका ऑल-राऊंड मेडिक्लेम पॉलिसीच्या शोधात आहे. या संदर्भात रिसर्च करताना त्याला मणिपाल सिग्नाच्या लाईफटाइम हेल्थ पॉलिसीची माहिती मिळाली. या पॉलिसीमध्ये असणाऱ्या 5 महत्वाच्या फीचर्सने अमनचं लक्ष वेधून घेतलं. लाईफटाइमसाठी पुरेशी सम अश्युर्ड, परदेशात उपचारांसाठी कव्हर, विम्याची रक्कम वाढवण्याचा पर्याय, आपल्या गरजेनुसार फीचर्समध्ये बदल करण्याची सुविधा आणि गंभीर आजारांसाठी स्क्रीनिंग करण्याची सुविधा अश्या 5 फीचर्समुळे ही पॉलिसी इतर मेडिक्लेम पॉलिसीपेक्षा वेगळी आहे. आता या फीचर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

भारतातला मेडिकल इन्फ्लेशनचा रेट 14 टक्याच्या वर आहे. बहुतेक लोकं 10 किंवा 20 लाख रुपयाचा मेडिक्लेम घेतात. मात्र, एखादा गंभीर आजार झाला तर हा कव्हर अवघ्या 10 ते 15 दिवसात संपून जातो. अश्या परिस्थितीत आपल्याकडे रिस्टोरेशनचा पर्याय असायला पाहिजे. मणिपाल सिग्नाच्या या पॉलिसीमध्ये पॉलिसीहोल्डरला रिस्टोरेशनचा म्हणजेच पुन्हा एकदा संपूर्ण सम अश्युर्ड वापरण्याची परवानगी आहे. तसेच, मोठे आजार टाळायचे असतील तर प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक-अप करणं गरजेचं आहे. लोकांना प्रिव्हेंटिक हेल्थ चेक-अप साठी प्रोत्साहन मिळावं, म्हणून मणिपाल सिग्नाने या पॉलिसीमध्ये पहिल्या वर्षांपासून मेडिकल चेक-अपची सुविधा दिली आहे. यासाठी ग्राहकांना कोणतंही अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नाहीये. तसेच, या पॉलिसीमध्ये हॉस्पिटलचा खर्च तर कव्हर होतोच, पण त्या व्यतिरिक्त हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याचा आणि डिस्चार्जनंतरचा पूर्ण खर्च कव्हर होतो. विशेष म्हणजे, या पॉलिसीमध्ये डे-केअर ट्रीटमेंट, आयुष उपचार आणि ऍम्ब्युलन्सचा खर्चदेखील कव्हर होतो. हे झालं पहिलं फिचर, आता दुसरं फिचर आहे प्रीमियम कमी करण्यासाठीचं.

मणिपाल सिग्नाच्या लाईफटाइम हेल्थ प्लॅनमध्ये प्रीमियम वेवर बेनिफिट, पोर्टेबिलिटी बेनिफिट आणि लॉयल्टी डिस्कॉउंटच्या मदतीने प्रीमियमवर बचत करता येते. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे, आपण ऑनलाईन रिन्यूअल केलं तर प्रीमियमवर 3% सवलत मिळते. तसेच, एकदम 2 वर्षाचा प्रीमियम भरला तर 7.5% डिस्कॉउंट मिळतो. आपण सलग 3 वर्षापेक्षा जास्त काळासाठी पॉलिसी ऍक्टिव्ह ठेवली, तर चौथ्या वर्षांपासून ते सातव्या वर्षापर्यंत आपल्याला अतिरिक्त 5% डिस्कॉउंट मिळतो, तर आठव्या वर्षांपासून कंपनी तब्बल 10% डिस्कॉउंट देते. या पॉलिसीमध्ये डिस्कॉउंट तर मिळतोच त्याशिवाय आपण परदेशात गेलो आणि दुर्दैवाने तिथे ऍडमिट करावं लागलं तर याच पॉलिसीतून आपल्याला कव्हर मिळतो. यासाठी आपल्याला लाईफटाइम हेल्थ ग्लोबल प्लॅनची निवड करावी लागेल. परदेशात जाताना आपल्याला केवळ ग्लोबल प्लॅन ऍक्टिव्हेट करावा लागेल, यामुळे परदेशात जाताना वेगळा इंश्युरन्स खरेदी करण्याची गरज राहत नाही. तसेच, पेशंटला परदेशातून ट्रीटमेंटसाठी भारतात आणायचं असेल तर एअर ऍम्ब्युलन्सचा खर्चदेखील इंश्युरन्स कंपनी देते. एवढंच नाहीतर या पॉलिसीमध्ये ग्लोबल रोबोटिक आणि सायबर नाईफ सर्जरी, ग्लोबल ट्रॅव्हल व्हॅक्सिनेशन आणि इतर ऍडव्हान्स ट्रीटमेंटचा खर्च कव्हर होतो.

भारतात कॅन्सर, हार्ट आणि ब्रेनच्या आजाराचं प्रमाण खूप वाढलं आहे. हे अतिशय गंभीर आजार असल्यामुळे, या आजारांच्या ट्रीटमेंटसाठी खूप खर्च येतो. त्यामुळे, सगळ्याच पॉलिसी हे आजार कव्हर करत नाहीत. मात्र, मणिपाल सिग्नाच्या लाईफटाइम हेल्थ प्लॅनमध्ये हे सर्व गंभीर आजार कव्हर होतात. तसेच, किडनी आणि लिव्हरचं ऑपरेशन किंवा ट्रान्सप्लांट करायचं असेल तर त्याचा संपूर्ण कव्हर या पॉलिसीमधून मिळतो. पॉलिसीहोल्डरकडे मणिपाल सिग्नाचा क्रिटिकल ईलनेस रायडर खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. एखादा गंभीर आजार झाला तर उपचाराच्या खर्चा व्यतिरीक्त, इंश्युरन्स कंपनी पॉलिसीहोल्डरला एक मोठी रक्कम देईल. या पॉलिसीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, पॉलिसीहोल्डर त्याला पाहिजे त्यानुसार फीचर्स निवडू शकतो. पॉलिसीहोल्डरकडे 50 लाख ते 3 कोटींची सम अश्युर्ड घेण्याचा पर्याय आहे. आपल्याला भारताव्यतिरिक्त अमेरिका आणि कॅनडा किंवा सर्व देशांसाठी कव्हर पाहिजे आहे का, ते निवडण्याचा अधिकार आहे. तसेच, क्रिटिकल इल-नेसमध्ये सगळे 27 आजार किंवा केवळ कॅन्सर, अशी निवड करता येते.

या व्यतिरिक्त, या पॉलिसीमध्ये आणखी काही महत्वाचे फीचर्स आहेत. मेडिकल इन्फ्लेशन 15 टक्याने वाढत आहे, म्हणून या पॉलिसीमध्ये दर वर्षी 15% नो क्लेम बोनस मिळतो. यामुळे, आपल्याला वाढत्या ट्रीटमेंट खर्चाचं टेन्शन घेण्याची गरज नाहीये. विशेष म्हणजे, या पॉलिसीमध्ये मॅटर्निटीचा खर्चदेखील कव्हर होतो. मॅटर्निटीसाठी या पॉलिसीमध्ये 1 लाखांपर्यंतचा कव्हर मिळतो. तसेच, 1 वर्षापर्यंत बाळाचं आजारपण आणि व्हॅक्सिनेशन खर्च या पॉलिसीमध्ये कव्हर होतो. विशेष म्हणजे, या पॉलिसीमध्ये IVF च्या खर्चासाठी अडीच लाखापर्यंत आणि सरोगसीसाठी 1 लाख रुपयाचा कव्हर मिळतो. एकंदरीत विचार केल्यास, अमनसारख्या तरुणांसाठी ही पॉलिसी नक्कीच फायद्याची आहे. एवढे फीचर्स देणाऱ्या खूप कमी पॉलिसी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, यापैकी मणिपाल सिग्नाची लाईफटाइम हेल्थ पॉलिसी ग्राहकांसाठी नक्कीच फायद्याची आहे.

Published: February 29, 2024, 14:00 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App