आई-वडिलांसाठी वेगळी मेडिक्लेम पॉलिसी घ्यावी का?

हेल्थ इंश्युरन्सचं महत्व आपल्याला जेवढ्या लवकर कळेल, तेवढं चांगलं आहे. दुर्दैवाने बऱ्याच लोकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होई पर्यंत हेल्थ इंश्युरन्सचं महत्व कळात नाही. बऱ्याच लोकांना हेल्थ इंश्युरन्सचं महत्व माहित असतं, पण आज पॉलिसी काढू उद्या काढू असं करता करता अनेक वर्ष निघून जातात. मग अचानक घरातल्या एखाद्या व्यक्तीला ऍडमिट करावं लागलं कि बिलाचे आकडे बघून डोळे उघडतात.

रितिकला हेल्थ इंश्युअर्सन खरेदी करायचा आहे. त्याचा मित्र सौरभ एका सरकारी बँकेत ब्रँच मॅनेजर म्हणून काम करतो. म्हणून रितिकने सौरभचा सल्ला घेण्याचं ठरवलं. मागच्या वर्षी माझे वडील आजारी होते, त्यांना जवळपास 20 दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं आणि तब्बल 9 लाख रुपये खर्च आला. त्यामुळे, रितिकला त्याची सर्व बचत मोडावी लागली, त्याशिवाय मित्रांकडून काही पैसे घ्यावे लागले आणि 3 लाख रुपयाचं पर्सनल लोनदेखील काढावं लागलं. एकदा वाईट अनुभव आल्यामुळे, रितिकने तातडीने घरातल्या सगळ्यांसाठी हेल्थ इंश्युरन्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला. आता जर घरातली एखादी व्यक्ती आजारी पडली तर रितिकची पैसे भरायची ताकद नाहीये. त्यामुळे, आता हेल्थ इंश्युरन्स करण्याशिवाय दुसरा पर्याय त्याच्याकडे नाहीये. पण प्रत्येक व्यक्तीसाठी वैयक्तिक पॉलिसी खरेदी करावी का फॅमिली फ्लोटर पॉलिसी खरेदी करावी, याबद्दल त्याच्या मनात गोंधळाचं वातावरण आहे.

हेल्थ इंश्युरन्सचं महत्व आपल्याला जेवढ्या लवकर कळेल, तेवढं चांगलं आहे. दुर्दैवाने बऱ्याच लोकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होई पर्यंत हेल्थ इंश्युरन्सचं महत्व कळात नाही. बऱ्याच लोकांना हेल्थ इंश्युरन्सचं महत्व माहित असतं, पण आज पॉलिसी काढू उद्या काढू असं करता करता अनेक वर्ष निघून जातात. मग अचानक घरातल्या एखाद्या व्यक्तीला ऍडमिट करावं लागलं कि बिलाचे आकडे बघून डोळे उघडतात. म्हणूनच आरोग्य विमा हा आपल्या आर्थिक नियोजनाचा एक भाग असला पाहिजे… आजारपण पूर्वसूचना देऊन येत नाही… याचा फटका कोणालाही आणि कधीही बसू शकतो… विशेषत: घरात जर ज्येष्ठ नागरिक असतील तर मेडिक्लेम घेतलाच पाहिजे… मात्र आपण हेल्थ इंश्युरन्स खरेदी करायचा निर्णय घेतला तरी पुढचा प्रवास नक्कीच सोपा नसतो. मार्केटमध्ये अनेक इंश्युरन्स कंपन्या आहेत, प्रत्येक कंपनीकडे अनेक प्रकारच्या पॉलिसी असतात, प्रत्येक पॉलिसीमध्ये नियम आणि अटी वेगवेगळ्या असतात. त्यातच वैयक्तिक आणि फॅमिली फ्लोटर यापैकी कोणता पर्याय चांगला आहे हे आपल्याला कळत नाही.

नावाप्रमाणेच फॅमिली फ्लोटर प्लॅनमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांचा समावेश होतो. समजा पॉलिसीमध्ये 4 सदस्य असतील आणि कव्हरेज 10 लाख रुपये आहे तर सर्व सदस्य मिळून एकूण 10 लाखाचा कव्हर वापरू शकतात. कुटुंबातील कोणत्याही सदस्याला 10 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मिळू शकतात. जर एका सदस्याच्या उपचारासाठी 7 लाख रुपये खर्च आला, तर उर्वरित तीन सदस्यांना 3 लाख रुपयांपर्यंत उपचार मिळू शकतात. वैयक्तिक पॉलिसीमध्ये, एक व्यक्ती आणि एक विमा रक्कम असं सूत्र असतं, त्यामुळे व्यक्ती त्याच्या उपचारांसाठी संपूर्ण रक्कम वापरू शकते.

 

फॅमिली फ्लोटर पॉलिसीमध्ये पॉलिसीहोल्डर स्वत:, जोडीदार, मुलं, स्वतःचे आणि जोडीदाराच्या आई वडिलांचा समावेश करू शकतो. बहुतेक पॉलिसी 25 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना फॅमिली फ्लोटर योजनेचा भाग बनवण्याची परवानगी देत ​​नाहीत. बऱ्याच फॅमिली फ्लोटर पॉलिसीमध्ये केवळ दोन प्रौढांना कव्हर दिला जातो. काही कंपन्यांनी चार प्रौढांना कव्हर देण्याची तरतूद केली आहे.

 

फॅमिली फ्लोटर योजना तुमचे काही पैसे वाचवू शकते कारण याचा प्रीमियम कमी असतो. कुटुंबातील सर्व सदस्यांना एकाच वेळी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज भासण्याची शक्यता कमी असते. मात्र, कौटुंबिक फ्लोटर किंवा वैयक्तिक पॉलिसी यापैकी निवड करणं कधीकधी कठीण असतं. विशेषत: जेव्हा तुमच्या घरात ज्येष्ठ नागरिक असतात तेव्हा हे कठीण होऊ शकते.

 

फॅमिली फ्लोटर पॉलिसीचा प्रीमियम कुटुंबातील सर्वात वयस्कर सदस्याच्या वयावर अवलंबून असतो… अशा परिस्थितीत, प्रीमियम मोठ्या प्रमाणावर वाढतो… जर तुम्ही रितिकसारखे तरुण असाल आणि समजा तुम्ही 33 वर्षांचे आहात आणि तुमची फॅमिली फ्लोटर पॉलिसीमध्ये केवळ बायको आणि 2 मुलांचा समावेश केला असेल तर प्रीमियम कमी असेल. मात्र,जर तुम्ही तुमच्या आई वडिलांचाही समावेश केलात तर तुमचा प्रीमियम वाढेल… तुम्हाला तो दरवर्षी भरावा लागेल…

अश्या परिस्थितीत आपल्याकडे 2 फॅमिली फ्लोटर पॉलिसी खरेदी करण्याचा पर्याय आहे. आपण स्वतः आपला जोडीदार आणि मुलांसाठी आपण एक फॅमिली फ्लोटर पॉलिसी खरेदी करू शकतो आणि आई वडिलांसाठी एक वेगळी फॅमिली फ्लोटर पॉलिसी खरेदी करू शकतो. यामुळे, प्रीमियममध्ये थोडी बचत होईल, पण याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण आणखी चांगली पॉलिसी खरेदी करू शकतो. ज्येष्ठ नागरिकांना पूर्वीचा आजार असेल तर तो सुरुवातीच्या काही वर्षांसाठी कव्हर होतं नाही, त्यासाठी 2 ते 4 वर्षाचा वेटिंग पिरिअड असतो. तसेच, नॉर्मल पॉलिसीमध्ये को-पेमेंट आणि सब लिमिट असू शकतात. मात्र, मणिपाल सिग्ना, स्टार हेल्थ, केअर हेल्थ इंश्युरन्स, ICICI लोंबार्ड, SBI जनरल HDFC अर्गो सारख्या कंपन्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी खास पॉलिसी लॉन्च केल्या आहेत. यामध्ये, वेटिंग पिरिअड कमी असतो, सब-लिमिट नसतात आणि या व्यतिरिक्त अनेक चांगले फीचर्स मिळतात.

स्वतःसाठी आणि आई वडिलांसाठी 2 वेगवेगळ्या फॅमिली फ्लोटर घेण्याचे बरेच फायदे आहेत. असं करून रितिक आई वडिलांसाठी जास्त कव्हर असणारी पॉलिसी घेऊ शकतो. कारण त्याच्या आई वडिलांना हेल्थ इंश्युरन्सची जास्त गरज आहे. मात्र, कोणतीही मेडिक्लेम पॉलिसी खरेदी करताना रितिकला सर्व नियम आणि अटी समजून घ्याव्या लागतील. शक्यतो कमी वेटिंग पिरिअड आणि को-पेमेंट आणि सब-लिमिट नसलेली पॉलिसी खरेदी करावी. या पॉलिसीचा प्रीमियम जरी थोडा जास्त असेल तरी त्याचा नंतर फायदा होईल

Published: February 29, 2024, 17:00 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App