SIP + Lumpsum म्युच्युअल फंडमध्ये एकरकमी गुंतवणूक कधी करावी?

सगळे गुंतवणूकदार SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करत आहेत, म्हणून आपणदेखील तश्याच पद्धतीने गुंतवणूक करावी का, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. SIP ला लम्पसम गुंतवणुकीची जोड दिली तर जास्त फायदा होऊ शकतो. असं केल्याने खरंच जास्त फायदा होतो का, तसेच लम्पसम गुंतवणूक कधी करावी आणि या गुंतवणुकीवर एकत्रित किती रिटर्न मिळेल ते आता जाणून घेऊया.

भारतातला म्युच्युअल फंड व्यवसाय अतिशय झपाट्याने वाढला आहे. मागच्या 10 वर्षात म्युच्युअल फंड इंडस्ट्रीच्या AUM मध्ये तब्बल 43 लाख कोटींची वाढ झाली आहे. भारतात सध्या SIP च्या माध्यमातून दर महिन्याला साधारण 19000 कोटींची गुंतवणूक होतं आहे. मात्र, आमच्या मते ही केवळ सुरुवात आहे. भारतातल्या 10 कोटी लोकांनी दर महिन्याला एव्हरेज 5000 रुपयाची गुंतवणूक केली तरी दर महिन्याला 50000 कोटींची SIP गुंतवणूक होऊ शकते. हा आकडा 2030 पर्यंत पार होईल, असा आमचा अंदाज आहे. मात्र, सगळे गुंतवणूकदार SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करत आहेत, म्हणून आपणदेखील तश्याच पद्धतीने गुंतवणूक करावी का, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. एकरकमी गुंतवणुकीपेक्षा SIP हा तुलनेने सुरक्षित मार्ग आहे, त्यामुळे अनेक एडव्हायजर SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. SIP हा विन-विन फॉर्म्युला आहे, कारण मार्केट खाली गेलं तर जास्त युनिट्स खरेदी करण्याची संधी मिळते आणि मार्केट वर गेलं तर जुन्या गुंतवणुकीवर फायदा होतो. पण SIP ला लम्पसम गुंतवणुकीची जोड दिली तर जास्त फायदा होऊ शकतो. असं केल्याने खरंच जास्त फायदा होतो का, तसेच लम्पसम गुंतवणूक कधी करावी आणि या गुंतवणुकीवर एकत्रित किती रिटर्न मिळेल ते आता जाणून घेऊया.

तुम्हाला जर शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड्समध्ये एकरकमी गुंतवणूक करायची असेल, तर सगळ्यात आधी रिस्क कमी करावी लागेल. मार्केटमध्ये पडझड झाल्यावर व्हॅल्यू बाईन्ग केलं तर कमी जोखीम घेऊन जास्त रिटर्न मिळू शकतो. यासाठी मनी9 मराठीवर आम्ही पूर्वी एक स्ट्रॅटेजी कव्हर केली आहे. या स्ट्रॅटेजीनुसार, ज्या वेळेला निफ्टीचा किंवा इतर कोणत्याही इंडेक्सचा मंथली RSI 40 च्या खाली जातो, त्यावेळेला एकरकमी गुंतवणुकीसाठी ती सुवर्णसंधी असते. उदारणार्थ, मार्च 2020 निफ्टीचा मंथली RSI 40 च्या खाली गेला होता. त्या वेळेला निफ्टी साधारण 8500 ला ट्रेड करत होता. मंथली RSI 40 च्या खाली होता त्यामुळे, ही एकरकमी गुंतवणुकीची सुवर्णसंधी होती. समजा आपण असं गृहीत धरू या वेळेला एका गुंतवणूकदाराने ICICI च्या ब्ल्यूचिप फंडमध्ये SIP चालू केली. 2020 ते 2024 म्हणजे या 4 वर्षात त्याला SIP वर साधारण 26% CAGR रिटर्न मिळाला. समजा दुसऱ्या गुंतवणूकदाराने त्याच वेळेला एकरकमी गुंतवणूक केली असती, तर त्याला गुंतवणुकीवर वार्षिक 34% CAGR रिटर्न मिळाला असता. म्हणजे ज्याने म्युच्युअल फंडमध्ये त्यावेळेला एकरकमी गुंतवणूक केली त्याला खूप चांगला रिटर्न मिळाला.

SIP हा गुंतवणूकणुकीवर चांगला रिटर्न मिळवण्याचा लोकप्रिय मार्ग आहे. त्यामुळे, आपण नियमित SIP चालू ठेवलीच पाहिजे. मात्र, जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्या वेळेला आपण SIP ला लम्पसम गुंतवणुकीची जोड दिली तर आपला रिटर्न बऱ्यापैकी वाढेल. अशी संधी ज्यावेळेला येईल तेव्हा आपण महिन्याच्या SIP व्हॅल्यूच्या साधारण 30 ते 50 पट एकरकमी गुंतवणूक करू शकतो. समजा आपली महिन्याची SIP 10000 रुपयाची असेल आणि मार्केट खाली आलं आणि आपल्या स्ट्रॅटेजीनुसार बाय सिग्नल आला तर आपण 3 ते 5 लाख रुपयाची लम्पसम गुंतवणूक करू शकतो. ज्या ज्या वेळेला इंडेक्सचा मंथली RSI 40 च्या खाली जातो, त्या वेळेला जर आपण एकरकमी गुंतवणूक केली तर पुढच्या 5 वर्षात चांगला रिटर्न मिळतो, हे ऐतिहासिक आकडेवारीतून लक्षात येतं. हाच SIP प्लस लम्पसम चा फॉर्म्युला तुम्ही स्मॉलकॅप, मिडकॅप, फार्मा, IT बँकनिफ्टीसारख्या कोणत्याही इंडेक्ससाठी वापरू शकता. आता इथून पुढे तुमच्या SIP ला लम्पसम गुंतवणुकीची जोड द्या आणि म्युच्युअल फंड्समधून चांगली वेल्थ क्रिएट करा, पाहत राहा मनी9 मराठी.

Published: March 11, 2024, 13:09 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App