बँकांकडून इंश्युरन्स विकून ग्राहकांची फसवणूक?

सध्या मिस-सेलिंगचे प्रकार अनेक ठिकाणी होत आहेत. अश्या प्रकारे इंश्युरन्सची चुकीच्या पद्धतीने विक्री होती म्हणून, विमा नियामक IRDA ने आता 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी डिझाइन केलेल्या विमा पॉलिसीची छाननी करून एक मोठं पाऊल उचललं आहे. यामध्ये, जीवन आणि आरोग्य विमा या दोन्ही पॉलिसीचा समावेश आहे.

मुंबईमधील एका खासगी कंपनीतून निवृत्त झालेल्या महेश कदम यांना निवृत्तीनंतर कंपनीकडून मोठी रक्कम मिळाली. खात्रीशीर उत्पन्न देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करू, म्हणजे आपलं भांडवल सुरक्षित राहील आणि त्यावर आपल्याला नियमित उत्पन्न मिळेल, असा महेश यांचा विचार होता, म्हणून गुंतवणुकी संदर्भात माहिती घेण्यासाठी ते बँकेत गेले. ब्रँच मॅनेजरने त्यांना एका इन्व्हेस्टमेंट प्लॅन संदर्भात माहिती सांगितली, वास्तविक तो इन्व्हेस्टमेंट प्लॅन नाही तर एक इंश्युरन्स प्लॅन होता. मॅनेजरने पॉलिसीबद्दल इतके चांगले फीचर्स सांगितले आणि हाच इन्व्हेस्टमेंट प्लॅन तुमच्यासाठी कसा फायदेशीर आहे, ते पटवून दिलं. एवढ्या मोठ्या बँकेचा मॅनेजर सांगतोय म्हंटल्यावर, रमेश यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. तो इन्व्हेस्टमेंट प्लॅन चांगला होता, मात्र महेश यांच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांसाठी तो प्लॅन योग्य नव्हता. आपण चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्याचं महेश यांच्या लक्षात आलं. या प्लॅनमध्ये रिटर्न चांगला मिळेल, मात्र त्यासाठी किमान 5 वर्षांचा लॉक-इन पिरिअड आहे, हे त्यांना सांगण्यात आलं नव्हतं. हा प्रकार केवळ महेश यांच्यासोबतच झाला आहे असं नाही, हाच प्रकार कदाचित लाखो ज्येष्ठ नागरिकांसोबत झाला असेल. ज्येष्ठ नागरिक FD करण्यासाठी बँकेत जातात, मात्र येताना इंश्युरन्स पॉलिसी घेऊन येतात.

सध्या असे मिस-सेलिंगचे प्रकार अनेक ठिकाणी होत आहेत. अश्या प्रकारे इंश्युरन्सची चुकीच्या पद्धतीने विक्री होती म्हणून, विमा नियामक IRDA ने आता 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी डिझाइन केलेल्या विमा पॉलिसीची छाननी करून एक मोठं पाऊल उचललं आहे. यामध्ये, जीवन आणि आरोग्य विमा या दोन्ही पॉलिसीचा समावेश आहे. अश्या प्रकारच्या फसवणुकीच्या प्रकारणांबद्दल सरकारदेखील गंभीर आहे. अलीकडेच, वित्तीय सेवा सचिवांनी विविध सरकारी बँकांच्या प्रमुखांची मीटिंग घेतली. या मीटिंगमध्ये, ज्येष्ठ नागरिकांना बँकेत जो सल्ला दिला जातो, त्याचं ऑडिओ आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली. यामागे, विमा पॉलिसी विकताना ग्राहकांना दिलेली सर्व आश्वासने अधिकृतपणे नोंदवण्याचा हेतू आहे.

सध्या देशात नऊ बँका कॉर्पोरेट एजंट म्हणून कार्यरत आहेत, त्यांना इंश्युरन्स विकण्याची परवानगी आहे.. 2022-23 या आर्थिक वर्षात, बँकांनी जीवन विमा कंपन्यांच्या न्यू बिझनेस प्रीमियममध्ये 17.44% आणि नॉन-लाइफ इन्शुरन्समध्ये 5.93% योगदान दिलं………. विमा विकणाऱ्या बँकांमधील विभागाला बँकाश्यूरंस म्हणतात. या विभागाशी संबंधित कर्मचाऱ्यांना बऱ्याचदा खूप मोठे सेल्स टार्गेट दिले जातात. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी कर्मचारी मिस-सेलिंगचा उपयोग करतात. बँकांमध्ये दर 2 किंवा 3 वर्षानंतर कर्मचाऱ्यांची बदली होते, त्यामुळे नंतर ग्राहकाला एखादी अडचण आली तर ज्या कर्मचाऱ्याने पॉलिसी विकली आहे, तो त्या ब्रँचमध्ये उपलब्ध नसतो. आपली बदली होणार आहे, हे माहित असल्यामुळे काही कर्मचारी बिनधास्तपणे मिस-सेलिंग करतात. यामुळे, ग्राहकांना योग्य माहिती मिळत नाही. म्हणूनच ग्राहकांनी सावध राहण्याची गरज आहे.

बँकांना इंश्युरन्स आणि म्युच्युअल फंड विकण्याची परवानगी मिळावी का, हा सगळ्यात महत्वाचा आणि बेसिक प्रश्न आहे. ज्या बँकेत आपलं अकॉउंट आहे, तिथल्या मॅनेजरला आपल्या अकॉउंटमध्ये होणाऱ्या व्यवहारांबद्दल सगळी माहिती असते. आपल्या अकॉउंटमध्ये किती बॅलन्स असतो, आपण कुठे खर्च करतो, कुठे गुंतवणूक करतो, तसेच आपल्या अकॉउंटमध्ये एखादी मोठी रक्कम आली आहे का, अशी सर्व महत्वाची माहिती बँकेकडे असते. तसं बघितलं तर ही माहिती अतिशय गोपनीय आहे, मात्र आपला सेल आणि फी बेस्ड इन्कम वाढवण्यासाठी बँका या माहितीचा फायदा करून घेतात. आपल्या अकॉउंटमध्ये मोठी रक्कम आली कि लगेच बँकेतले रिलेशनशिप मॅनेजर फोन करतात किंवा भेटायला येतात. ग्राहकांपर्यंत योग्य माहिती पोहचवणं आणि त्यांना योग्य सल्ला देणं हे बँकेच्या कर्मचाऱ्यांचं काम आहे. मात्र, त्यांनी आधी ग्राहकांचं हित जपलं पाहिजे आणि मगच आपल्या सेल्स टार्गेटचा विचार केला पाहिजे. दुसऱ्या बाजूला, ग्राहकांनी देखील सजग राहण्याची गरज आहे. आपल्याला कोणीही गुंतवणुकीची माहिती दिली तर आणखी 1-2 ठिकाणी त्या संदर्भात चौकशी करूनच गुंतवणुकीचा निर्णय घेतला पाहिजे.

Published: March 13, 2024, 17:41 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App