लवकर SIP चालू करा, आणि लाखो रुपये वाचवा !

SIP चालू करणं हे आपल्या फायद्याचं आहे, मात्र कंपाऊंडिंगचा खऱ्या अर्थानं फायदा करून घ्यायचा असेल तर SIP लवकर चालू केली पाहिजे. SIP लवकर चालू करण्याचे काय फायदे आहेत, ते आता जाणून घेऊया.

गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे हे गुंतवणूकदारांच्या आता लक्षात आलं आहे. बँक FD, सरकारच्या लहान बचत योजना, सोनं आणि रिअल इस्टेटच्या तुलनेत म्युच्युअल फंड्समध्ये जास्त रिटर्न मिळतो, हे तर आपल्याला माहित आहे. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे SIP अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि दुसरा मार्ग आहे एकरकमी गुंतवणुकीचा. SIP चालू करून आपण डेली, विकली, मंथली अश्या पाहिजे त्या फ्रिकेव्हीन्सी नुसार म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करू शकतो. यामुळे, आपल्याला मार्केटच्या चढ-उताराचा फायदा करून घेता येतो. तर एकरकमी गुंतवणुकीत आपण संपूर्ण रक्कम एकाच वेळी गुंतवतो. SIP चालू करणं हे आपल्या फायद्याचं आहे, मात्र कंपाऊंडिंगचा खऱ्या अर्थानं फायदा करून घ्यायचा असेल तर SIP लवकर चालू केली पाहिजे. SIP लवकर चालू करण्याचे काय फायदे आहेत, ते आता जाणून घेऊया.

समजा अमर, अकबर आणि अँथनी यांना रिटायरमेंटसाठी SIP चालू करायची आहे. अमरचं वय सध्या 45 आहे, अकबरचं वय आहे 35 आणि अँथनीचं वय आहे 25. तिघांचेही वय वेगळे आहेत, मात्र तिघेही साधारण साठाव्या वर्षी रिटायर होतील, कारण सरकारचा तसा नियम आहे. समजा या तिघांनाही 1 कोटींचा रिटायरमेंट फंड जमा करायचा असेल, आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर त्यांना वार्षिक 15% रिटर्न मिळाला, तर दर महिन्याला किती गुंतवणूक करावी लागेल, ते जाणून घेऊया. अमरचं वय 45 आहे म्हणजेच त्याच्याकडे रिटायरमेंटसाठी केवळ 15 वर्षांचा कालावधी आहे. अमरला वयाच्या साठाव्या वर्षी 1 कोटींचा फंड जमा करायचा असेल तर त्याला दर महिन्याला 16200 रुपयाची SIP चालू करावी लागेल. अकबरचं वय सध्या 35 आहे, म्हणजे त्याच्याकडे रिटायरमेंटसाठी 25 वर्षांचा कालावधी आहे. साठाव्या वर्षी 1 कोटींचा फंड जमा करण्यासाठी अकबरला केवळ 3600 रुपयाची SIP चालू करावी लागेल. आता अँथनीला किती रुपयाची SIP करावी लागेल, ते जाणून घेऊया. अँथनीचं वय सध्या 25 आहे, म्हणजेच त्याच्याकडे रिटायरमेंटसाठी 35 वर्षाचा कालावधी आहे. अँथनीला 1 कोटींचा रिटायरमेंट फंड जमा करायचा असेल तर दर महिन्याला केवळ 900 रुपयाची SIP चालू करावी लागेल. हो तुम्ही बरोबर ऐकलं, 1 कोटींचा रिटायरमेंट फंड जमा करायचा असेल तर अँथनीला केवळ 900 रुपयांची च SIP करावी लागेल.

मित्रांनो, या आकडेवारीतून आपल्या एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे आपण लवकर गुंतवणूक चालू केली तर कमी पैसे टाकून आपल्याला जास्त रिटर्न मिळतो. गुंतवणुकीसाठी केलेला विलंब आपलंच नुकसान करतो. बरेच लोकं इन्व्हेस्टमेंट संदर्भात सिरिअस नसतात, आज करू उद्या करू, बघतो, विचार करतो असं म्हणता म्हणता अनेक वर्ष घालवून बसतात. मात्र, हाच टाईमपास आपल्याला अडचणीत आणतो. जेव्हा हे लक्षात येतं तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आपण आवर्जून वेळ काढून इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग केलं पाहिजे. पैसा आपला आहे, आपल्या गुंतवणुकीवर आपलं भवितव्य अवलंबून आहे, हे प्रत्येक व्यक्ती मान्य करतो. मात्र, आपण गुंतवणुकीचा एवढा मोठा निर्णय घेताना कोणत्यातरी मित्राचं ऐकून निर्णय घेतो. तसं न करता, आपण स्वतः थोडी माहिती घेतली पाहिजे. गरज पडली तर आर्थिक सल्लागाराशी चर्चा केली पाहिजे आणि लवकरात लवकर गुंतवणूक चालू केली पाहिजे. तुम्ही अजूनपर्यंत म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक चालू केली नसेल, तर आता वेळ घालवू नका. लगेचच रिटायरमेंट प्लॅनिंग चालू करा.

Published: March 14, 2024, 18:02 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App