जॉब बदल्यावर जुनं सॅलरी अकॉउंट बंद करावं का?

जोपर्यंत अकॉउंटमध्ये सॅलरी जमा होतीये तोपर्यंत त्यामध्ये मिनिमम बॅलन्सचा काहीच क्रायटेरिया नसतो. मात्र, सध्याच्या जगात प्रायव्हेट सेक्टरमध्ये लोकं सरासरी 2 ते 3 वर्षानंतर जॉब स्विच करतात. नवीन कंपनीचा आपल्या जुन्या बँकेबरोबर टाय-अप असेल तर काही अडचण येतं नाही. मात्र, जर त्यांचा टाय-अप नसेल तर तिथे उपलब्ध असणाऱ्या बँकेकडे आपल्याला नवीन सॅलरी अकॉउंट उघडावं लागतं.

मागच्या काही वर्षात HDFC कोटक, ऍक्सिस आणि ICICI सारख्या प्रायव्हेट सेक्टर बँकांचा मार्केट शेअर वाढला आहे. मोठ्या MNC कंपन्यांबरोबर सॅलरी अकॉउंटसाठी टाय-अप करून या बँकांनी सगळ्यात आधी क्लायंट बेस जमा केला. कंपन्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सुरुवातीला झिरो बॅलन्स असणारे सॅलरी अकॉउंट ओपन केले. एकदा ग्राहकांना बँकेची सर्व्हिस वापरण्याची सवय लागली कि मग त्यांच्या घरातल्या लोकांसाठी नॉर्मल सेविंग अकॉउंट उघडता येतात, ज्यामध्ये 10 25 किंवा 50 हजार रुपये मिनिमम बॅलन्स ठेवण्याची अट असू शकते. तसेच, क्रेडिट कार्ड, होम लोन, कार लोन, फॉरेक्स कार्ड यासारख्या सर्व्हिसेस विकून बँकांना क्रॉस सेलिंग करता येतं आणि नफा कमावता येतो. तसं बघितलं तर झिरो बॅलन्स सॅलरी अकॉउंट देणं बँकांना परवडत नाही. झिरो बॅलन्स अकॉउंट असल्यामुळे, लोकं सहसा खूप कमी बॅलन्स ठेवतात, बऱ्याच लोकांचं प्रायमरी अकॉउंट SBI किंवा अन्य सरकारी बँकेत असतं. त्यामुळे, सर्व मोठे व्यवहार किंवा गुंतवणूक लोकं सहसा सरकारी बँकेच्या अकॉउंटमधून करतात. त्यामुळे, सॅलरी अकॉउंटच्या माध्यमातून प्रायव्हेट बँकांना फारशी कमाई होत नाही, मात्र क्लायंट ऍक्वीजीशनसाठी हे खूप चांगलं टूल आहे.

जोपर्यंत अकॉउंटमध्ये सॅलरी जमा होतीये तोपर्यंत त्यामध्ये मिनिमम बॅलन्सचा काहीच क्रायटेरिया नसतो. मात्र, सध्याच्या जगात प्रायव्हेट सेक्टरमध्ये लोकं सरासरी 2 ते 3 वर्षानंतर जॉब स्विच करतात. नवीन कंपनीचा आपल्या जुन्या बँकेबरोबर टाय-अप असेल तर काही अडचण येतं नाही. मात्र, जर त्यांचा टाय-अप नसेल तर तिथे उपलब्ध असणाऱ्या बँकेकडे आपल्याला नवीन सॅलरी अकॉउंट उघडावं लागतं. मग त्या नवीन अकॉउंटमध्ये सॅलरी जमा व्हायला सुरुवात होते. आपण नुकताच जॉब स्विच केलेला असतो, त्यामुळे तिथल्या लोकांबरोबर जमवून घेण्याचं टेन्शन असतं, तसेच नवीन कामाची माहिती घ्यायची असते. पॅकेज वाढलेलं असतं त्यामुळे आपण अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या आणि खर्च करण्याच्या मूडमध्ये असतो. मात्र, या सगळ्या कारणांमुळे आपलं जुन्या सॅलरी अकॉउंटकडे दुर्लक्ष होतं. सलग 3 महिने जर त्या अकॉउंटमध्ये पगार जमा झाला नाही तर बँक त्या अकॉउंटचं रूपांतर साध्या सेविंग अकॉउंटमध्ये करते. तिथून पुढे सॅलरी अकॉउंटला मिळणारे सर्व फायदे रद्द होतात आणि मिनिमम बॅलन्स अकॉउंटमध्ये ठेवावा लागतो. प्रत्येक बँकेच्या नियमानुसार मंथली किंवा क्वार्टरली बॅलन्स मेंटेन करावा लागतो. तसे प्रकारचे मेसेज आपल्याला बँकेकडून पाठवले जातात.

नवीन सॅलरी अकॉउंट उघडल्यावर जर आपल्याला जुन्या अकॉउंटची गरज नसेल तर आपण ते बंद केलं पाहिजे. जर आपल्याला ते अकॉउंट चालू ठेवायचं असेल तर मिनिमम बॅलन्स एवढी रक्कम आपल्याला त्या अकॉउंटमध्ये ठेवावी लागेल. नाहीतर तेवढा बॅलन्स अकॉउंटमध्ये ठेवला नाही म्हणून बँक पेनल्टी आकारायला सुरुवात करेल. जर आपल्याला अकॉउंट चालू ठेवायचं असेल आणि मिनिमम बॅलन्सचं टेन्शन ठेवायचं नसेल तर बँकेत जाऊन आपण चौकशी करू शकतो. माझं सॅलरी अकॉउंट झिरो बॅलन्स सेविंग अकॉउंटमध्ये कन्व्हर्ट करा नाहीतर मी अकॉउंट बंद करतो, असं बँकेला सांगितलं तर आपला ग्राहक जाऊ नये म्हणून बँक अधिकारी झिरो बॅलन्स अकॉउंट देऊ शकतो. कोटक बँकेकडे 811 अकॉउंटचा पर्याय आहे, तसेच ICICI बँकेकडे वेल्थ अकॉउंट आहे, ज्यासाठी कोणताही मिनिमम बॅलन्स मेंटेन करावा लागत नाही. म्हणूनच जॉब स्विच केला तर जुन्या सॅलरी अकॉउंटकडे दुर्लक्ष करू नका. अकॉउंट चालू ठेवायचं आहे का बंद करायचं आहे, ते लगेच ठरवा आणि त्यानुसार त्यावर कारवाई करा. अन्यथा तुम्हाला पेनल्टीच्या रूपात हजारो रुपयाचा फटका बसेल.

Published: March 15, 2024, 14:54 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App