लोनचा कालावधी किती असावा?

रोहनने अँपवरून पर्सनल लोनसाठी अर्ज केला आणि अवघ्या 5 मिनिटात पैसे त्याच्या अकॉउंटमध्ये जमा झाले. त्याला केवळ 11% व्याजदराने पर्सनल लोन मिळालं म्हणून तो खुश होता. मात्र, लोनचा कालावधी निवडण्यात त्याने चूक केली. आपल्यापैकी बऱ्याच लोकांची लोनचा कालावधी निवडताना चूक होते. लोनचा कालावधी किती असावा आणि चुकीचा कालावधी निवडला तर आपलं किती नुकसान होतं, असे अनेक प्रश्न रोहनला पडले आहेत. चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया.

रोहनला घराचं रिनोव्हेशन करायचं आहे, म्हणून त्याने पर्सनल लोन घेतलं आहे. ज्या बँकेत त्याचा पगार जमा होतो, त्या बँकेने त्याला 5 लाख रुपयाचं प्री-अप्रुव्हड पर्सनल लोन दिलं होतं. रोहनचा सिबिल स्कोअर चांगला आहे, तसेच तो नामांकित IT कंपनीमध्ये काम करतो, त्याच्या सेविंग अकॉउंटमध्ये नेहमी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त बॅलन्स असतो. रोहनची प्रोफाइल चांगली असल्यामुळे बँकेने त्याला प्री-अप्रुव्हड लोन दिलं. बँकेत न जाता आणि कोणतेही कागदपत्र सादर न करता पूर्णपणे डिजिटल पद्धतीने त्याला हे लोन मिळालं. रोहनने अँपवरून पर्सनल लोनसाठी अर्ज केला आणि अवघ्या 5 मिनिटात पैसे त्याच्या अकॉउंटमध्ये जमा झाले. त्याला केवळ 11% व्याजदराने पर्सनल लोन मिळालं म्हणून तो खुश होता. मात्र, लोनचा कालावधी निवडण्यात त्याने चूक केली. आपल्यापैकी बऱ्याच लोकांची लोनचा कालावधी निवडताना चूक होते. लोनचा कालावधी किती असावा आणि चुकीचा कालावधी निवडला तर आपलं किती नुकसान होतं, असे अनेक प्रश्न रोहनला पडले आहेत. चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया.

लोनचा प्रकार कोणता आहे, त्यावर परतफेडीसाठी कालावधी किती घ्यायचा ते ठरवलं पाहिजे. पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड आणि कार लोनसारखे लोन अन-सिक्युरड असतात. त्यामुळे, या कर्जासाठी साधारण 5 ते 7 वर्षाचा कालावधी असतो. आपण सहसा जेवढा जास्तीत जास्त कालावधी मिळतोय, तेवढा कालावधी घेतो. मात्र, अन-सिक्युरड लोनसाठी जास्त कालावधी घेणं आपल्याला महागात पडू शकतं. कालावधी जास्त असेल तर EMI कमी भरायला लागतो, हे बरोबर आहे. मात्र, यामुळे खूप जास्त व्याज भरावं लागतं. तसेच, अन-सिक्युरड लोन घेतलं तर आपण त्याची लवकर परतफेड करू नये, अशी बँकेची अपेक्षा असते. अन-सिक्युरड लोनवर बँकांना 11 टक्यापेक्षा जास्त व्याज मिळतं, त्यामुळे असे लोन जास्त कालावधीसाठी चालू राहणं बँकांसाठी फायद्याचं असतं. ग्राहकांनी लवकर परतफेड करू नये म्हणून बँका फोरक्लोजर चार्जेस आकारतात. हे चार्जेस शिल्लक रकमेच्या 2 ते 4% असू शकतात. त्यामुळे, अन-सिक्युरड लोन घेताना परतफेडीचा जेवढा कालावधी आपल्यासाठी आवश्यक आहे तेवढाच घेतला पाहिजे. हा कालावधी खूप कमी घेतला तर आपल्याला जास्त EMI भरावा लागेल आणि कालावधी खूप जास्त घेतला तर जास्त व्याज भरावं लागेल. म्हणूनच अन-सिक्युरड लोनमध्ये परतफेडीचा कालावधी निवडताना या दोन्हीमध्ये आपल्याला बॅलन्स साधावा लागेल.

अन-सिक्युरड लोनचा कालावधी कसा निवडायचा ते आपण समजून घेतलं, आता होम लोनचा कालावधी कसा निवडायचा ते जाणून घेऊया. प्रत्येक सामान्य माणूस आयुष्यात 1 किंवा 2 घरं घेऊ शकतो. सारखं सारखं घर बदलणं शक्य होत नाही. म्हणून घर घेताना आपण चांगल्यातलं चांगलं घर घेतलं पाहिजे. लोनची रक्कम किती मिळेल, ते आपल्या उत्पन्नावर आणि कर्जाच्या परतफेडीवर अवलंबून असतं. लोनचा कालावधी आपण जास्त घेतला तर तेवढ्याच EMI मध्ये आपल्याला मोठं आणि चांगलं घर घेता येईल. सुरुवातीला होम लोन घेताना आपण जरी परतफेडीसाठी जास्त कालावधी घेतला, तरी आपलं नुकसान होत नाही, कारण होम लोन हे रिड्युसिंग बॅलन्स लोन असतं. म्हणजे, जेवढी रक्कम शिल्लक आहे, केवळ तेवढ्याच रकमेवर आपल्याला व्याज भरावं लागतं. EMI व्यतिरिक्त आपण जास्त रक्कम होम लोनमध्ये भरू शकतो. ही रक्कम भरल्यावर आपल्याकडे EMI किंवा परतफेडीचा कालावधी कमी करण्याचा पर्याय असतो. म्हणूनच होम लोनसाठी जास्तीत जास्त कालावधी घेण्यात आपलं नुकसान होणार नाही. अश्या पद्धतीने लोनचा प्रकार, आपलं उत्पन्न, फोरक्लोजर चार्जेस आणि व्याजदराचा विचार करून आपण परतफेडीचा कालावधी निश्चित केला पाहिजे.

Published: March 23, 2024, 14:21 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App