FD चे 5 प्रकार

आपण सहसा रेग्युलर FD मध्ये गुंतवणूक करतो. पण FD चे अनेक प्रकार आहेत. मात्र, माहितीअभावी आपण केवळ रेग्युलर FD मध्ये गुंतवणूक करतो आणि चांगला रिटर्न मिळवण्याची संधी गमावतो. बँक कर्मचाऱ्यांवरदेखील कामाचा खूप ताण असतो, त्यामुळे ते देखील जास्त माहिती देण्याचं टाळतात. मात्र, गुंतवणूकदार म्हणून आपल्याकडे FD बद्दल आणि उपलब्ध असणाऱ्या FD च्या प्रकाराबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

आपल्यापैकी अनेक गुंतवणूकदार FD म्हणजेच फिक्सड डिपॉजिटमध्ये गुंतवणूक करतात. गुंतवणुकीचा कालावधी आणि त्यावर मिळणारं व्याज या दोन्हीही गोष्टी निश्चित असतात, त्यामुळे याला फिक्सड डिपॉजिट म्हणतात. आपण सहसा रेग्युलर FD मध्ये गुंतवणूक करतो. पण FD चे अनेक प्रकार आहेत. मात्र, माहितीअभावी आपण केवळ रेग्युलर FD मध्ये गुंतवणूक करतो आणि चांगला रिटर्न मिळवण्याची संधी गमावतो. बँक कर्मचाऱ्यांवरदेखील कामाचा खूप ताण असतो, त्यामुळे ते देखील जास्त माहिती देण्याचं टाळतात. मात्र, गुंतवणूकदार म्हणून आपल्याकडे FD बद्दल आणि उपलब्ध असणाऱ्या FD च्या प्रकाराबद्दल सविस्तर जाणून घेऊया. सगळ्यात पहिला आणि आपल्या फायद्याचा प्रकार आहे ऑटो फिक्सड डिपॉजिट. ग्राहकांची गरज ओळखून अनेक बँकांनी FD चा हा प्रकार लॉन्च केला आहे. बऱ्याच वेळेला गुंतवणूकदारांच्या सेविंग अकॉउंटमध्ये पैसे पडून असतात. आपण FD केली तर तेवढ्या कालावधीसाठी पैसे अडकून पडतात. आपल्याला नक्की कधी पैसे लागतील हे माहित नसतं, म्हणून आपण पैसे सेविंग अकॉउंटमध्ये ठेवतो. मात्र, यामुळे, त्या रकमेवर केवळ अडीच ते 4% व्यक मिळतं. ग्राहकांना सेविंग अकॉउंटची फ्लेक्सिबिलिटी आणि FD चं व्याज मिळावं म्हणून बँकांनी ऑटो फिक्सड डिपॉजिटची सुविधा दिली आहे. यामध्ये काही ठराविक रक्कम सेविंग अकॉउंटमध्ये ठेवली जाते, त्या लिमिटपेक्षा जास्त रक्कम अकॉउंटमध्ये असेल तर ती रक्कम ऑटोमॅटिकली FD मध्ये ट्रान्स्फर केली जाते. आपल्याला पाहिजे तेव्हा या FD मधून पैसे काढता येतात आणि पैसे लवकर काढले म्हणून कोणतीही पेनल्टी भरावी लागत नाही. यामुळे, ऑटो फिक्सड डिपॉजिट हा आपल्यासाठी नक्कीच फायद्याचा प्रकार आहे.

FD चा दुसरा महत्वाचा प्रकार आहे सिनिअर सिटीझन FD स्कीम. हे नावं ऐकल्यावर 60 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या लोकांना वाटतं कि ही FD आपल्यासाठी फायच्याची नाहीये, कारण आपलं वय 60 पेक्षा कमी आहे. मात्र, ज्याचं वय 60 पेक्षा कमी आहे तोदेखील सिनिअर सिटीझन FD चा फायदा करून घेऊ शकतो. एखाद्या मुलाचं वय 35 40 किंवा 45 असेल आणि त्याच्या घरात आई किंवा वडील सिनिअर सिटीझन असतील, तर त्यांच्या नावावर ते FD करू शकतात. आई किंवा वडिलांच्या नावावर FD करून त्यामध्ये स्वतःच नावं नॉमिनी म्हणून टाकलं तर नॉर्मल FD पेक्षा 20 ते 40% अधिक व्याज मिळेल. FD चा तिसरा महत्वाचा प्रकार आहे टॅक्स सेविंग FD. अनेक लोकं सेक्शन 80C अंतर्गत ट्रॅक्स बेनिफिट मिळावा म्हणून PPF, इंश्युरन्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. मात्र, टॅक्स वाचवण्यासाठी टॅक्स सेविंग FD हा देखील चांगला पर्याय आहे. यावर, इतर FD पेक्षा व्याज कमी मिळतं आणि 5 वर्षाचा लॉक-इन कालावधी असतो. मात्र, इथे आपले पैसे सुरक्षित राहतात. सध्याच्या परिस्थितीत शेअर मार्केट ओव्हर-वॅल्यूड आहे, त्यामुळे ELSS फंड्स, ULIP आणि NPS सोबतच आपण टॅक्स सेविंग FD चा देखील विचार करू शकतो.

FD चा चौथा प्रकार आहे री-इन्व्हेस्टमेंट FD. ज्या गुंतवणूकदारांना केवळ वेल्थ क्रिएशनसाठी FD मध्ये गुंतवणूक करायची आहे आणि FD तुन लगेच उत्पन्न नको आहे, त्यांच्यासाठी या FD फायद्याच्या आहेत. री-इन्व्हेस्टमेंट FD मध्ये आपल्याला लगेच व्याज मिळत नाही. तर त्याची FD मध्ये री-इन्व्हेस्टमेंट केली जाते. त्यामुळे, FD ची टर्म संपल्यावर आपल्याला चांगला कॉर्पस मिळू शकतो. FD चा शेवटचा आणि अतैशय महत्वाचा प्रकार आहे डिजिटल फिक्सड डिपॉजिट. ज्या FD आपण अँप किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून चालू करतो त्यांना डिजिटल FD म्हणतात. आपण बँकेच्या शाखेत जाऊन FD चालू केली तर बँक आपल्याला FD ची रिसीट देते. ती रिसीट आपल्याला जपून ठेवावी लागते. FD वर लोन घ्यायचं असेल किंवा मुदतीपूर्वी त्यातउन पैसे काढायचे असतील किंवा मुदत संपल्यावर मॅच्युरिटीच्या वेळेला ओरिजिनल रिसीट सादर कारवी लागते. ऑफलाईन FD तुन पैसे काढायचे असतील जर बँक चालू असतानाच ते शक्य असतं. मात्र, शनिवारी किंवा रविवारी किंवा बँकेला इतर सुट्टी असताना आपल्याला यातून पैसे काढता येत नाहीत. अश्या परिस्थिती डिजिटल FD चा उपयोग होतो. जर आपण ऑनलाईन FD चालू केली असेल तर 365 दिवसांपैकी कधीही आपण FD चं रिडेम्पशन करू शकतो किंवा त्यावर लोन घेऊ शकतो. FD मॅच्युअर झाली तर ऑटो-रिन्यूअल होऊ शकतं किंवा आपल्याला पैसे पाहिजे असतील तर ते आपल्या अकॉउंटमध्ये आपोआप जमा होतात. डिजिटल FD सुरक्षित तर असतातच, त्यासोबतच ऑफलाईन FD सारखी यामध्ये गैरसोय होत नाही. तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करत असाल तर आम्ही सांगितलेल्या या 5 प्रकारच्या FD चा नक्की विचार करा, तुमच्या बँकेकडून सविस्तर माहिती घ्या आणि FD वर जास्त रिटर्न मिळवा. पाहत राहा मनी9 मराठी.

Published: March 23, 2024, 14:29 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App