RBI ची गोल्ड फायनान्स कंपनीवर कारवाई, यामागे कारण काय?

एखादी बँक किंवा NBFC अडचणीत आली तर त्याची झळ संपूर्ण व्यवस्थेला बसू शकते. एखादी लहान चूक संपूर्ण बँकिंग सेक्टर आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेला अडचणीत आणू शकते. म्हणूनच, रिजर्व बँक लोन संदर्भातल्या नियमांसंदर्भात अतिशय सिरिअस आहे. IIFL फायनान्सने गैर-प्रकार केला म्हणून RBI ने नवीन गोल्ड लोन देण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे.

रिजर्व बँक ऑफ इंडियाने नुकतेच IIFL फायनान्सवर कारवाई केली. गोल्ड लोन पोर्टफोलिओमध्ये काही गैर-प्रकार घडला आहे, असा संशय RBI ला आला आणि म्हणूनच त्यांनी ही कारवाई केली. बँका आणि NBFCs गोल्ड वॅल्यूच्या एका ठराविक मर्यादेपर्यंत लोन देऊ शकतात, यालाच LTV किंवा लोन टू व्हॅल्यू रेशिओ म्हणतात. समजा एखाद्या कर्जदाराने 1 लाख रुपयाचं सोनं गहाण ठेवलं आणि LTV रेशिओ 70% असेल तर त्याला जास्तीतजास्त 70 हजार रुपये कर्ज मिळू शकतं. रिजर्व बँकेच्या नियमानुसार LTV रेशिओ 75 टक्याच्या खाली असायला पाहिजे. मात्र, IIFL फायनान्सने या संदर्भातले नियम पाळले नाही, म्हणून त्यांच्यावर RBI ने कारवाई केली. आपलं उत्पन्न वाढावं आणि स्पर्धकांच्या तुलनेत अधिक वेगाने आपला व्यवसाय वाढावा, असं प्रत्येक कंपनीला वाटत असतं. मात्र, यासाठी जर कंपन्यांनी नियम मोडले तर रिजर्व बँक त्यांच्यावर कारवाई करते. बँकिंग सेक्टर अर्थव्यवस्थेसाठी अतिशय महत्वाचा आहे. त्यातच अनेक बँका आणि NBFC एकमेकांबरोबर व्यवसाय करतात. एखादी बँक किंवा NBFC अडचणीत आली तर त्याची झळ संपूर्ण व्यवस्थेला बसू शकते. एखादी लहान चूक संपूर्ण बँकिंग सेक्टर आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेला अडचणीत आणू शकते. म्हणूनच, रिजर्व बँक लोन संदर्भातल्या नियमांसंदर्भात अतिशय सिरिअस आहे. IIFL फायनान्सने गैर-प्रकार केला म्हणून RBI ने नवीन गोल्ड लोन देण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे.

गोल्ड लोन हा भारतात लोनचा अतिशय लोकप्रिय प्रकार आहे. भारतातल्या अनेक कुटुंबांकडे सोनं असतं. मागच्या काही दिवसात सोन्याच्या किमतींमध्ये खूप मोठी वाढ झाली आहे. या गुंतवणुकीवर महागाईपेक्षा जास्त रिटर्न मिळतो आणि तुलनेने कमी चढ उतार होतात, म्हणून सोनं खरेदीचं प्रमाण सातत्याने वाढलं आहे. सोनं खरेदी करून आपल्याला वेल्थ क्रिएट करता येते, त्यासोबतच अडचणीच्या काळात हेच सोनं आपल्या मदतीला धावून येतं. सोन्यामध्ये लिक्विडीटी आहे, त्यामुळे आपण कधीही दुकानात जाऊन पाहिजे तेवढं सोनं विकून भांडवल जमा करू शकतो. मात्र, सोनं विकण्यामध्ये आपलं 2 प्रकारे नुकसान होतं. समजा आत्ता सोन्याचा रेट चालू आहे 65000 रुपये प्रति तोळा आणि आपल्याला पैशाची गरज आहे म्हणून आपण सोनं विकलं. नंतर पुढच्या 1 वर्षात सोन्याचा रेट 75000 रुपयाच्या वर गेला तर आपल्याला प्रति तोळा 10000 हजार रुपयाचा फटका बसेल. सोनं विकण्यामध्ये दुसरी अडचण आहे ती म्हणजे मेकिंग चार्जेसची. आपण लग्नात किंवा इतर खास प्रसंगी दागिने बनवलेले असतात, त्यामुळे त्या दागिन्यांबरोबर आपली अटॅचमेंट असते. तसेच, दागिन्यांच्या खरेदीवर आपण 15 ते 30% मजुरी भरलेली असते. दागिने मोडून पुन्हा ते करायला गेलो तर पुन्हा मेकिंग चार्जेस आणि GST भरावा लागेल. म्हणूनच लोकं सोनं विकण्यापेक्षा त्यावर कर्ज घेणं पसंत करतात.

गोल्ड लोन हे सिक्युरड लोन आहे, तसेच यामध्ये लिक्विडीटी बऱ्यापैकी आहे. त्यामुळे, काही सरकारी बँका तर होम लोनपेक्षा कमी व्याजदराने गोल्ड लोन देतात. बाजारात केवळ गोल्ड लोनचा व्यवसाय करणाऱ्या काही NBFC आहेत, यामध्ये IIFL फायनान्स, मन्नपुरम आणि मुथूट फायनान्ससारख्या NBFCs चा समावेश आहे. बँकांपेक्षा या कंपन्यांचा व्याजदर जास्त असतो, त्यामुळे ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी या कंपन्या जास्त लोन देतात. तेवढ्याच सोन्यावर जास्त रक्कम मिळतिये म्हणून लोकं जास्त व्याजदर द्यायला तयार होतात. मात्र, सोन्याच्या मूल्याच्या 75 टक्यापेक्षा जास्त कर्ज देऊ नये, असा RBI चा नियम आहे. हाच नियम IIFL फायनान्सने पाळला नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर IIFL फायनान्सचा शेअर उच्चांकापासून 50% खाली आला. IIFL फायनान्सवर झालेल्या कारवाईमुळे इतर NBFC आता सावध झाल्या आहेत. RBI ने IIFL फायनान्सला थेट गोल्ड लोनचा व्यवसाय बंद करण्याचा आदेश दिला. येणाऱ्या काळात, या सेगमेंटमध्ये आणखी कारवाई होण्याची शक्यता आहे. यामुळे, NBFCs च्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम होईल, पण बँकांना याचा फायदा होईल.

Published: March 27, 2024, 14:24 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App