म्युच्युअल फंडपेक्षा NPS जास्त फायदेशीर?

रिटायरमेंटसाठी गुंतवणूक करायची असेल आणि आपलं वय 45 पेक्षा कमी असेल तर इक्विटी हा आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र, इक्विटीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपल्याकडे म्युच्युअल फंड्स, नॅशनल पेन्शन स्कीम, ULIP सारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मग यापैकी नक्की कोणता पर्याय चांगला आहे, याबद्दल बऱ्याच गुंतवणूकदारांच्या मनात गोंधळ असतो. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

ज्यांना रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी गुंतवणूक करायची आहे, ते गुंतवणूकदार दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करू शकतात. ज्यांचं वय 45 पेक्षा कमी आहे, त्यांच्याकडे रिटायरमेंटसाठी 15 ते 35 वर्षाचा कालावधी असतो. त्यामुळे, हे गुंतवणूकदार इक्विटीमध्ये गुंतवणूक करू शकतात. शेअर्स म्हणजेच इक्विटीमध्ये जोखीम जास्त असते, मात्र सर्वाधिक रिटर्न इक्विटीमध्येच मिळतो. तसेच, गुंतवणुकीचा कालावधी 10 वर्षापेक्षा जास्त असेल तर इक्विटीमध्ये नुकसान होत नाही, असं ऐतिहासिक आकडेवारीतून लक्षात येतं. त्यामुळे, रिटायरमेंटसाठी गुंतवणूक करायची असेल आणि आपलं वय 45 पेक्षा कमी असेल तर इक्विटी हा आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र, इक्विटीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपल्याकडे म्युच्युअल फंड्स, नॅशनल पेन्शन स्कीम, ULIP सारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मग यापैकी नक्की कोणता पर्याय चांगला आहे, याबद्दल बऱ्याच गुंतवणूकदारांच्या मनात गोंधळ असतो. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

म्युच्युअल फंड्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तसं बघितलं तर इक्विटी ही एक ब्रॉड कॅटेगरी आहे, मात्र यामध्ये अनेक सब-कॅटेगरी आहेत. लार्जकॅप, मिडकॅप, स्मॉलकॅप, इंडेक्स फंड, थिमेटिक फंड, सेक्टरल फंड असे अनेक पर्याय इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये उपलब्ध आहेत. ज्यांना सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळवायचा आहे, त्यांच्यासाठी ELSS फंड्सचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, ELSS फंड्समध्ये एक अडचण आहे, ती म्हणजे यामध्ये आपल्याला सक्तीने इक्विटीमध्येच गुंतवणूक करावी लागते. मात्र, NPS मध्ये आपण डेट, हायब्रीड किंवा इक्विटी यापैकी कुठेही गुंतवणूक करून टॅक्स बेनिफिट मिळवू शकतो. तसेच, NPS मध्ये आपण मार्केटच्या व्हॅल्युएशननुसार इक्विटीतून डेट किंवा हायब्रीडमध्ये आणि डेट आणि हायब्रीडमधून पुन्हा इक्विटीमध्ये पैसे ट्रान्स्फर करू शकतो. आपल्याला जर असं वाटत असेल की आता मार्केटचं व्हॅल्युएशन खूप स्वस्त आहे, तर आपण इक्विटी एलोकेशन वाढवू शकतो. तसेच, जर आपल्याला वाटलं कि मार्केटचं व्हॅल्युएशन महाग आहे तर आपण इक्विटी एलोकेशन कमी करून पैसे डेट किंवा हायब्रीडमध्ये ट्रान्स्फर करू शकतो. असं केल्याने आपली जोखीम कमी होते आणि रिटर्न वाढतो.

NPS चा आणखी एक फायदा म्हणजे यामध्ये आपण ऍक्टिव्ह आणि ऑटो यापैकी कोणताही एक गुंतवणुकीचा पर्याय निवडू शकतो. ऍक्टिव्ह पर्याय निवडला तर आपल्याला इक्विटीची टक्केवारी निश्चित करावी लागते. मात्र, ऑटो पर्याय निवडला तर आपल्या वयानुसार इक्विटी एलोकेशनमध्ये बदल केला जातो. यामुळे, जसं जसं आपलं वय वाढेल तसं आपलं इक्विटी एलोकेशन ऑटोमॅटिकली कमी होत जाईल. असा पर्याय सध्या तरी म्युच्युअल फंड्समध्ये उपलब्ध नाहीये. NPS चा आणखी एक फायदा म्हणजे यामध्ये असणारा लॉक-इन कालावधी. आता तुम्ही म्हणाल कि लॉक-इन कालावधी असणं हा फायदा कसा काय आहे? यामागे काय लॉजिक आहे ते समजून घेऊया.

आपण रिटायरमेंटसाठी गुंतवणूक चालू तर करतो, पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला पैशाची गरज भासते. नवीन घर, मुलांचं शिक्षण, मुलांचं लग्न किंवा मेडिकल इमर्जन्सी यासारख्या असंख्य कारणांसाठी कधीही पैसे लागू शकतात. यासाठी जर आपण पैसे काढले तर आपल्याकडे पुरेसा रिटायरमेंट फंड जमा होणार नाही. असं झाल्यास रिटायरमेंटनंतर आपण अडचणीत येऊ शकतो. म्हणूनच, रिटायरमेंटसाठी राखीव असलेल्या पैशाला आपण शक्यतो हात नाही लावला पाहिजे. NPS मध्ये लॉक-इन कालावधी असल्यामुळे यातून पैसे काढणं म्युच्युअल फंडपेक्षा तुलनेने अवघड आहे. NPS चा आणखी एक फायदा म्हणजे, यातून आपण रिडेम्पशन केलं तर कोणताही टॅक्स भरावा लागत नाही. याउलट, म्युच्युअल फंड्सवर मिळणाऱ्या कॅपिटल गेनवर 10% लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. तसेच, रिटायरमेंटनंतर NPS मधून कॉर्पसच्या केवळ 60% रक्कम आपल्या हातात येते. उर्वरित 40% रक्कम आपल्याला ऍन्युइटी खरेदी करण्यासाठी वापरावी लागते, ज्यावर आपल्याला दर महिन्याला पेन्शन मिळते. आपल्या पश्चात नंतर ती रक्कम आपल्या वारसांना दिली जाते. एकंदरीत विचार केल्यास, म्युच्युअल फंड आणि NPS या दोन्हीचे आपापले फायदे आहेत. त्यामुळे, आपण या दोन्ही ऍसेट्समध्ये गुंतवणूक करायला पाहिजे.

Published: March 27, 2024, 14:28 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App