टॅक्स सेविंगसाठी ELSS पेक्षा ULIP जास्त फायदेशीर?

टर्म प्लॅन आणि SIP असा कॉम्बो खरेदी करण्याचा सल्ला सगळे फायनान्शिअल एडव्हायजर देऊ लागले. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे, त्यामुळे ULIP कडे आपण एका नवीन दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे. चला तर मग ULIP चे फायदे काय आहेत, ते जाणून घेऊया.

बऱ्याच वेळेला एखाद्या व्यक्तीने चूक केली किंवा त्याचं नाव खराब झालं तर लोकं त्याच्यावर काहीही झालं तरी विश्वास ठेवत नाहीत. हाच प्रकार गुंतवणुकीच्या बाबतीत पाहायला मिळतो. ULIP म्हणजेच युनिट लिंकेड इंश्युरन्स प्लॅनची 2008 नंतर अशीच बदनामी झाली होती. LIC ने मनी प्लस आणि इतर काही ULIP प्लॅन लॉन्च केले होते. 3 वर्षात पैसे डबल होतील, अश्या प्रकारचं चुकीचं मार्केटिंग काही लोकांनी केलं. नेमका हा प्लॅन 2008 च्या क्रॅशच्या काही महिने आधी लॉन्च करण्यात आला होता. चांगला रिटर्न मिळेल म्हणून लोकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. अवघ्या काही महिन्यात शेअर मार्केटमध्ये घसरण चालू झाली आणि NAV 50 ते 70% खाली आली. पुढे 2014 पर्यंत मुद्दलदेखील परत आली नाही. नंतर, मार्केट वाढलं त्यामुळे ज्यांनी युलिप चे युनिट्स होल्ड केले त्यांना चांगला फायदा झाला. मात्र, या सगळ्यात ULIP या प्रोडक्टची खूप बदनामी झाली. काहीही झालं तरी आता ULIP प्लॅन विकायचे नाही असा निश्चय LIC च्या डेव्हलपमेंट ऑफिसर आणि एजेंट्सनी केला. त्यानंतर, ULIP मधील पारदर्शकता वाढावी म्हणून IRDA आणि इंश्युरन्स कंपन्यांनी प्रयत्न चालू केले. या दरम्यान, इंटरनेटवर युलिप संदर्भात खूप निगेटिव्हिटी पसरली. टर्म प्लॅन आणि SIP असा कॉम्बो खरेदी करण्याचा सल्ला सगळे फायनान्शिअल एडव्हायजर देऊ लागले. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे, त्यामुळे ULIP कडे आपण एका नवीन दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे. चला तर मग ULIP चे फायदे काय आहेत, ते जाणून घेऊया.

थोडक्यात सांगायचं तर ULIP म्हणजे इंश्युरन्स कंपन्यांनी चालवलेला म्युच्युअल फंड आहे. म्युच्युअल फंडमध्ये इक्विटी, हायब्रीड आणि डेट अश्या कॅटेगरी आहेत, त्याचं कॅटेगरी ULIP मध्येदेखील आहेत. म्युच्युअल फंडमध्ये लार्ज, मिड आणि स्मॉलकॅप अश्या अनेक सब-कॅटेगरी आहेत, तश्याच कॅटेगरी ULIP मध्ये देखील आहेत. मात्र, ULIP आणि म्युच्युअल फंडमध्ये काही बेसिक फरक आहेत. सगळ्यात पहिला फरक आहे तो म्हणजे इंश्युरन्स कव्हरचा. ULIP मध्ये गुंतवणुकीसोबतच इंश्युरन्स कव्हर मिळतो, ज्यासाठी आपल्या गुंतवणुकीतून काही पैसे कापले जातात. दुसरा फरक आहे टॅक्सेशनचा. म्युच्युअल फंड्सवर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. मात्र, ULIP मध्ये प्रिमिअमच्या 10 पट इंश्युरन्स कव्हर असेल आणि पॉलिसीहोल्डरने भरलेला वार्षिक प्रीमियम 5 लाखापेक्षा कमी असेल, तर सेक्शन 10 10 D अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळतो. यामुळे, कॅपिटल गेनवर गुंतवणूकदाराला कोणताही टॅक्स भरावा लागत नाही. युलिप आणि म्युच्युअल फंडमध्ये तिसरा फरक आहे फ्लेक्सिबिलिटी चा.

बरेच गुंतवणूकदार अजूनही जुनी कर प्रणाली निवडतात. वर्षाला दीड लाख रुपयाची गुंतवणूक करून सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळवता येतो. हा बेनिफिट युलिप आणि ELSS फंड्स या दोन्हीमध्ये मिळतो. मात्र, ELSS फंड्समध्ये गुंतवणूकदाराला सक्तीने इक्विटी फंड्स खरेदी करावे लागतात. ULIP मध्ये मात्र इक्विटी, हायब्रीड आणि डेट यापैकी कुठेही गुंतवणूक करण्याची परवानगी आहे. एवढंच नाहीतर लॉक इन कालावधी चालू असताना ULIP मध्ये इक्विटीतुन डेटमध्ये, डेटमधून हायब्रीडमध्ये किंवा कोणत्याही कॅटेगरीतून दुसऱ्या कॅटेगरीमध्ये स्विच करता येतं. असं केल्याने गुंतवणूकदाराची जोखीम कमी होते आणि योग्य वेळी इक्विटीमध्ये स्विच केलं तर चांगला रिटर्नदेखील मिळू शकतो. ULIP कॅटेगरीमध्ये बजाज, HDFC ICICI टाटा सारख्या कंपन्यांच्या फंड्सनी म्युच्युअल फंडपेक्षा चांगला रिटर्न दिला आहे. त्यामुळे, इंटरनेटवर आर्टिकल वाचून ULIP ला लगेच रिजेक्ट करू नका. कमीतकमी इंश्युरन्स कंपनी किंवा बँकेत जाऊन युलिप ची माहिती घ्या. ULIP आणि म्युच्युअल फंड्समध्ये तुलना करा आणि मगच गुंतवुकीचा निर्णय घ्या. ULIP खरेदी करताना शक्यतो कमी चार्जेस असणारी पॉलिसी खरेदी करा.

Published: April 25, 2024, 14:03 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App