हरवलेले शेअर्स कसे मिळवायचे?

माहितीअभावी बऱ्याच लोकांनी डिमॅटमध्ये रूपांतर केलं नाही. बरेच लोकं शेअर्स खरेदी केले आहेत, ते विसरून गेले तर बरेच लोकं आता हयात नाहीयेत. अश्या लोकांचे शेअर्स कधीतरी अचानक सापडतात. या शेअर्सला अंक्लेम्ड शेअर्स म्हणतात.

45 वर्षांचे दीपक पुण्यातल्या एका IT कंपनीत टीम लीडर म्हणून काम करतात. मागच्या आठवड्यात ते वडिलांची रूम आवरत होते, तेव्हा त्यांना एक कागद सापडला. एका नामांकित IT कंपनीचे शेअर्स दिपकच्या वडिलांनी 30 वर्षांपूर्वी खरेदी केले होते, त्याचं ते शेअर सर्टिफिकेट होतं. पूर्वी फिसिकल शेअर्सची खरेदी विक्री व्हायची, इंटरनेट नसल्यामुळे आत्तासारखं ऑनलाईन ट्रेडिंग त्या काळात होतं नव्हतं. कालांतराने सेबीने डिमॅट स्वरूपात शेअर्सच्या खरेदी विक्रीला परवानगी दिली. त्यावेळेला, गुंतवणूकदारांनी त्यांच्या फिसिकल शेअर्सचं रूपांतर डिमॅटमध्ये करून घेणं अपेक्षित होतं. मात्र, माहितीअभावी बऱ्याच लोकांनी डिमॅटमध्ये रूपांतर केलं नाही. बरेच लोकं शेअर्स खरेदी केले आहेत, ते विसरून गेले तर बरेच लोकं आता हयात नाहीयेत. अश्या लोकांचे शेअर्स कधीतरी अचानक सापडतात. या शेअर्सला अंक्लेम्ड शेअर्स म्हणतात, या शेअर्सवर कोणीच हक्क सांगितलं नाहीतर ते सरकार दरबारी जमा केले जातात. आता या शेअर्सचा काही फायदा आहे का, हे शेअर्स डिमॅट फॉर्ममध्ये ट्रान्स्फर करता येतील का, शेअर्स विकून किती पैसे मिळतील असे अनेक प्रश्न दिपकच्या मनात आहेत. चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया.

हा सगळं विषय समजून घेण्यासाठी आपण 9 प्रश आणि त्याचे उत्तरं जाणून घेऊया. यातून आपल्याला अंकलेम शेअर्स संदर्भात सविस्तर माहिती मिळेल. सगळ्यात पहिला प्रश आहे कि शेअर्स अंक्लेम्ड कसे होतात? ज्या वेळेला एखादा गुंतवणूकदार शेअर्स खरेदी करतो आणि विसरून जातो किंवा घरातल्यांना माहिती नसते आणि त्या व्यक्तीच निधन होतं, त्यावेळेला या शेअर्सवर कोणीच हक्क सांगत नाही. म्हणून या शेअर्सला अंक्लेम्ड असं म्हणतात. आता दुसरा महत्वाचा प्रश्न आहे कि किती वर्ष दावा नाही केला तर शेअर्सला अंक्लेम्ड म्हणता येईल? जर शेअर्सवर मिळणाऱ्या डिविडेंडवर सलग 7 वर्ष कोणीच दावा केला नाही तर त्या शेअर्सला अंकलेम म्हंटल जातं. हे शेअर्स फिसिकल किंवा डिमॅट या दोन्ही फॉर्ममध्ये असू शकतात. अश्या शेअर्सवर मिळणार डिविडेंड IEPF म्हणजेच इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडमध्ये ट्रान्स्फर केला जातो. आता तिसरा प्रश्न आहे शेअर्सच्या किमतींसंदर्भातला. 7 वर्षानंतर डिविडेंड IEPF मध्ये ट्रान्स्फर केला जातो, पण प्रत्यक्षात शेअर्सचं काय होतं? जर सलग 7 वर्ष कोणीच डिविडेंड क्लेम केला नाही तर शेअर्सदेखील IEPF मध्ये ट्रान्स्फर होतात. कंपनी शेअरहोल्डरच्या बँक अकॉउंटमध्ये डिविडेंड जमा करण्याचा प्रयत्न करते मात्र अकॉउंट बंद झालं असेल किंवा अन्य कारणामुळे डिविडेंड जमा झाला तर 7 वर्षानंतर शेअर्स ट्रान्स्फर केले जातात. शेअर्स ट्रान्स्फर करण्याआधी गुंतवणूकदाराला कळवलं जातं.

आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न या शेअर्सवर कोणाचा हक्क असतो. जोपर्यंत गुंतवणूकदार किंवा त्याचे कायदेशीर वारस येत नाहीत, तोपर्यंत शेअर्सचा ताबा IEPF कडे राहतो. ज्या वेळेला गुंतवणूकदार किंवा त्याचं निधन झाल्यावर कायदेशीर वारस शेअर्सवर हक्क सांगतील, तेव्हा त्यांना शेअर्स मिळतील. मात्र, यासाठी त्यांना शेअर सर्टिफिकेट, एलॉटमेंट लेटर, डेथ सर्टिफिकेट असे काही कागदपत्र सादर करावे लागतील. आता पुढचा प्रश्न आहे किट हे शेअर्स क्लेम करण्याची प्रक्रिया कशी आहे? यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड म्हणजेच IEPF च्या वेबसाईटवर जाऊन Search Unclaimed/Unpaid Amount वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल, तिथे गुंतवणूकदाराचं नाव, फोलिओ नंबर किंवा DP ID यापैकी कोणतीही माहिती टाकून सर्च करू शकता. तुमच्या नावावर जर काही अंक्लेम्ड शेअर्स असतील तर तुमचं नाव, पत्ता आणि पिनकोड टॅली करून नावावर क्लिक करा. तिथे तुम्हाला तुमच्या शेअर्सची यादी दिसेल. जर तुमच्या नावावर काही शेअर्स असतील तर तुम्हाला क्लेम रिफंडवर क्लिक करून IEPF चा 5 नंबरचा फॉर्म भरावा लागेल. यासोबत तुम्हाला आधार कार्ड, क्लायंट मास्टर लिस्ट, शेअर सर्टिफिकेट, डिविडेंड वॉरंट, इंडेम्निटी बॉण्ड, शेअरहोल्डर हयात नसेल तर त्याचं डेथ सर्टिफिकेट, वारसांचे KYC डॉक्युमेंट्स असे अनेक कागदपत्र सादर करावे लागतील.

हे सर्व कागदपत्र सादर केल्यावर तुमच्या नावाने एक SRN म्हणजे सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर इश्यू केला जाईल. IEPF 5 नंबरचा भरलेला फॉर्म आणि इतर कागदपत्र तुम्हाला नोडल ऑफिसमध्ये सादर करावे लागतील. जर कंपनीने तुमचा अर्ज मंजूर केला तर IEPF कडून तुम्हाला पूर्ण रक्कम रिफंड केली जाईल, तसेच गुंतवणूकदार किंवा त्याच्या पश्चात त्याच्या वारसदारांना शेअर्सचा ताबा दिला जाईल, ते शेअर्स त्यांच्या डिमॅट अकौंटमध्ये जमा केले जातील. सेबीने दिलेल्या माहितीनुसार भारतातल्या 13 कोटी 60 लाख डिमॅट अकॉउंटपैकी 9 कोटी 80 लाख डिमॅट अकॉउंटमध्ये नॉमिनीची माहिती टाकण्यात आली नाहीये. त्यामुळे, आधी तुमच्या डिमॅट अकॉउंटमध्ये नॉमिनीची माहिती टाका. तसेच, तुमच्या किंवा घरातल्या व्यक्तीच्या नावर काही अंक्लेम्ड शेअर्स असतील तर ते नक्की क्लेम करा. हरवलेले शेअर्स कदाचित तुमचं नशीब बदलू शकतात.

Published: April 26, 2024, 15:34 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App