EPFO ने PF च्या नियमांमध्ये कोणते बदल केले?

EPFO म्हणजेच एम्प्लॉयी प्रोविडेंट फंड ऑर्गनायजेशनने त्यांच्या नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. यामुळे, भारतातल्या करोडो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

EPFO म्हणजेच एम्प्लॉयी प्रोविडेंट फंड ऑर्गनायजेशनने त्यांच्या नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. यामुळे, भारतातल्या करोडो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नवीन नियमानुसार, जर कर्मचाऱ्याने जॉब स्विच केला तर त्याला आता पुन्हा एकदा सगळे फॉर्म भरण्याची गरज राहणार नाही. पूर्वी PF ट्रान्स्फर करण्यासाठी सगळे फॉर्म पुन्हा एकदा भरावे होते. मात्र, आता त्याची गरज नसेल. नवीन कंपनीने त्यांचा पहिला हफ्ता आपल्या PF खात्यात जमा केला कि लगेच जुना PF लगेच नवीन अकॉउंटमध्ये ट्रान्स्फर होईल. याच्या आधी जर एखाद्या कर्मचाऱ्याने जॉब स्विच केला तर नवीन कंपनी त्याच्याकडून पुन्हा एकदा सगळे फॉर्म भरून घ्यायची.

नवीन फॉर्मवर UAN नंबर आणि इतर माहिती टाकल्यावर काही दिवसात जुन्या कंपनीचा PF ट्रान्स्फर व्हायचा. फॉर्म सादर केल्यावर जुनी आणि नवीन कंपनी आधी ती माहिती व्हेरिफाय करायचे. त्यात जर काही चूक असेल तर अर्ज बाद व्हायचा. मग कर्मचाऱ्याला पुन्हा सगळे फॉर्म सादर करावे लागायचे. वास्तविक पाहता जर कर्मचारी तोच आहे, त्याच पॅन कार्ड, आधार कार्ड तेच आहे, पत्ता तोच आहे मग पुन्हा पुन्हा फॉर्म भरायला लावून कर्मचाऱ्यांचा वेळ विनाकारण वाया जात होता. One Nation One Account स्कीम अंतर्गत कर्मचाऱ्यांकडे EPFO च्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन PF ट्रान्स्फर करण्याचा पर्याय होता. मात्र, त्यालाही बराच वेळा लागतो. तसेच, बऱ्याच कर्मचाऱ्यांना याबद्दल माहिती नसते, त्यामुळे शेवटी सगळे फॉर्म भरून नवीन कंपनीकडे सादर करणं हाच पर्याय लोकं स्वीकारत होते. मात्र, आता कर्मचाऱ्यांची या त्रासातून सुटका करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांसोबतच जुन्या कंपनीला देखील या प्रक्रियेमध्ये विनाकारण त्रास व्हायचा. मात्र, आता नवीन प्रोसेसमध्ये जुन्या कंपनीचं काहीच काम नाहीये. तसेच, कर्मचाऱ्यांची भल्या मोठ्या फॉर्मपासून सुटका झाली आहे. बरेच लोकं नवीन कंपनीत जॉईन झाल्यावर PF ट्रान्स्फर करत नव्हते. मग त्यांची कंपनी नवीन PF अकॉउंट उघडायची. कर्मचाऱ्यांना नंतर PF ऑफिसमध्ये जाऊन जुना PF ट्रान्स्फर करावा लागायचा. बरेच कर्मचारी नंतर जुना PF काढून घ्यायचे. पैसे काढले कि मग ते कुठेतरी खर्च होतात आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचा रिटायरमेंट कॉर्पस जमा होत नाही. मात्र, आता या सगळ्या अडचणी लक्षात घेता EPFO ने कर्मचाऱ्यांचं काम सोपं केलं आहे. यामुळे, कर्मचाऱ्यांचा आणि कंपन्यांच्या वेळ वाचणार आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जुना PF नवीन अकॉउंटमध्ये ऍड झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचा फंड वाढत जाईल आणि त्यांना कंपाऊंडिंगचा लाभ मिळेल.

इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांचं PF अकॉउंट UAN ला लिंक आहे आणि ज्यांची KYC पूर्ण झाली आहे, केवळ अश्याच कर्मचाऱ्यांना या नवीन नियमाचा फायदा होणार आहे. KYC जर पूर्ण नसेल तर पैसे नवीन PF अकॉउंटमध्ये ट्रान्स्फर होणार नाही. UAN हा एक 12 अंकी नंबर आहे, जो कर्मचाऱ्यांना दिला जातो. कर्मचाऱ्याने कितीही कंपन्या बदलल्या तरी त्याचा UAN नंबर तोच राहतो. UAN नंबर सांगितलं कि PF अकॉउंटची संपूर्ण हिस्टरी एका क्लिकवर काढता येते. त्यामुळे, तुमचा UAN नंबर आहे का आणि PF अकॉउंटची KYC रजिस्टर्ड आहे का ते तपासा. KYC रजिस्टर्ड असेल तर इथून पुढे तुम्ही जेव्हा जेव्हा जॉब स्विच कराल तेव्हा तुम्हाला काहीही करण्याची गरज राहणार नाही. काही न करता तुमचा जुना PF नवीन ठिकाणी ट्रान्स्फर होईल. PF वर सध्या 8.25% व्याज मिळतं, त्यामुळे PF मधून पैसे काढू नका. PF वर मिळणाऱ्या कंपाऊंडिंगचा फायदा घ्या आणि चांगला रिटायरमेंट कॉर्पस जमा करा.

Published: April 27, 2024, 12:58 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App