Discount Broker VS Full Service Broker | कोणता पर्याय अधिक चांगला?

2010 मध्ये झिरोधाची एंट्री झाली आणि त्यांनी डिलिव्हरी ट्रेडिंगसाठी ब्रोकरेज माफ करून टाकलं. त्यानंतर, ग्रो आणि अपस्टोक्ससारख्या अनेक डिस्कॉउंट ब्रोकर्सची भरभराट झाली. मात्र, यामध्ये एक खूप महत्वाचा प्रश्न आहे जो नवीन आणि जुन्या या दोन्हीही गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा आहे. फुल सर्व्हिस ब्रोकर का डिस्कॉउंट ब्रोकर कोणता पर्याय आपल्यासाठी योग्य आहे? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

शेअर मार्केट आणि कमोडिटी मार्केटमध्ये नक्की काय फरक आहे, याच वर्णन हर्षद मेहता यांनी अगदी अचूक केलं होतं. ते म्हणाले, कि कमोडिटी मार्केटमध्ये किमती वाढल्या कि डिमांड कमी होतो, याउलट शेअर मार्केटमध्ये किमती वाढल्या कि डिमांड वाढतो, डिमांड वाढल्यामुळे किमती आणखी वाढतात. किमती वाढतायेत म्हणून डिमांड वाढतो आणि डिमांड वाढतोय म्हणून किमती वाढत राहतात, हे असं 2 ते 3 वर्ष चालू राहतं आणि त्यातूनच मार्केटमध्ये बबल तयार होतो ज्याचं रूपांतर मोठ्या क्रॅशमध्ये होतं. 95% लोकं चुकीच्या वेळेला शेअर मार्केटमध्ये एंट्री करतात आणि म्हणूनच बहुतांश लोकांना शेअर मार्केटमध्ये लॉस होतो. चुकीच्या वेळेला एंट्री करणं ही जशी खूप मोठी चूक आहे तशीच आणखी एक चूक अनेक गुंतवणूकदार करतात, ती म्हणजे ते चुकीचा ब्रोकर निवडतात. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग चालू करायचं असेल तर सगळ्यात आधी डिमॅट अकॉउंट उघडावं लागतं. डिमॅट अकॉउंट उघडताना आपण मित्राने किंवा नातेवाईकांनी कोणत्या ब्रोकरकडे डिमॅट उघडलं आहे, त्याच ब्रोकरची निवड करतो. काही वर्षांपूर्वी गुंतवणूकदार ICICI Direct HDFC कोटक, मोतीलाल ओसवालसारख्या फुल सर्व्हिस ब्रोकरकडे डिमॅट उघडायचे. मात्र, 2010 मध्ये झिरोधाची एंट्री झाली आणि त्यांनी डिलिव्हरी ट्रेडिंगसाठी ब्रोकरेज माफ करून टाकलं. त्यानंतर, ग्रो आणि अपस्टोक्ससारख्या अनेक डिस्कॉउंट ब्रोकर्सची भरभराट झाली. मात्र, यामध्ये एक खूप महत्वाचा प्रश्न आहे जो नवीन आणि जुन्या या दोन्हीही गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा आहे. फुल्ल सर्व्हिस ब्रोकर का डिस्कॉउंट ब्रोकर कोणता पर्याय आपल्यासाठी योग्य आहे? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

ब्रोकरची निवड करण्याआधी सगळयात आधी आपल्याला कोणत्या सेगमेंटमध्ये काम करायचं आहे, ते ठरवावं लागेल. शेअर मार्केटमध्ये लॉन्ग टर्म गुंतवणूक, शॉर्ट टर्म डिलिव्हरी बेस्ड ट्रेडिंग आणि F & O असे 3 प्रमुख प्रकार आहेत. गुंतवणूकदारांनी या तिन्ही ऍक्टिव्हिटीसाठी 3 वेगळे डिमॅट अकॉउंट उघडावे असा आमचा सल्ला आहे. यामुळे, डिमॅट अकॉउंटमध्ये असणारी जोखीम कमी होते. तसेच, इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ आणि ट्रेडिंग पोर्टफोलिओ मिक्स होतं नाही. आर्थिक वर्ष संपल्यावर कोणत्या ऍक्टिव्हिटीमधून किती प्रॉफिट मिळाला आहे, त्याचं कॅल्क्युलेशन करणं यामुळे सोपं होतं. लॉन्ग टर्म पोर्टफोलिओ बनवण्यासाठी SBI सिक्युरिटीज, ICICI Direct, Kotak Axis किंवा अन्य बँकांच्या मालकीच्या ब्रोकिंग कंपनीकडे डिमॅट अकॉउंट उघडावं, असा आमचा सल्ला आहे. या ब्रोकर्सकडे ब्रोकरेज जास्त असतं. मात्र हा लॉन्ग टर्म पोर्टफोलिओ असल्यामुळे यामध्ये आपण खूप जास्त खरेदी विक्री या अकॉउंटमध्ये करणार नाही. जर व्यवहार कमी झाले तर जास्त ब्रोकरेज भरावं लागणार नाही. समजा आपण या अकॉउंटमध्ये दर वर्षी 1 लाख रुपयाचे शेअर्स खरेदी केले आणि ब्रोकरेज असेल 30 पैसे तर आपल्याला दर वर्षी 300 रुपये ब्रोकरेज भरावं लागेल. 1 लाख रुपयाच्या शेअर्सची किंमत पुढच्या 10 20 30 वर्षात खूप वाढू शकते. कदाचित हेच शेअर्स तुम्हाला करोडपती बनवतील, त्यामुळे हे शेअर्स सुरक्षित असणं खूप गरजेचं आहे. यासाठी आपण वर्षाला 300 रुपये खर्च करायला काहीच हरकत नाहीये.

आता स्विंग ट्रेडिंग आणि F & O साठी कोणतं डिमॅट अकॉउंट वापरावं ते जाणून घेऊया. स्विंग ट्रेडिंग आणि F & O मध्ये खरेदी विक्रीच्या व्यवहारांची सांख्य बऱ्यापैकी जास्त असते. त्यामुळे, इथे आपल्याला ब्रोकरेजचा विचार करावा लागेल. तसेच, या ट्रेडिंगसाठी आपल्याला चार्टीन्ग आणि बॅकटेस्टिंगसाठी चांगल्या प्लॅटफॉर्मची गरज असते. त्यामुळे, या 2 ऍक्टिव्हिटीसाठी आपण डिस्कॉउंट ब्रोकरची निवड करू शकतो. डिस्कॉउंट ब्रोकिंगमध्ये झिरोधा, ग्रो, अपस्टोक्स, एंजेल वन, 5 पैसा, धन आणि सँमकोसारखे अनेक नामांकित ब्रोकर्स आहेत. झिरोधाने काही दिवसांपूर्वीच सेन्सिबुल प्लॅटफॉर्म त्यांच्या ग्राहकांसाठी आता मोफत असेल, असं जाहीर केलं आहे. मीराइ ऍसेटने भारतात झिरो ब्रोकरेज प्लॅन चालू केला आहे, यामध्ये F & O सहित सगळ्या ट्रेड्सवर ब्रोकरेज माफ असेल. यासाठी, ग्राहकांना वन टाइम फी भरावी लागते. अश्या प्रकारे प्रत्येक डिस्कॉउंट ब्रोकरकडे असणाऱ्या फीचर्सचा अभ्यास करू तुमच्या योग्य असणाऱ्या ब्रोकरकडे तुम्ही डिमॅट अकॉउंट उघडू शकता. एकंदरीत विचार केला तर, ऍक्टिव्हिटी नुसार डिमॅट अकॉउंटची निवड करणं आपल्या फायद्याचं आहे.

Published: April 29, 2024, 11:56 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App