पगाराचा किती भाग EMI साठी खर्च करावा?

एके दिवशी आपल्या लक्षात येतं कि पगाराचा बराच भाग हा EMI मधेच खर्च होतोय. आपण स्वतःसाठी नाहीतर बँकेसाठीच कष्ट करतोय याचा आपल्याला साक्षात्कार होतो. आपण जे कर्ज घेतले आहेत, ते खरंच योग्य होते का असा विचार मनात येतो. त्याच बरोबर, जास्तीत जास्त पगाराच्या किती टक्के भाग EMI साठी खर्च करावा हा बेसिक प्रश्न आपल्या मनात येतो. पण या प्रश्नाचा विचार कर्ज घेण्याच्या आधी करणं गरजेचं आहे. यासाठी काही थम्ब रुल आहे का, ते जाणून घेऊया.

गौरव आणि अभिषेक बऱ्याच दिवसांनंतर निवांत गप्पा मारत होते. इंजिनिअरिंग झाल्यावर गौरवला हिंजवडीत जॉब मिळाला, त्यामुळे त्याने ऑफिसजवळ फ्लॅट खरेदी केला. त्याचं लहानपण वन रम किचनच्या फ्लॅटमध्ये गेलं, त्यामुळे नोकरी लागल्यावर काहीही झालं तरी आपण मोठा 4 BHK फ्लॅट घ्यायचा असं त्याच स्वप्न होतं. नोकरी लागल्यावर त्याने लगेच डाउनपेमेंटसाठी पैसे जमवायला सुरुवात केली. 2 वर्षात पैसे जमा केले, 20 लाख रुपये डाउनपेमेंट करून त्याने पुण्यात 1 कोटींचा 4 BHK फ्लॅट खरेदी केला. त्याचा सध्या 1 लाख रुपये पगार आहे, मात्र त्याचे दर महिन्याला पगारातले 60000 रुपये होम लोनच्या EMI मधेच खर्च होतात. त्यामुळे, त्याच्या हातात इतर खर्च करण्यासाठी केवळ 40% पगार शिल्लक राहतो. त्यातच अभिषेकने गौरवसमोर सिंगापूर ट्रिपचा प्रस्ताव ठेवला. मात्र, बजेट नसल्यामुळे गौरवने यासाठी तात्काळ नकार दिला.

गौरवसारखीच आपल्यापैकी अनेक तरुणांची असते. होम लोन, कार लोन, पर्सनल लोन, मोबाईल लोन यासारख्या अनेक कर्जाचे आपण EMI भारत असतो. सध्या कंपन्या सहजपणे कर्ज देतात, आणि आपणही सहज मिळतंय म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी कर्ज घेत राहतो. मात्र, एके दिवशी आपल्या लक्षात येतं कि पगाराचा बराच भाग हा EMI मधेच खर्च होतोय. आपण स्वतःसाठी नाहीतर बँकेसाठीच कष्ट करतोय याचा आपल्याला साक्षात्कार होतो. आपण जे कर्ज घेतले आहेत, ते खरंच योग्य होते का असा विचार मनात येतो. त्याच बरोबर, जास्तीत जास्त पगाराच्या किती टक्के भाग EMI साठी खर्च करावा हा बेसिक प्रश्न आपल्या मनात येतो. पण या प्रश्नाचा विचार कर्ज घेण्याच्या आधी करणं गरजेचं आहे. यासाठी काही थम्ब रुल आहे का, ते जाणून घेऊया.

सगळ्यात आधी कर्ज घेणं योग्य आहे, ते जाणून घेणं महत्वाचं आहे. आपण शक्यतो ऍप्रिशिएटिंग ऍसेट्स खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यावं, असा आमचा सल्ला आहे. कार, मोबाईल, फॉरेन ट्रिप अश्या डेप्रिशिएटिंग ऍसेट्ससाठी शक्यतो कर्ज काढू नये, कारण यामध्ये आपलं दुहेरी नुकसान होतं. एका बाजूला आपल्याला व्याज भरावं लागतं, तर दुसऱ्या बाजूला वस्तूंची किंमत कमी होतं जाते. त्यामुळे, एप्रिशिएटिंग ऍसेट्स आणि आपत्कालीन परिस्थितीत कर्ज घेतलं तर आपलं नुकसान होणार नाही. आता पगारातून EMI साठी किती भाग खर्च करावा, त्यासाठी एक फॉर्म्युला जाणून घेऊया. आपल्याकडे सरकारी नियमानुसार साठाव्या वर्षी रिटायर व्हावं लागतं. आपल्याकडे रिटायर होण्यासाठी किती वर्ष आहेत, पगाराच्या तेवढे टक्के जर आपण EMI साठी राखीव ठेवला तर वय कमी असताना आपले चांगले ऍसेट्स तयार होतील. समजा, गौरवचं वय सध्या 25 आहे, याचा अर्थ त्याच्याकडे रिटायर व्हायला 35 वर्ष आहेत. या फॉर्म्युल्यानुसार, गौरव पगाराच्या 35% भाग EMI साठी खर्च करू शकतो.

ज्या वेळेला पहिली नोकरी चालू होते, त्यावेळेला आपल्यावर जवाबदारी कमी असते. मात्र, नंतर लग्न आणि मुलं झाल्यावर खर्च वाढत जातात. एकदा चाळीशी उलटली कि आपली जोखीम घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे, रिटायरमेंट जवळ आल्यावर पगारातला EMI चा हिस्सा कमी झाला पाहिजे. आपण जर या फॉर्म्युल्याचा वापर केला तर वय कमी असताना आपण जास्त कर्ज घेऊ, ज्यामुळे आपले ऍसेट्स तयार होतील आणि भविष्यात त्याची किंमत वाढत जाईल. त्याच बरोबर, EMI तेवढाच राहिला तरी दुसऱ्या बाजूला आपला पगार वाढत जाईल आणि पगारातला EMI चा हिस्सा आपोआप कमी होईल. रिटायरमेंटला 5 वर्ष किंवा 10 वर्ष असताना, आपल्याला EMI साठी पगाराच्या 5 किंवा 10% भाग खर्च करावा लागेल. याचा अर्थ त्यावेळेला कर्जाची रक्कम बऱ्यापैकी कमी असेल, इतर गुंतवणुकीतून साठलेले पैसे वापरून आपण कधीही हे कर्ज फेडू शकतो. त्यामुळे, वय 50 झाल्यावर आपल्याकडे अर्ली रिटायरमेंटचा पर्याय उपलब्ध असतो. तुम्ही जर कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही सांगितलेल्या फॉर्म्युल्याचा नक्की वापर करा. यामुळे, तुमचे ऍसेट्स तयार होतील आणि EMI जास्त आहे म्हणून तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज राहणार नाही.

Published: April 30, 2024, 12:24 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App